Home > विदर्भ > वणी -घुग्गुस मार्गावर एकाच बाजुने जाणार्या दोन वाहनात भिषण अपघात

वणी -घुग्गुस मार्गावर एकाच बाजुने जाणार्या दोन वाहनात भिषण अपघात

वणी -घुग्गुस मार्गावर एकाच बाजुने जाणार्या दोन वाहनात भिषण अपघात
X

वणी शहर प्रतिनिधी :- स्नेहल अ. चौधरी

शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या, पुनवट-घुग्गुस मार्गावर एकाच दिशेने जाणार्या दुचाकीला मागुन येणार्या कार ने जोरदार धडक दिली यात ,एकाचा मृत्यु तर एक जखमी झाला आहे. ही घटना नायगाव -बेलोरा,रस्त्यावर झाली.

तालुक्यातील पुनवट येथील रहिवासी असलेले, दिनकर उकिनकर(61)हे त्यांच्या स्कुटी क्रमांक एम.एच29 बि आर 2352 या वाहनाने घुग्गुस ला जात होते. यावेळी यवतमाळ येथील राहुल जिरापुरे (35), हे राजुरा कडे जात होते . यामध्ये मागुन दिलेल्या कारच्या धडकेत स्कुटीचालक रस्ता दुभाजकावर आदळले आणी कार ही रस्त्यावर पलटी झाली . समोरील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.

Updated : 26 Oct 2020 3:56 PM GMT
Next Story
Share it
Top