वनहक्क जमीनीचे दावे सादर करना-या शेतकऱ्यांना जमीनीचे पट्टे द्या;प्रकाश गेडाम
वनहक्क जमीनीचे दावे सादर करना-या शेतकऱ्यांना जमीनीचे पट्टे द्या;प्रकाश गेडाम
राहुल दिपक येन प्रेडीववार प्रतिनिधी मो.8888013008
चामार्शी:- गेल्या अनेक वर्षांपासून जमीण कसत असलेल्या शेतकऱ्यांनी 2006 व 2008 तथा सुधारित 2012 च्या नियमा प्रमाणे वनहक्क दावे तहसील कार्यालयात चामोर्शी येथे सादर केले.नंतर त्रुटींची पुर्तता पण केली मात्र गेल्या 7 ते 8.वर्षाचा कालावधि संपुनहि अश्या शेतकऱ्यांना जमीनीचे पट्टे देन्यात आले नाहि त्या मुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसह अनेक कल्याणकारी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता आला नाहि मा.उपविभागीय अधिकारी, मा.तहसीलदार साहेब यानी चामोर्शी तालुक्यातील दावे सादर करना-या शेतकऱ्यांना जमीनीचे पट्टे द्यावे अशी मागणी प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मा.उपविभागीय अधिकारी तथा मा.तहसीलदार साहेब, चामोर्शी यांच्या कडे केली.
राजगोपालपुर,कढोली,प्रियदर्शनी व परीसरातील शेतकऱ्यांनी गेली अनेक वर्षांपुर्वि चामोर्शी तहसीलदार यांचे कडे वनहक्क जमीनीचे पट्टे मिळन्या बाबत दावे सादर केले होते. मा.उपविभागीय अधिकारी यानी काहि त्रुटी काडल्या होत्या त्याची पुर्तता देखील या शेतकऱ्यांनी केली होती मात्र पट्टे मिळाले नाही.या सर्व शेतकऱ्यांचे दावे परत तपासून त्यांना जमीनीचे पट्टे द्या अशी मागणी व चर्चा उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार चामोर्शी यांच्या शी प्रकाश गेडाम प्रदेश महामंत्री तथा जिल्हासदस्य, जिल्हा विकास, समन्वय व सनियंत्रण(दिशा) समीती,गडचिरोली.यानी केली
यावेळी स्वप्नील वरघंटे मा.जिल्हा अध्यक्ष, भा.ज.यु.मो.गडचिरोली. रेवनाथ कुसराम मा.प.स.स.चामोर्शी.तोताभाउ आभारे.रुषी कुसराम घोट,राजु वरघंटे,रमेश कन्नाके घोट,उत्तम मेश्राम राजगोपालपुर,सुनील राऊत बुथप्रमुख,दिलीप पुप्पलवार किष्टापुर, अनेक गावातील शेतकरी उपस्थित होते....