Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > वाडा नॅशनल पॅरामेडिकल कॉलेज मध्ये प्रथम क्रमांकानी उत्तीर्ण रियान पाटील याचा सत्कार

वाडा नॅशनल पॅरामेडिकल कॉलेज मध्ये प्रथम क्रमांकानी उत्तीर्ण रियान पाटील याचा सत्कार

वाडा नॅशनल पॅरामेडिकल कॉलेज मध्ये प्रथम क्रमांकानी उत्तीर्ण रियान पाटील याचा सत्कार
X

वाडा:प्रतिनिधी

संजय लांडगे

नॅशनल पॅरामेडिकल कॉलेज (वाडा) DMLT मध्ये पहिल्या व दुसऱ्या वर्षात ८१.७५ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांकानी उत्तीर्ण झाल्याबद्दल कु.रियान माधव पाटील रा.खुपरी याचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी सत्कार करण्यात आला. यावेळी रियानची आई, वडील व भाऊ देखील सोबत होते.

शुक्रवार दि.११ सप्टेंबर रोजी झालेल्या या सत्कार समारंभ प्रसंगी खुपरीतील संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितेश नाईक, भारतीय बौद्ध महासभा वाडा तालुकाध्यक्ष सुजय जाधव, कृषी सहाय्यक व संस्कार प्रतिष्ठानचे सचिव गोविंद तांडेल, प्रसिध्दी प्रमुख कल्पेश चौधरी, खजिनदार श्रीकांत पवार, दिलीप जाधव, विजय जाधव, मारुती जाधव, विकास नाईक, कु.रोहित तांडेल इत्यादी उपस्थित होते.

Updated : 11 Sep 2020 6:58 PM GMT
Next Story
Share it
Top