Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > वाढदिवसानिमित्त मनोरुग्ण व गरीब गरजवंताना कपड्याचा आहेर

वाढदिवसानिमित्त मनोरुग्ण व गरीब गरजवंताना कपड्याचा आहेर

वाढदिवसानिमित्त मनोरुग्ण व गरीब गरजवंताना कपड्याचा आहेर
X

आरोग्य सेवक गोपाल राठोड यांचा अभिनव उपक्रम

दिग्रस - आजीस शेख

आपल्या वाढदिवस म्हटला की आपण वायफळ खर्च करून वाढदिवस साजरा करतो.परंतु या केलेल्या वाढदिवस खर्चाचा कोणालाही फायदा होत नाही. वाढदिवस गरीब,गरजवंताला मदत करून केल्यास खरा आनंद मिळत असल्याचे मत आरोग्य सेवक गोपाल राठोड यांनी व्यक्त केले.आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य सेवक गोपाल राठोड यांनी आपल्या नेतेच्या पाऊलावर पाऊल टाकत समाज सेवेची कास धरली आहे.वने,भूकंप व पुनर्वसन मंत्री ना.संजय राठोड जसे गरिबांना मदत करून समाज कार्य करीत आहे.त्याच प्रमाणे गोपाल राठोड यांनी फुल नाही फुलांची पाकळी या म्हणी प्रमाणे मनोरुग्णांसह गरीब गरजवंताला कपड्याचा आहेर देऊन एक छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न केला.गोपाल राठोड यांनी आपला वाढदिवस सामाजिक कार्य करून साजरा केल्याने त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

मानोरा चौकात एका मनोरुग्णांची कटिंग करून त्याला कपडे परिधान केले तसेच कान्होबा पेट्रोल पंप स्थित एका गरीब गरजवंत महिलेला साडी सह पूर्ण आहेर दिला.नेहमी विविध क्षेत्रात अडचणी येणाऱ्या गरिबांना मदत करणारे आरोग्य सेवक गोपाल राठोड यांनी आपल्या वाढदिवशी ही सामाजिक कार्यातूनच आपला वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला.व त्यांनी आपला वाढदिवस मनोरुग्ण व गरिबांना आहेर देऊन साजरा केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या या कार्याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी असा संदेश या उपक्रमातून दिसून येत होता.मित्रात पार्टी करणे,केक कापणे या सर्व बाबीला फाटा देत त्यांनी आपला वाढदिवस गरीब जनतेची सेवा करीत साजरा केला.त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या उपक्रमासाठी आरोग्य सेवक गोपाल राठोड, अजय भोयर,ललित राठोड, सचिन दुधे,जीवन निमनकर,शुभम राठोड, दिनेश खाडे, लखन राठोड, पवन भानावत,राजेश चव्हाण,मनोज ढाले, लोभासिंग,वनराज राठोड, पंकज चव्हाण,सचिन जाधव यांनी सहकार्य केले.

Updated : 10 Sep 2020 3:43 PM GMT
Next Story
Share it
Top