Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा माहूर भाजपाने केला निषेध.

विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा माहूर भाजपाने केला निषेध.

विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा माहूर भाजपाने केला निषेध.
X

श्रीक्ष्रेत्र माहूर/ता.प्र.पदमा गि-हे

राज्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेताच जमा केलेले परीक्षा शुल्क परत करावे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खालावलेली आर्थिक परीस्थितीचे भान ठेवून येत्या शैक्षणिक वर्षात शुल्क कमी करावे अशा मागणीची कैफीयत पालक मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर मांडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर त्यांच्या उपस्थितीतच पोलीसांनी अत्यंत अमानुषपणे लाठीचार्ज केल्याच्या घटनेचा आ.भीमराव केराम यांचे मार्गदर्शनात व माहूर तालुका भाजपाने युवानेते अॅड.रमण जायभाये,तालुकाध्यक्ष अॅड.दिनेश येऊतकर व ज्येष्ठ नेते विजय आमले यांचे नेतृत्वात निषेध करण्यात आला.आणि त्या आशयाचे निवेदन दि.27 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात देण्यात आले.

दि.26 ऑगस्ट रोजी धुळे येथे राज्यातील विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न मांडण्यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची वेळ मागितली. परंतु ती त्यांनी नाकारली. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्या कृतीचा निषेध केल्याने त्यांच्या आदेशावरून पोलीसांनी गोरगरीब विद्यार्थ्यावर अमानुषपणे लाठीचार्ज केल्याचा लाजिरवाणा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडला आहे.त्यामु़ळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा व मारहाण केलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे अशा घोषणाही निवेदन देतांना करण्यात आल्या. निवेदन देतांना आदिवासी नेते संजय पेंदोर, सागर राठोड,निळकंठ मस्के,अविनाश भोयर, प्रमोद सोनकर, राजू दराडे,हर्षदीप दीक्षित,कुलदीप घोडेकर,संतोष पवार ,कैलास फड आदि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

नायाब तहसीलदार व्ही.टी.गोविंदवार व पेशकार संतोष पवार यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना शासन दरबारी कळविण्याचे आश्वासन दिले.

Updated : 8 Sep 2020 11:21 AM GMT
Next Story
Share it
Top