Latest News
Home > लेख > 1मे महाराष्ट्र दिन : विशेष लेख !

1मे महाराष्ट्र दिन : विशेष लेख !
"जय जय महाराष्ट्र माझा,

"गर्जा महाराष्ट्र माझा "

राजूरा (चंद्रपूर) - आज १मे महाराष्ट्र दिन ! या दिना निमित्ताने सहजं सुचलंच्या जेष्ठ सदस्या संजीवनि धांडे यांनी शब्दांकित केलेला लेख खास वाचकांसाठी देत आहाे ! आपण 1मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. 1मे 1960रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.म्हणुन हा दिवस साजरा केला जातो. परंतु मुंबई सह आपलं राज्य आपाल्याला सहजासहजी मिळाल नाही.असंख्य चळवळी,उठाव करावे लागले,अनेकाना शहीद व्हावे लागले,लोकांमधली मराठी अस्मिता जागृत करावी लागली.त्या सर्व गोष्टींची नवीन लोकना जणिव व्हावी म्हणून साजरा केला जातो............

..........मुंबई हे भारतातील एक महत्वाचे शहर आणि महत्वाचे बंदर म्हणून प्रसिध्द आहे,अणि हे ब्रिटिशांच्या देखरेखेखाली होते. .........1917मध्ये भाषावार प्रांत रचना करण्याची कल्पना "लोकशिक्षणा "या मसिकातून मांडल्या गेली होती.
त्यात मुंबई प्रांत,मध्य,व-हाड,आणि हैदराबाद येथे विखुरलेले मराठी भाषिक एकत्रित करून महाराष्ट्राची निर्मिती अपेक्षा होती. 12मे 1946रोजी मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र संबधीचा ठराव मांडण्यात आला.त्यासाठी शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली या मागणीला चालना देण्या साठी लगेचच सर्व पक्षीय महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली. परंतु दार समिती व जे.व्ही.पी. समिती यानि भाषावार प्रांत रचना भारताच्या एकात्मतेच्या द्रुष्टीने योग्य नसल्याचे सांगितले व ती मागणी फेटाळून लावली. राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीना काही मराठी आणि गुजराती भाषिकां कडून होणारा विरोध शमविण्यासाठी 9नोव्हेंबर 1955रोजी कॉग्रेस कार्यकर्नीने "त्रिराज्य सुत्र "सुचविले. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले.त्यामूळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.ईतर कम्युनिस्त,सोशालिस्ट व प्रजा समाजवादी पक्षाचे डावे पुढारी व पक्षांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला.सेनापती बापट,एस.एम.जोशी,प्राचार्या अत्रे,कॉ.श्रीपाद डान्गे ,शाहिर अमर शेख,प्रबोधनकार ठाकरे हे सर्व चळवळीतील महत्वाचे नेते ठरले.शाहिर अमर शेख,शाहिर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या कलाविष्कारने (स्फुरण गीत,पोवाडे गाऊन)मराठी अस्मिता जागृत केली. पण तत्कालिन केंद्र सरकारच्या मनात काही वेगळेच विचार शिजत होते.16जानेवारी 1956रोजी मुंबई हा केंद्र शाषित प्रदेश असेल,अशी घोषना केली.कारण मुम्बई ही महाराष्ट्राला न देता गुजरातशी जोडायची अशी योजना होती. परंतु या निर्णयाच्या निषेधार्थ कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाऊंताना समोरील चौकात येण्याचे ठरले .त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजुने,गगन भेदी घोषणा देत निघाला......."मुम्बई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ".......हे आंदोलनाचे घोष वाक्य बनले. मोर्चा पोलिस ताकद लवून उधळून लावण्यासाठी लाठी चार्ज करण्यात आला,मात्रा अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले.त्यानंतर त्यावेळेस चे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी आंदोलकांवर गोळी बार करण्याचे आदेश पोलिसांना दिले,अंदोलन चिरडून टाकणे,ही त्यांचीच योजना होती.मुम्बई महाराष्ट्राला न देता गुजरातला देणे ही योजना त्यांचीच होती,कारण मुंबई हे देशाच आर्थिक शहर आहे ते जाऊ द्यायच नाही,ही सुप्त इच्छा त्यांची होती.त्या आंदोलनात105आंदोलक शहीद झाले. या हुतात्म्यांच्या बलिदना पुढे व मराठी माणसाच्या अंदोलना मुळे सरकारने शेवटी नमते घेतले.....व 1मे 1960रोजी मुम्बई सह संयुक्त महाराष्ट्रची घोषना करण्यात
आली............................. अशा प्रकारे 1मे 1960रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्त मेढ रोवल्या गेली.पंडीतजिनी युवा,संयमी,मितभाषी,हुशार बहुअयमि अशा यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल कलश दिला,अणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली...............

अणि अशा प्रकारे आज अपण मुम्बई राजधानी असलेल्या महाराष्ट्राचे एक घटक आहोत......,"त्या हुतात्म्यांच्या बलिदनाची आपल्याला आठवन राहावी अणि अपण आपली मुंबई व आपला कणखर महाराष्ट्र अबाधित राखावा.....म्हणून दरवर्षी 1मे हा दिवस साजरा करतो........जय महाराष्ट्र जय शिवाजी.....लेखन : सौ.संजीवनि धांडे/पिंपळ्कर ,टिचर्स कॉलनी राजुरा सहज सुचलं व्यासपीठ.

Updated : 1 May 2021 1:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top