वनजमीन मिळवून घेण्यासाठी पोचमपल्ली,कोठा व कोठा माल येथील भूमिहीन नागरिक एकवटले
X
तीन गावातील नागरिकांची वनजमीन उपलब्ध करून देण्याची मागणी
आविसं पदाधिकाऱ्यांची मुसळधार पावसातच वनधिकाऱ्यांसोबत चर्चा
आशिष सुनतकर
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
मो. ७०३००८१०३७
अहेरी :- सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली,कोठा, कोठा माल हे गावे प्राणहिता नदी काठावर वसलेले असून दरवर्षी येणाऱ्या प्राणहिता नदीच्या पुरामुळे या तीन गावातील शेकडो नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागते.दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे नागरिक हैराण झाले असून आज या तीन गावातील शेकडो नागरिक घराबांध कामासाठी वनजमीन उपलब्ध व्हावे म्हणून वरील तिन्ही गावातील नागरिक एकवटले असून वनजमिनीवर अतिक्रमण करायला सुरुवात केले.
यापूर्वी या गावातील काही राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांनी उभ्या जंगलावरच कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण न करताच एकेकाच्या नावाने अंदाजे वीस वीस एकर वनजमिनीवर वनाधिकारी व तलाट्यानां हाताशी धरून कूळ नोंद चळवून घेतले.याची कुणकुण या तिन्ही गावातील भूमिहीनांना ही बाब कळताच तिन्ही गावातील भूमिहीन नागरिकानी एकत्रित येऊन वनजमीनवर अतिक्रमण करण्यासाठी एकवटले होते. याची माहिती मिळताच बामणी वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी व वनरक्षकानी भूमिहीन नागरिकांना अडवून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केले.परंतु अतिक्रमण धारक ऐकण्याचा मनस्थितीत नव्हते.मध्यस्थी साठी अतिक्रमण धारकांनी आविस पदाधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले.यावेळीआदीवासी विध्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम व आविस सल्लागार रवी सल्लम यांनी घटनास्थळी पोहोचून गावकरी व वनाधिकारी यांच्यामध्ये मध्यस्थी करून वनधिकाऱ्यांशी चर्चा करून समजूत काढले.
यावेळी वनाधिकाऱ्यांनी घर बांधकामासाठी वनजमीन उपलब्ध करून देण्यासाठी वनहक्क समितीमार्फत निवेदन करण्याचे व वनजमीनीवर अतिक्रमण केलेल्यांची अतिक्रमण रद्द करण्याची आश्वासन बामणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गौरकर व वनपाल मेश्राम यांनी दिले.तदनंतर अतिक्रमण धारकांनी समाधान व्यक्त करून आपापल्या गावाकडे परत गेले.
वनाधिकारी व आविस पदाधिकाऱ्यांची चर्चेदरम्यान तिन्ही गावातील अंदाजे पाचशे भूमिहीन नागरिक उपस्तीत होते.