Latest News
Home > लेख > स्वतःचे लहान मुलाला झाडाखाली सोडून जाणारे, महाराष्ट्रातील सांगलीचे थोर स्वातंत्र्यसेनानी.

स्वतःचे लहान मुलाला झाडाखाली सोडून जाणारे, महाराष्ट्रातील सांगलीचे थोर स्वातंत्र्यसेनानी.

स्वतःचे लहान मुलाला झाडाखाली सोडून जाणारे, महाराष्ट्रातील सांगलीचे थोर स्वातंत्र्यसेनानी.
X

---------------------------------------------

"ब्रिटिश कालीन पोलिसांच्या अटके वेळी,स्वतःचे लहान मुलाला झाडाखाली सोडून जाणारे, महाराष्ट्रातील सांगलीचे थोर स्वातंत्र्यसेनानी ब्रिटिश कालीन पोलिसांच्या अटके वेळीस्वतःचे लहान मुलाला

झाडाखाली सोडून जाणारे, महाराष्ट्रातील सांगलीचे थोर स्वातंत्र्यसेनानी सुपुत्र दिवंगत

डॉ.कृष्णा तुकाराम हिंगमिरे".


▬▬▬▬▬ஜ *म मराठी न्यूज* ஜ▬▬▬▬▬


लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे.

रविवार विशेष, दिनांक 2 मे 2021

--------------------------------------------------

संथपणे वाहणाऱ्या वारणा नदीच्या पैलतीरावरील सांगली या जिल्ह्याची ओळख, स्वातंत्र्यासाठी भरीव योगदान देणार यांच्यापैकी एक आहे.


त्यावेळी1942 चे साल उजाडले होते. स्वराज्याची चळवळ शिगेला पोहोचली होती. करेंगे या मरेंगे या गांधीजींचे हाकेने,अवघा देश पेटून उठला होता.तत्कालीन सातारा जिल्ह्याने अभूतपूर्व लढा दिला.

गावोगावचे तरूण भूमिगत होऊन इंग्रजांना सळो की पळो, करुन त्यांनी त्यावेळी सोडले होते. असाच एक वेडा वीर भरल्या घरातून बाहेर पडला; स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून!

सांगलीच्या राष्ट्र सेवा दलात सच्चे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. लिंगायत समाजाचे आद्यप्रवर्तक, थोर तत्वज्ञ, चिंतक, समाज सुधारक,श्री बसवेश्वर अण्णा,यांच्या विचाराने आपली आध्यात्मिक वाटचाल करणारे डॉ.कृष्णा तुकाराम हिंगमिरे,होय.


हे नाव,महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढा च्या अभूतपूर्व अशा यशामध्ये लाभलेला,हा एक सुपुत्र. सांगली जिल्ह्यातील रेठरेहरणाक्ष तालुका वाळवा येथील,ते सुपुत्र होय.


डॉ. हिंगमिरे यांचे एक छोटेसे किराणा मालाचे दुकान होते त्यांना कोणी करते अथवा मिळवते कुणीही दुसरे नव्हते.त्यांच्या पत्नी त्यांचे दुकान चालवत असे. देशसेवेच्या वेडाच्या भरात डॉ. हिंगमिरे यांनी, स्वातंत्र्यासाठी फकिरी पत्करली होती.


त्यांच्या या,फकिरी मुळे अल्पावधीतच त्यांना त्यांचा संसार प्रपंच हा,आटोपता घ्यावा लागला होता.आंदोलनात सहभाग झाल्यामुळे,डॉक्टरांची रुग्णसेवा अल्पावधीतच बंद पडली गेली.किराणा मालाचे त्यांचं ते छोटेसे दुकान डबघाईला आले होते.

जीवनचरित्र अर्थ चालवण्याची भ्रांत निर्माण झाली होती.डॉ हिंगमिरे यांचे भूमिगत राहून स्वातंत्र्यासाठी योगदान सुरूच राहिले होते.

आधी मध्ये पोलिसांचे लक्ष चुकवून ते आपल्या घरी नकळतपणे भेट देत असत,पण काही अल्प क्षणासाठी.


भूमिगतांच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलिस यंत्रणा जंगजंग अनेकांना पछाडत होती. डॉ. हिंगमिरे यांच्या पाठीमागे पोलिसांचा ससेमिरा कायम होता.अशा भयंकर वातावरण व तणावग्रस्त परिस्थितीमध्ये डॉ.हिंगमिरे यांच्या पत्नी गर्भवती राहिल्या होत्या.


त्यांची रवानगी एका मॅटर्निटी हॉस्पिटल मध्ये केली होती.

प्रसुतीचे दरम्यान त्यांना एक मुलगा झाला होता. मात्र अल्पावधीतच त्या मुलाची आई ही काही कारणाने मृत पावलेल्या गेल्या.

उपजत बाळाच्या अल्पावधीत काळामध्ये त्याच्या मातृत्वाचा झालेला मृत्यू,डॉ.हिंगमिरे यांच्या मनाला चटका लावून जाणारा होता. मात्र,स्वातंत्र्यासाठी, स्वतःचे घरावरती तुळशीपत्र ठेवणाऱ्या डॉ.हिंगमिरे यांनी एक दिवस आपल्या जन्मदात्या बाळाला भेटण्यासाठी दवाखान्याची पायरी चढले.

