घरकुल कॉलनीच्या समस्येंचा तिढा काही सुटेना
X
मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन
मागील 7 ते 8 वर्षा पासून घरकुल कॉलनी मधील रहिवाशी नरकयातना भोगतायत. नगर पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी याबाबत गंभीर पावले उचलण्याची आशा घरकुल रहिवाश्यांनी सोडली आहे. बरेच पुढारी आले. आश्वसाने दिली. परंतू कुणीही रोखठोक भुमिका घेतली नाही. दिवाळी सारख्या सणवारी मध्ये सुध्दा एक लाईट चालू तर एक लाईट बंद अशी परिस्थिती होती.
पाण्याच्या बाबत सुध्दा तशीच परिस्थिती आहे. कोरोनाच्या काळात नागरिकांनी घरुनच पाण्याकरिता प्रशासनाला साकडे घालण्याचा प्रयत्न केला. पण काहीही फायदा झाला नाही. थातुर – मातुर चार कोपऱ्या वर आठ नळे लावून नागरिकांमध्ये वादविवाद होत आहे. घरामध्ये करण्यात आलेल्या नळ कनेक्शन फक्त नांवापुरते आहे. पाण्याच्या समस्येमुळे कौंटुबिक हिंसाचारामध्ये सुध्दा वाढ होत असल्याचे चित्र आहे. कारण की, माणूस कामावरुन आल्यावर त्याला पाण्याचा तगादा लावला जातो. या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने त्वरीत लक्ष दयावे. अशी मागणी घरकुल कॉलनी परिसरातील नागरिकांनी केली आहे.