Latest News
Home > लेख > जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो..!

जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो..!

जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो..!
X

लेखक.श्री. तानाजी सखाराम कांबळे.


चंद सिक्को के लिये,तुम ना करो काम बुरा!

ना करो काम बुरा!ना करो काम बुरा!

हर बुराई का होता है,अंजाम बुरा!

जुर्म करने वालों की,होती है सदा मौत यारो !

जो ना सच कहते है,वो ऐसा ना बुजदिल होगा!

जिंदगी मौत ना बन जाये,संभालो यारो!

हो रहा चैन अमन,

मुष्कीलो मे है वतन,

सरफरोशी की तमन्ना दिल में,

जलालो यारो!

जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो!

..................................................................

मानवी जीवनातील सामाजिक मूल्य जपणे ही आपल्या देशाची ऐक्याची अस्मिता आहे.हे ऐक्य टिकून राहण्यासाठी या देशातील सामाजिक, राजकीय,धार्मिक,वैचारिक अखंड चळवळ जिवंत ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.सार्वजनिक जीवनामध्ये जेव्हा अस्थिरता निर्माण होतील त्यावेळी अशा एकतेचा आणि अखंडतेचा खूप मोठा उपयोग,सामाजिक मनोबल वाढविण्यासाठी होतो.मात्र जर यामध्ये घरचा भेदी असेल तर,अशा अखंडतेला,सामाजिक ऐक्याला,वैचारिक चळवळीला ब्रेक जाऊ शकतो.

केवळ स्वहित जोपासणे,सांभाळणे,आणि ते वाढवण्यासाठी आयुष्यभर झटणे या गोष्टी आता कुठेतरी थांबले पाहिजेत.

अशा अनेक घर भेदी यांना त्यांची जागा दाखवुन देणे ही देखील सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आता सर्वांच्या येऊन ठेपली आहे.यामध्ये असे कोणते घरभेदी आहेत तिचे सामाजिक जबाबदारीचे दायित्व अंगावर घेऊन पांढरपेशा पोशाखाचा आड,सरळ सरळ आर्थिक लूट करत आहेत,अशा घरच्याना वेळीच या सामाजिक पातळीवर हाकलून लावले पाहिजे.त्याने मांडलेल्या ज्ञानाचा बाजार,व पसरवलेला अज्ञानाचा अंध कार,वेळीच पुसून टाकला पाहिजे ज्यांना आपण देवाची दूत पाहतो असे हे शिक्षित दूत,केवळ आर्थिक लूट करण्यासाठी जर सामान्य,मध्यमवर्गीय जनतेला,

भीती घालत असतील तर तो गुन्हा,कदाचित देशद्रोहाचा गुन्हा पेक्षा अक्षम्य असा गुन्हा ठरेल........!

चंद सिक्को के लिये तुम ना करो काम बुरा,

हर बुराई का होता है सदा अंजाम बुरा!

या काव्यपंक्ती ची ओळख करून देणे अशा देशद्रोह्यांना काळाची गरज आहे.जगभरामध्ये पसरलेला covid-19 कोरोना आणि त्याचा भारत या देशांमध्ये झालेला प्रादुर्भाव, त्याच्यावरती सुरू असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या ठिकाणी उपाययोजना,यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुरू असलेली मोठ्याप्रमाणात करोडो रुपयांची लूट,मेलेल्या प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे सुद्धा,या वैद्यकीय क्षेत्रातील काहींनी दाखवलेली तयारी,औषध निर्माते कारखानदार, मेडिकल होलसेल डिस्ट्रीब्यूटर,तीच महागडी औषधे घ्यावयास लावणारे हे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ महाभाग

चंद सिक्को के लिए!

