Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > वणी विधानसभा आमदार संजिवरेड्डी बोदकुलवार याच्या नेतृत्वात कार्यकर्त्यासह झरी तहसिल परिसरात विज बिलाची होळी ..

वणी विधानसभा आमदार संजिवरेड्डी बोदकुलवार याच्या नेतृत्वात कार्यकर्त्यासह झरी तहसिल परिसरात विज बिलाची होळी ..

वणी विधानसभा आमदार संजिवरेड्डी बोदकुलवार याच्या नेतृत्वात कार्यकर्त्यासह झरी तहसिल परिसरात विज बिलाची होळी ..
X

म मराठी न्यूज टिम

प्रतिनिधी, पुरुषोत्तम गेडाम

यवतमाळ / झरी जामणी

कोरोना मुळे लॉकडाउनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ विजबिले आली.शेतकरी,मजूर,सामान्य नागरिकांचे आर्थिक नियोजन बिघडले मोठ्य प्रमाणात आर्थिक नुकसान सुद्धा झाले. या महाविकास आघाडी सरकारने १०० युनिट पर्यंतचे राज्यातील सर्व नागरिकांचे वीज बिल माफ करू अशे आश्वासन दिले होते.फसव्या सरकारच्या लबाडी मुळे वीज बिल माफ आजूनपर्यंत झाले नाही.शासनाने लॉकडाऊनची अंमलबजावणी केल्यामुळे जनतेची सर्व कामे खोळंबली,जनजीवन विस्कळीत झाले आहे, सामान्य जनता अत्यंत आर्थिक अडचनीत आहे, त्यामुळे लॉकडाऊन काळातील शासनाने विज बील माफ करावे, महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वास घात,फसवणूक केला या सरकारच्या 'त्रिसुत्रि' सत्तेला जागे करून सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी आमदारांच्या नेतृत्वात तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने वीज बिलाच्या होळीचे आंदोलन करून जो पर्यंत लॉकडाऊन च्या काळातील वीज बिल माफ होणार नाही,तो पर्यंत आंदोलन करण्याचा भारतीय जनता पक्षाचे वतीने इशारा फसव्या सरकारला देण्यात आला. या मागणीसाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांच्यासह तालुका भाजपाच्या वतीने तहसील प्रांगणात वीज "बिलाची होळी" करून शासनाचा निषेध करण्यात आला.

यावेळी संजिवरेड्डी बोदकुलवार (वणी विधानसभेचे आमदार), राजेश्वर गोड्रावार,(पंचायत समिती सभापती झरी (जा),लताताई आत्राम(पंचायत समिती सदस्य),सतीश नाकले (भाजपा अध्यक्ष),सुरेश मानकर,बरेच भा.ज.पा.पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी :- पुरुषोत्तम गेडाम

मो.9763808163

Updated : 24 Nov 2020 6:04 PM GMT
Next Story
Share it
Top