समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे संत गाडगे महाराज-
X
२३ फेब्रुवारी १८७६ २० डिंसेंबर १९५६). एक थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक. त्यांचा जन्म शेणगाव (जि. अमरावती ) येथे परीट जातीत झाला. वडिलांचे नाव झिंगराजी व आईचे सखूबाई. आडनाव जाणोरकार. त्यांचे मूळ नाव डेबूजी असे होते. तथापि त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना ' गोधडे महाराज ' किंवा ' गाडगे महाराज ' म्हणूनच ओळखत. १९१२ मध्ये त्यांचा कुंताबाईशी विवाह झाला; परंतु संसारात त्यांचे मन रमले नाही. पुढे काही वर्षांनी घर सोडून तीर्थयात्रा करीत ते फिरू लागले. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले. गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्हयातील शेणगांव येथे अंजनगाव सुर्जी तालुक्यात एका परिट ( धोबी ) परिवारात झाला. गाडगे महाराजांचे बालपण मुर्तिजापुर तालुक्यातील दापुरा या त्यांच्या मामांच्या गावी गेले. त्यांच्या मामांची खुप मोठी शेतजमीन होती. तेथे काम करायला विशेषतः गुरे राखायचे काम त्यांना फार आवडे. गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. आपल्या मुलीच्या जन्मानंतर आप्तेष्टांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले. हा त्या काळी केलेला फार मोठा बदला होता. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्याचिंध्या पासुन बनविलेला पोषाख असे पायी फिरणारे व्यक्तिमत्व गाडगे बाबा.
लहानपणापासूनच त्यांना भजन-कीर्तनांची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. समाजसुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर असले, तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या एकदम हृदयाला जाऊन भिडणारी होती. महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत त्यांनी गावोगाव कीर्तने करून लोकजागृती केली. त्यांचा नैतिक उपदेश साधा व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरावा असाच होता. गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करत त्यांनी माणसातील अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून दिली. त्यांचे उपदेशही साधे व सोपे असत. देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका, असे ते नेहमी सांगत असत. गाडगे महाराज संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा, प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा उपयोग करत असत. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगे महाराजांत होत्या.
चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये ', अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत. पारंपरिक, पारमार्थिक विषयांसोबतच व्यावहारीक व नैतिक विषयांचाही त्यांनी आपल्या कीर्तनांतून लोकजागृतीसाठी चांगला उपयोग करून घेतला. स्वच्छता, प्रमाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात; परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करीत व तेथील परिसर स्वतःच्या हातांनी स्वच्छ करी. खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचा कमालीचा साधेपणा होता. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते भिकाऱ्यांना वाटून टाकीत आणि स्वतः गरिबाच्या घरची चटणी- भाकरी मागून आणून खात. लहानपणापासूनच ते जातिपंथभेदातीत होते. जातिभेद नष्ट करून एकजिनसी समाज निर्माण व्हावा, असे त्यांना मनापासून वाटे व त्या दृष्टीने यांचे आचरण आणि प्रयत्नही असत. पंढरपूर, नासिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी इ. ठिकाणी यात्रेकरूंचे अत्यंत हाल होत, म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीसाठी प्रशस्त धर्मशाळा बांधल्या. विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले व नदीवर घाटही बांधला. अनेक ठिकाणी त्यांनी गोरक्षण संस्थाही उभारल्या; तसेच अनाथांसाठी व अपंगांसाठी अनेक प्रकारे कार्य केले. समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांनाही त्यांनी उदारहस्ते देणग्या दिल्या. अनेक ठिकाणी देवाधर्माच्या नावावर चालणारी पशुहत्या त्यांनी बंद केली. अध्यात्माच्या जंजाळात न शिरताही, संसारातच राहून ईश्वरभक्ती करता येते, अशी साधी व सरळ शिकवण त्यांनी समाजास दिली.
