Latest News
Home > लेख > मी गेल्यावर तू व्यक्त होशील का!

मी गेल्यावर तू व्यक्त होशील का!

मी गेल्यावर तू व्यक्त होशील का!
X

म मराठी न्यूज नेटवर्क


---------------------------------------------

नसेल त्यावेळी कोणीही माझी आठवण काढणार,

अनेकांच्या सोबत एकजन गेला अशी मनाची समजूत काढणारे,

जिवंत असताना देखील नसतो कोणाला इतका वेळ,

मेल्यावरी कुठला सूर्योदय आणि कुठला सूर्यास्त,

पण तू व्यक्त होशील अशी आशा आहे मला,

दाटून येईल कंठ जेव्हा तुझा आठवणीच्या हिंदोळ्यावर ती,

व्यक्त होशील तेव्हा अश्रूंना सोबतीला घेऊन,

आठवणी होतील तेव्हा त्या ताज्या,

नदीच्या खळाळत्या पाण्यात पोहण्याची मस्ती करताना,

अर्धा अर्धा आंबा खाताना, एकाच ताटात जेवताना, गोल-गप्पे पाणीपुरी भेळ पुरी खाताना,

दारू पिल्या ची कळताच लांब धारच

नाक तुझं मुरडताना,

पण काळजीपोटी भरपेट जेवायला घालताना संध्याकाळच्या वेळी!

तुझं रुसणं तुझं हसणं त्या क्षणाक्षणाला,

मला एकटेपणा भासू देत नव्हता.

पण तू गेलीस अचानक,मला न सांगता

अनेक वेळा रात्री हसत आहेत,

अजून कसा जिवंत साक्ष देत आहेत.

पण आता काळाने त्याची सीमा

ओळखली आहे.

रात्र रात्र भर जागणारे डोळे उगाचच कुणाची तरी चाहूल लागल्याचा भास होतो,

आणि क्षणभर तू असल्याचा भास होतो.

वाळवंटी प्रदेशातील वलयांकित,

पाणी असलेल्या,भुगर्भा सारखा,

आज तु हवी होतिस किमान जाता जाता

डोळे भरून पाहण्यासाठी,

पण आता सरणावरती जाताना किमांन,

व्यक्त व्हावीस एवढीच अपेक्षा!

तू आंबा खाताना,नदीकिनारे आंघोळ करताना,

गोल-गप्पे भेळपुरी पाणीपुरी खाताना,

भांडण करताना रुसताना अन नाक मुरडताना,

विधी महाविद्यालयाच्या कॉलेजच्या कट्ट्यावर च्या पाठीमागील बाकड्यावर ती गळ्यात पडून रडताना,आठवणीच्या हिंदोळ्यावर ती व्यक्त होण्याकरता तू पुन्हा एकदा हवी आहेस,

मी गेल्यावरती,कायमचा!

कुणी तरी व्यक्त व्हावा यासाठी,

तुझ्या रूपाने!

--------------------------------------------

तानाजी कांबळे.

Updated : 12 May 2021 11:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top