Latest News
Home > लेख > माणसाने माणसाला ठेवलंय कोंडून!

माणसाने माणसाला ठेवलंय कोंडून!

माणसाने माणसाला ठेवलंय कोंडून!
X


-------------------------------------------------

तानाजी कांबळे/26 एप्रिल 2021.

सोमवार विशेष.8080532937.

--------------------------------------------------

माणसाने माणसाला ठेवलंय कोंडून!

लावून घराच्या बाहेर,कडा हत्यारबंद पहारा!

फिरतोय गल्लोगल्ली रस्तोरस्ती दारोदारी,

अदृश्य एखाद्या चेटकिनी,सारखा हाडळ सारखा करता येत नाही त्याच्यावर

लिंबू मिरच्या सारखा,आघोरी करणी चा प्रकार,उपराटया पायाच्या,काळ्या रंगाच्या पिसाच्या कोंबडीला कापून!

mansane Mansa La theatre kondur

असं काही केल्याचे समजताच,पडतील जथेच्या जथे बाहेर घरातून!विचारतील लगेच'श्रद्धाळू चेटकिणीला अंधश्रद्धाळू कोंबडीच का,आणि ती ही उफराट्या पायाची,काळीच का द्यायची कापून!

पुण्याच्या सोमवार पेठेचा नदी पुलावर ती,

असाच दिला गेला बळी विवेकवादाचा!

कोल्हापुरातल्या राजारामपुरी चे उद्यम नगरी च्या पिछाडीस असणाऱ्या,रस्त्यालगत,

विवेकवादी दांपत्याचा दिला गेला होता बळी.

अंगा-खांद्यावर ती गोळ्यांच्या फैरी झाडून!

या आणि अशा कित्येक दृष्य वादी शक्तींना,

त्या आदृश्य विचाराच्या गल्लोगल्ली

दारोदारी फिरणाऱ्या,चेटकिनी सारख्या

दिसणाऱ्या हडळ सारखे दिसणारे,

अविवेकवादी त्याही वेळी बसले होते घरात लपून,आज तर घरा बाहेरच्या,

हत्यारबंद पहाऱ्यात बसलेत दडून!

अशा अनेक प्रकारच्या विवेकवादी आजाराने,

अगोदरच गेल्यात सगळीच कोलमडून,

बंद घराच्या आत,घराबाहेरील हत्यार बंद,

बंदोबस्त अंगावरती घेऊन!

त्यावेळी वाजवल्या गेल्या टाळ्या आणि शिट्ट्या हळूच सायंकाळचे वेळी,टाळी

वाजवून लाईट घालवून!

गल्लोगल्ली रस्तोरस्ती दारोदारी ती,

अदृश्य हढळ चेटकीण,गेली वर्षभरामध्ये हळूहळू निघून!चेटकीण होती ती,

आई म्हणाली तुला उतारा द्यावयाचा गेला राहुन!घरा पाठीच्या परसदारात असणाऱ्या

आंब्याच्या झाडाखाली,काळ्या रंगाच्या उफराट्या पायाचीकोंबडी,कापावयाची

गेली होती राहून!

त्या झाडाखालच्या बुंध्या खाली ,

त्या कापलेल्या कोंबडीचे दोन पाय,

डोकं,छोटसं भाजलेल्याकाळजाचा तुकडा,

निवद बनवून ठेवायचा गेला राहून!

आता मात्र ती जाम गेलीय भडकून!

आता मात्र ती पुन्हा फिरू लागली घरोघरी दारोदारी गल्लोगल्ली रस्तोरस्ती,शेतवाडी च्या आडवाटेला असणाऱ्या सेकंड शेतमळा च्या घरावर,जाऊ लागली प्रत्यक्ष बघून!

गर्दी खेचणाऱ्या तीन पत्ती डावाच्या ठिकाणे,

एका वाटीत असल किक देणाऱ्या गावठी दारू

विकणार्‍या त्या सत्तू मांगाच्या च्या मांग वाड्यावरून,ओठावरती भरगच्च लाली लावून,

हातातल्या छोटे खानी असणाऱ्या,

आरशाकडे सतत निहाळ नाऱ्या

त्या वारांगना,वेश्या यांना गेली बघून!

