Home > विदर्भ > लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक श्री गजानन पटोकार सर व त्यांच्या सहकांर्याना निरोप व सत्कार समारंभ

लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक श्री गजानन पटोकार सर व त्यांच्या सहकांर्याना निरोप व सत्कार समारंभ

लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक श्री गजानन पटोकार सर व त्यांच्या सहकांर्याना निरोप व सत्कार समारंभ
X

लोहारा :- आज दिनांक ५ सप्टेंबर 2020 ला शिक्षक दिनाचे औचित्य साधून लोहारा केंद्रातील सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांचा निरोप व सत्कार समारंभ लोहारा केंद्राच्या वतीने घेण्यात आला.सेवानिवृत्त झालेले श्री. गजानन वसंतराव पटोकार उच्चश्रेणी मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख केंद्र शाळा लोहारा (सपत्निक)

कुमारी मधुमती शितलदास अडचित्रे सहाय्यक शिक्षिका लोहारा श्री .डी व्हि तळोकार सर मुख्याध्यापक राधाबाई बकाल विद्यालय लोहारा श्री कोकाटे सर सरस्वती विद्यालय कळंबी महागाव श्री .डॉक्टर संतोष जी मिश्रा यांना शाल ,श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गौतम जी बडवे साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बाळापूर हे होते .तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री अजय बांडी साहेब विस्तार अधिकारी पंचायत समिती बाळापूर, धम्मपाल मोरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती केंद्र शाळा लोहारा ,सलिम भाई देशमुख सरपंच लोहारा ,श्री मुरलीधर जी अहिर ,श्री रवींद्र समदूर केंद्रप्रमुख निंबा , श्री संजय भाकरे मुख्याध्यापक मांजरी,श्री मनोहरराव अवचार मुख्याध्यापक कसुरा ,श्री शहबाज भाई देशमुख पत्रकार लोहारा, संतोष मोरे पत्रकार लोहारा .श्री. राजेश तायडे मुख्याध्यापक निंबी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.सर्वप्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली .नंतर आलेल्या मान्यवरांचे शाल ,श्रीफळ व पुष्पहार घालून स्वागत सत्कार करण्यात आला .आपल्या प्रास्ताविकातून श्री लोड सर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली. मान्यवरांनी आपल्या मनोगतामधून सत्कार मूर्ती यांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव केला .चारही सत्कार मूर्तींनी आपण केलेल्या अखंड सेवेचा सर्वांसमोर अनुभव शेअर केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले सध्या covid-19 चा .प्रादुर्भाव असल्यामुळे सोशल डिस्टंसिंग च्या नियमाचे पालन करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रायबोर्डेे सर व आभार प्रदर्शन श्री भगत सर यांनी केले.

संतोष मोरे म मराठी न्यूज

Updated : 8 Sep 2020 9:01 PM GMT
Next Story
Share it
Top