Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > वाई बाजार येथे तीन दिवसांचा जनता कर्फ्यू.....! व्यापारी संघटना व ग्रामस्थांचा कडकडीत बंदचा निर्णय....

वाई बाजार येथे तीन दिवसांचा जनता कर्फ्यू.....! व्यापारी संघटना व ग्रामस्थांचा कडकडीत बंदचा निर्णय....

वाई बाजार येथे तीन दिवसांचा जनता कर्फ्यू.....!  व्यापारी संघटना व ग्रामस्थांचा कडकडीत बंदचा निर्णय....
X

श्रीक्ष्रेत्र माहुर/ता.प्र.पदमा गि-हे

कोरोनाचा फैलाव होत असल्याच्या पार्श्वभुमिवर वाई बाजारात येत्या शनिवारपासून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय व्यापारी संघटनेसह ग्रामस्थांनी घेतला आहे.

मागील काही दिवसांपासून वाई बाजारात कोरोना पाय पसरू लागला असून बाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखून विषाणूची साखळी तोडण्यासाठी वाई बाजैर येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल रूणवाल यांच्यासह वाई येथील सत्ताधारी पक्षाचे पँनल प्रमुख फिरोज खान उस्मान खान पठाण, व्यापारी संघटनेच्या पदाधिका-यांसह नागरीक सामाजिक कार्यकर्त्यांची आज दि. १० रोजी ग्राम पंचायत कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पडली. यात शनिवार दि. १२ सप्टेंबर ते सोमवार १४ सप्टेंबर पर्यंत वाई बाजारची व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवून जनता कर्फ्यू पाळण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. तसेच बंदच्या दरम्यान कोणत्याही प्रकारची ढिलाई बाळगू नये तसेच बंदच्या दरम्यान घालून दिलेल्या अटींचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन यावेळी नाहरीकांकडून करण्यात आले.

यावेळी वाई बाजारचे उपसरपंच हाजी उस्मान खान पठाण यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते नितीन कन्नलवार, कैलाश बेहेरे, अमजद खान पठाण, साजीद खान, नंदूकिशोर कटकमवार आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Updated : 10 Sep 2020 9:33 AM GMT
Next Story
Share it
Top