Home > महाराष्ट्र राज्य > विकासाचे मुद्दे संपले की, भावनिक मुद्दे पुढे केले जातात

विकासाचे मुद्दे संपले की, भावनिक मुद्दे पुढे केले जातात

विकासाचे मुद्दे संपले की, भावनिक मुद्दे पुढे केले जातात
X

"विकासाचे मुद्दे संपले की, भावनिक मुद्दे पुढे केले जातात"

जाकीर हुसैन /9421302699

जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच राजकारणी असे करीत असतात. ताजमहलावरुन सध्या जो वाद सुरु आहे, तो याच प्रकारातला आहे. उत्तर प्रदेशची कायदा व सुव्यवस्था, तेथील कुपोषण, बालकाचे मृत्यु यासारख्या अनेक प्रश्न सोडविण्यासारखे असतांना ताजमहलावरुन निरर्थक वाद घातला जात आहे. ताजमहल कोणी व का बनवले, याला काहीही महत्व नाही, या पेक्षा त्याचे सौंदर्य किती तो भारतीय श्रमिकानी घाम गाळून तयार केले होते. हे आमच्या साठी जास्त महत्वाचे आहे. नाहीतर भारतातील बहुतांश वस्तु पाडून टाकाव्या लागतील, त्या ताजमहलामुळे उत्तर प्रदेश सरकारच्या तिजोरीत दरवर्षी 17 कोटी 87 लाख रुपये जमा होतात. कमाईच्या बाबतीत ताजमहल पहिल्या क्रमांकावर आहे. त्यात संगीत सोम यांनी आगीत तेल ओतले मुजफ्फरनगरच्या दंगलीच्या वेळीही त्यांनी आगीत तेल ओतणारी भाषणे केली होती. त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. सरकारनेही पुरातत्व खात्याचा आधार घेऊन ताजमहल हा तेजोमहल नाही, असे सांगितले. ओके यांनी प्रशिया (जर्मनी) व ऑस्ट्रिया यांची मुळ नावे पुरुष व स्त्रिया होती असे अकलेचे तारे तोडले होते. चुकीचा इतिहास मांडणार्याचीच भाजपात चलती आहे. ताजमहल हा आपला सांस्कृतिक वारसा असुन याचा समावेश जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळामध्ये केला जातो, तेथे मुलभूत सुविधा उपलब्ध करने ही सरकारची प्राथमिकता आहे. केंद्रात भाजपाचे सरकार आल्या पासुन कट्टर हिंदुत्ववादी नेते आणि खुद्द प्रधानमंत्री यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत अथवा त्यांना समजही देत नाहीत त्यामुळे भाजपाचा हिंदुत्ववादी अजेंडा पुढे रेटण्यास सर्वचजण अनुकूल असल्याचे दिसत आहे. अन्यथा RSSनेच त्याच्यावर बंधने आणली असती, त्यांनी बोलायचे आणि यांनी सावरासावर करीत राहायचे.

जाकिर हुसैन

Updated : 25 Oct 2020 3:05 PM GMT
Next Story
Share it
Top