Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > विदर्भातील श्रद्धाळू भाविक भक्तांनी मार्कंडेश्वर मंदिरात प्रवेश करून दर्शन घ्यावे !

विदर्भातील श्रद्धाळू भाविक भक्तांनी मार्कंडेश्वर मंदिरात प्रवेश करून दर्शन घ्यावे !

विदर्भातील श्रद्धाळू भाविक भक्तांनी मार्कंडेश्वर मंदिरात प्रवेश करून दर्शन घ्यावे !
X

राहुल दिपक येनप्रेडीवार तालुका प्रतिनिधी चामोर्शी 8888013008

चामोर्शी - दिनांक 16/11/2020 सोमवार येथील विदर्भाची काशी मार्कंडेश्र्वर देवस्थान येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने दोन महीन्या आधी आमदार डॉ होळी यांच्या पुढाकाराने बंद मंदिर उघडण्यासाठी मंदिरासमोर टाळ ,मृदंग ,ढोल , ताशे च्या गजर करीत मंदिरासमोर निदर्शने केली व राज्य सरकारचा जाहीर निषेध केला गेल्या सात आठ महिन्यांपासून कोरोना महामारी मुळे मंदिर बंद होते केंद्र सरकारने मागील तीन महिन्यांपासून राज्यांतील सर्व मंदिर सुरू करण्याचा आदेश दिला परंतु राज्य सरकारने दारूची दुकाने व बार सुरू करण्यास परवानगी दिली परंतु राज्यांतील भाविक भक्तां करिता मंदिरे सुरू करण्यास परवानगी दिली नाही, परंतु काल पासून समस्त मंदिर खुले करण्याची परवानगी दिली या निमित्याने आज भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राज्य सरकारला जाग आल्याबद्दल व भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील आध्यात्मिक आघाडीला " उद्धवा दार उघड " या आंदोलनास यश आल्याबद्दल आनंदाने भाविक भक्तांना मंदिरात स्वागत करण्यासाठी आज पुन्हा टाळ मृदंग ढोल ताशा च्या गजरात पुन्हा मंदीरात कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सोबत मंदिरात जाऊन दर्शन घेतले व पुजा अर्चना केले व गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ होळी यांनी विदर्भातील समस्त भाविक भक्तांना मार्कंडेश्र्वर मंदिरात येऊन दर्शन घेण्याचे जाहीर आव्हान केले यावेळी भारतीय जनता पक्षाचे कृषी सभापती रमेश भाऊ बारसागडे भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , भाजप तालुका महामंत्री साईनाथ भाऊ बुरांडे मार्कंडेश्र्वर मंदिर ट्रस्ट सचिव मृत्युंजय गायकवाड युवा नेते रितेश पलारापवर , प्रतीक राठी , निरज रामानुजवार , नरेश अल्सावार , रामचंद्र वरवाडे ,विलास चरडुके साईनाथ गव्हारे , राजू मोगरे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 19 Nov 2020 6:42 PM GMT
Next Story
Share it
Top