## विठ्ठला ##

## विठ्ठला ##
X

## विठ्ठला ##

आठवणीत तुझ्या

पंचप्राण तळमळे,

आपसूक पाय माझे

आता पंढरीस वळे,

नको ठेऊ अबोला आता

या भक्तासी.....

कासावीस झालो

तुझ्या पंढरीसी आलो,

मुख दर्शनाने तुझ्या

आता पावन झालो,

नको ठेऊ अबोला आता

या भक्तासी.....

आम्ही झालो दिन

तुझ्या भक्ती मध्ये लिन,

आता कल्पना नाही

ते तुझ्याविना जिणं,

नको ठेऊ अबोला आता

या भक्तासी.....

तहान भूक आता नाही

जीवाचीही लाही लाही,

मनी नसे दुसरे काही

तूच दिसे दिशा दाही,

नको ठेऊ अबोला आता

या भक्तासी.....

दुसऱ्या कोणा ना पाहिले

तुला आयुष्य वाहिले,

तुझे नाम चिंतिले

अवघे आयुष्य अर्पिले,

नको ठेऊ अबोला आता

या भक्तासी.....

शब्द रचना

पराग पिंगळे

यवतमाळ

Updated : 1 July 2020 4:07 PM GMT
Next Story
Share it
Top