गावातल्या गुरुवा वाचा दामुअण्णा,

भल्या पहाटे लावणारा डावा उजवा कौल,

आणि या कौलामुळे तिच्याविषयी

होणारा सततचा गैरसमज, तिच्या लक्षात येताच,तिने दिला चांगलाच दम तुला

घेतो बघून,देवाला कायमचे कुलूप लावून!

तिला अळवण्यासाठी अनेक लोक

कलाकारांची रात्रीची होणाऱ्या तालीम,

व आधी मधी,लोक कलाकारांना मिळणारी

सुपारी,देखील तिने घेतली हिसकावून,

कारण तिच्यासाठी रात्रीचे बारा नंतर,

कुणी गावयास आली नाहीत धावून,

सण आला सण खाऊ देणार नसला

चा तिने धरला मनाशी अट्टाहास,

यात अनेक बलुतं दारांचे धान्याने भरलेली

तट्टी गेले रिकामी होऊन!

शिंदेच्या आळीचे धरणावरती तिचं

लक्ष आहे बारीक नजर ठेवून!

आता तीन ईक नवा उद्योग सुरू केलाय,

बंद दाराआडच्या,बाहेर,ओळख दाखवणाऱ्या पासाच्या रूपाने फिरणार यांच्या,अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली,कधी कधी वाढीव वीज बिल देणार्‍या त्या साहेबाच्या मानेवरती बसते जाऊन,घराच्या पत्त्यावर ती,नोटिशीचा रूपाने,

येऊन राहत विज बिल वाढून,

थकबाकीमुळे कनेक्शन नेणार कापून!

वर्षाकाठी नव्यानं आणलेल्या,मारुती मॅक्स पिकप गाडी ला,लिंबू मिरच्या न बांधल्याचे तिच्या लक्षात आल्याने,थेट जाऊन बसते बँकेच्या मॅनेजरच्या,डोक्यात वसुलीचे भूत जबरदस्तीने घालून!

वशिल्या वरती अत्यावश्यक सेवेचा

पास घेऊन फिरणार्‍या त्या,

अनेकांच्या मानगुटीवर ते बसते जाऊन,

अन पास नसणारे अनेकांना ती घेऊन जाते

रस्त्यावरच्या पहारे दारांच्या,टापूत!

मग शिरते पहारेकर्‍यांच्या डोक्यात,

बारा हत्तीचं बळ संचारलंगत,

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील

बारा पाटलांचे एकजुटी सारख्या,

बारा पाटलांच्या एकजुटीच बळ,संचारत

तयांच्या अंगात त्यावेळी!

मग बोलू लागतात पहारेकरी,

तुझं नाव काय?तुझं नाव काय?

आंन देतात ते अनेकांना विदर्भातील

"लंगर" चा प्रसाद!

सागवानी काठी ला तेल लावून,हाताच्या कोपरा पासून ते,पायाच्या ढोपरापर्यंत काढतात सोलून व हाती देतात "लंगरचा" प्रसाद

हाती ठेवून!

म्हणून म्हणतो बा विठ्ठला,थळोबा म्हसोबा, गावाच्या वेशी वरचे आई,मेथीच्या मळ्यावर चे, रखवालदार बाई,अण शांत पणे आमचे घराच्या पाठीमागे सापाच्या रुपाने राखणदार करणारी तू,63 खेड्याची आई,येणाऱ्या उगवती अमावसेला,सायंकाळच्या वेळी घराचे परसदारा पाठीमागील आंब्याच्या बुंध्या खाली,केळीच्या पानावरती काळ्या रंगाच्या केसाची उफराट्या पायाची,कापतो तुला एक कोंबडी,

अण् ठेवतो केळीच्या पानावर ती प्रसाद म्हणून,त्या कोंबडीचे दोन पाय, काळीज गांजा,

जोरदार किक बसणारी,अस्सल किक देणारे गावठी ची कप बर दारू,जाईन मी ठेवून!

तशीच आल्या माघारी तूही निघून विवेक वाल्यांच्या अविवेक बुद्धीच टोमणा सहन करेन मी तुझ्यासाठी!

बा विठ्ठला, खंडोबा म्हसोबा आमचे लेकरा बाळा चि कूस वाढू दे चांगली.

सारी रोगराई हटू दे,तुझ्या नावाचा,

जय जय कार असो,चांगभले च्या गजरात वाजत-गाजत जाऊन!

----------------------------------------------

Updated : 26 April 2021 6:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top