या गोष्टीची कुणकुण त्यावेळी,पोलिसांना लागली, डॉ.हिंगमिरे आपल्या बाळाला पाहण्यासाठी आलेले वेळी,डॉ हिंग मिरी यांना त्या वेळी पोलिसांनी अटक केली.


निधड्या छातीचे व लढाऊ बाण्याचे डॉ.हिंगमीरे पोलिसांनी अटक करताक्षणी अजिबात घाबरले नाहीत.आपल्या लहानशा लेकराला त्यांनी छातीशी कवटाळत,आपण स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले होते.


लहान बाळाचा त्यावेळचा आक्रोश,चिरकाळ वेदना फाडणारा होता.डॉक्टर हिंगमिरे यांनी आपल्या बाळाला आपल्या बरोबर घेऊन घेऊन पोलिसांच्या सोबत गेले.घरात बाई माणूस कोणी नाही,त्या मुलाची आई नुकतीच दिवंगत झाली होती.या तान्हुल्या मुलाचा सांभाळ कोण करणार?असे नानातर्‍हेचे प्रश्न डॉक्टर हिंगमिरे यांच्या मनात घोंगावत होते.


थोड्याच वेळात मामलेदार कचेरी आली. मामलेदार कचेरी च्या समोर फाटका बाहेर

एक लिंबाचे मोठे झाड होते. त्याचा लिंबाच्या झाडाखाली डॉ. हिंगमिरे यांनी आपल्या एकुलत्या एक बाळाला लिंबाच्या झाडा खाली ठेवत, आपले अंतःकरण पिळवटून ते म्हणाले की,"हे धरणीमाते हे मूल तुझंच आहे,तूच त्याचे रक्षण करत आहेस, तूच त्याला सांभाळ,मी जातो" असे म्हणत या थोर स्वातंत्र्य बहाद्दराने, इन्कलाब जिंदाबाद भारत माता की जय!

अशा घोषणा देत स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले होते.


देशाच्या सेवेसाठी स्वातंत्र्य मिळावे या प्रांजळ हेतू पोटी, स्वतःचं लेकरू, लिंबाचे झाडाखाली सोडून जाणारे डॉ. हिंगमिरे यांच्या सारखी व्यक्तिमत्व,लाखोंच्या मांदियाळीत भरलेल्या भरगच्च गर्दीमध्ये,अपवादात्मकच सापडली तर नवल.

पुढे त्या मुलाचे काय झाले याचा कोणत्याही प्रकारचा थांगपत्ता डॉक्टर हिंगमिरे हयातीत असेपर्यंत लागला नाही,की ते देवा घरी जाण्याच्या नंतर देखील लागला नाही.

डॉक्टर हिंगमिरे म्हणजे मध्यम उंची काळा सावळा रंग अंगावर स्वतः सूचक ताई करून विणलेल्या जाड्याभरड्या खादीचा हाफ शर्ट, त्यावर गर्द तपकिरी रंगाचे जाकेट आणि वरती डोक्याला गांधीटोपी,असा राष्ट्रसेवा दलातील बिन इस्त्रीचा डॉ. हिंगमिरे यांचा प्रवास खूपच लक्षनिय व लक्षवेधी ठरणार होता.


पुढे हा देश स्वातंत्र्य झाला पण डॉ.कृष्णा हिंगमिरे यांची प्रखर देशभक्ती किंचितही मंदावली नाही. गांधीजींचे ते एकनिष्ठ अनुयायी होते. क्रांती सिंह नाना पाटील यांचे ते सच्चे सहकारी होते.


स्वातंत्र्यदिनी ते सांगलीच्या गांधी पुतळ्या समोर बसून सूतकताई करत असल्याचे अनेकांनी त्यांना पाहिले आहे.

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण,वसंत दादा पाटील यांचे सह थोरामोठ्यांच्या बरोबर त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले होते.


डॉक्टर हिंगमिरे यांच्या उतरत्या काळात काही व्याधीमुळे त्यांची दृष्टी केली होती. विविध आजार, यांनी त्यांना जखडून ठेवले होते.

त्यांचा मानसपुत्र तच तथा त्यांचा पुतण्या शंकर याने त्यांचा शेवटपर्यंत सांगोपांग केला होता. आयुष्यातील उतारवयात आलेल्या अनेक बिकट प्रसंगांना तोंड देत देत, हिंगमिरे यांची प्राणज्योत अखेर मालवली.

असा हा भारत मातेच्या स्वातंत्र्य वीरा पैकी एक सुपुत्र आज हयातीत नाही.


मात्र, समाजाच्या स्मृतीपटलावरतीदेखील ते आज दिसून येत नाहीत ही बाब अतिशय खेदाची व चिंताजनक आहे. देश सेवा आणि ईश्वर सेवा ज्यांचा आयुष्यभर ध्यास होता, त्यांच्या जीवनाची आयुष्यभर फरफट झाली होती. दुर्दैवाने अशा कर्तबगार माणसाची दखल कोणी घेतली नाही.

ना समाजाकडून ना शासनाकडून ना चिरा, पणती ना छायाचित्र,अशा अवस्थेमध्ये त्यांच्या आदर्शाचा स्मृतिगंध वारणा नदीच्या पैलतीरावर ती, सातत्याने,पिढ्यानपिढ्या साठी दरवळत राहावा,एवढीच त्यांच्याप्रती सदिच्छा!

Updated : 2 May 2021 3:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top