' संत तुकाराम महाराज आमचे गुरू आहेत व माझा कोणीही शिष्य नाही ', असे ते म्हणत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची गादी अथवा मठ कोठेही निर्माण झाला नाही.समाजात शिक्षणप्रसार करून अनेक शिक्षणसंस्थांना त्यांनी मदत केली. लोकांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती; त्यामुळे लोकांनी त्यांना विपुल पैसा दिला. तो सर्व त्यांनी लोकोपयोगी कार्यात वेचला. त्यांनी उभारलेल्या सर्वच संस्थांचा कारभार विश्वस्त मंडळेच पाहतात.
गाडगे महाराजांविषयी बहुजनसमाजात कमालीचा आदरभाव आहे. त्यांनी महाराष्ट्रात केलेले लोकजागृतीचे व लोकसेवेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. प्रवास करीत असता अमरावतीजवळ त्यांचे अचानक निधन झाले. त्यांची समाधी अमरावती येथे आहे. हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांची राहणी साधीसुधी आणि गरीब होती. त्यांना सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांचा विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये मोठा सहभाग आहे.
गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दिनदलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले. लोक प्रबोधनाचा एक भाग त्यांचे कीर्तन असायचे. सामाजिक रूढी आणि परंपरेच्या टीका त्यात असायच्या. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली. गाडगे महाराजांची गोरगरीब, दीनदलित ह्यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चटन करण्यासाठी तळमळ असायची आणि त्यासाठी हे कार्यशील होते. दीन, दुर्बळ, अनाथ, अपंगांची ते नेहमीच सेवा करत असत. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकारा कडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, मंत्र-तंत्र, चमत्कार सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." ही त्यांची शिकवण होती. माणसातच दैव आहे असे त्यांचे मत होते. ह्याचाच शोध ते घेत होते. समाज कार्यासाठी मिळालेल्या देणगीतून त्यांनी अनाथ लोकांसाठी अनाथालय, धर्मशाळा, आश्रम, विद्यालय सुरू केले. दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचा साठी देव होते. त्यांच्या सेवेमध्येच जास्तच जास्त काळ वेळ रमायचे. त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले "देव दगडात नसून तो माणसांत आहे" हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य दिले.
संत गाडगे महाराजांचा दशसुत्री संदेश -
१) भुकेलेल्यांना अन्नं २) तहानलेल्यांना पाणी ३) उघडयानागडयांना वस्त्रं ४) गरीब मुलामुलींना शिक्षणाकरता मदत ५) बेघरांना आसरा ६) अंध अपंग रोग्यांना औषधोपचार ७) बेरोजगारांना रोजगार ८) पशुं-पक्षी मुक्या प्राण्यांना अभय ९) गरीब तरूण.तरूणींचे लग्नं १०) गोरगरिबांना शिक्षण
महाराजांनी केलेली महत्वाची कार्य -
१) ग्रामस्वच्छता २) अंधश्रध्दा निर्मृलन ३) जनजागृती ४) धर्मशाळा, गोशाळा, रूग्णालयं, शाळा, वसतीगृह यांची उभारणी
गाडगे महाराजांचे उपदेशात्मक सुविचार
१. चोरी करू नका. २. सावकाराकडून कर्ज घेऊ नका. ३. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. ४. देवा धर्माच्या नवा खाली प्राणी हत्या करू नका. ५. जातिभेद, अस्पृश्यता पाळू नका. ६. श्रीमंत गरीब असा भेद करू नका.
संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरु मानत असत. आपल्या कीर्तनात ते वऱ्हाडी भाषेचा प्रयोग करत असत. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगे महाराजांत होत्या. बाबांच्या कीर्तनात संत तुकाराम महाराज आणि ज्योतिबांची शिकवण प्रवाहात दिसते. त्यांचा मृत्यू दिनांक २० डिसेंबर १९५६ रोजी झाली. अशा स्वच्छतेच्या खऱ्या अग्रदुतास शतशः विनम्र अभिवादन...
संकलन व लेखन-
श्री- पंकज जामनिक ( मो .८३२९३१३२८५)
मुर्तिजापूर जि.अकोला