आपलं पांढरपेशा जीवन पैशाच्या राशीवर,ओढण्यासाठी धडपडताहेत,तळमळतआहेत.हा देशद्रोहह्याच्या गुन्हा पेक्षा अक्षम्य असा गुन्हा आहे.याची कदाचित त्यांना जाणीव नसेल मात्र,आपले हॉस्पिटलच मजले दर मजले करोडो रुपयाच्या वरती उभारणारे या महाभागांना,या देशाला मिळालेले,स्वातंत्र्य हे कोणी विकत घेऊन दिले नाही याची माहिती नसावी कदाचित.या देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे कुणा सावकार, कोणत्या श्रीमंत बागायतदारांचे नाही,या देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे,अनेकांनी आपल्या सुखी संसाराची राखरांगोळी करून मिळालेले आहे,अनेकांनी आपल्या अंगाखांद्यावर ती, बंदुकीच्या गोळ्या,झेललेल्या आहेत.

अनेकांनी हासत हसत आपल्या गळ्याला फास लावून घेतलेला आहे.अनेकांची घर'दार बायका-पोरं ही रस्त्यावर आलेली आहेत.ती कायमची,पिढ्या न पिढ्यासाठी!

जालियनवाला बाग हत्याकांडात अनेक गोर - गरीब लोकांचा जीव घेतलेला आहे,अनेक जणांनी आपले आयुष्य स्वातंत्र्यासाठी भूमिगत म्हणून काढलेल आहे.

या स्वातंत्र्य पायी अनेक चांगल्या घरातील लेकी,बाळी,सुना,यांची अब्रू वेशीला टांगली गेली होती.हजारो किलोमीटरचा प्रवास पायदळी राणा,माळात जंगल वाटेतन पायदळी तुडवत अनेक जणांनी स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले होते.शेवटचा लॉर्ड माउंटबॅटन आपल्या ऐतिहासिक दस्तऐवज यामध्ये लिहिताना असे म्हणतो की,जगातल्या अनेक देशांपैकी भारत असा देश आहे की,क्रांती साठी अनेकाणी आपलं स्वतःचं रक्त देखील सांडताना मागे पुढे पाहिले नाही!

अशा या ऐतिहासिक क्रांतिवीरांच्या बलिदानाने देशांमध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे,प्रत्येकाला अंतर्मुख करणारा लावणार आहे.या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशातील तमाम गोरगरीब,शेतकरी,विविध जाती धर्मातील अल्पसंख्यांक लोक, यांना एक माणूस एक मतदान या तत्वाखाली लोकशाही रुपी भारतीय संविधान,राज्यघटना डॉ.बी.आर.आंबेडकर यांनी दिली.देशाच्या विकासामध्ये योगदान देण्यासाठी पार्लमेंटरी बोर्ड तयार करण्यात आले,प्रादेशिक राज्यांना स्वतंत्रपणे अधिकार देण्यात आले,गोरगरीब,कष्टकरी,शेतकरी,मजूर,मध्यमवर्गीयांना, विकासासाठी आर्थिक द्वारे खुली करण्यात आलीत.

पानवठा वरती,महार,मांग,चांभार यांना पाणी प्यायचा अधिकार नव्हता,अशी अनेक पाणवठे सर्वांचे साठी खुले करण्यात आलेत!या देशातील सामान्य,गरीब,मध्यमवर्गीय,माणसाला मोफत शिक्षण घेता आले पाहिजे यासाठी सक्तीचा कायदा करण्यात आला.त्यावेळी कुठे शिक्षणाची दारे सगळ्यांचे साठी खुली झालीत,आणि त्याच शिक्षणाच्या माध्यमातून,अनेकांनी विद्वत्ता जोपासली,वाढवली,आणि ती पुढे टिकवली.

त्या पाठीमागे त्यांचे सामाजिक भान होते.लोकहिताच्या, वंदनेला ते,आदराचे स्थान देत होते,भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे त्यांचा पुनर्जन्म समजत होते.मात्र याच स्वातंत्र्य च्या माध्यमातून आज घडीला एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना,

वैद्यकीय क्षेत्रातील या पांढरपेशी,लोकांनी,

चंद सिक्को के लिये!......

करोडो रुपयांचे बांधलेले इमले,हजारो एकर घेतल्या जाणाऱ्या शेतजमिनी,करोडो रुपयेच दडवून ठेवलेले दस्तऐवज,

आज कोणत्या पांढरपेशा,स्वच्छतेचे प्रतीक मांडणार आहेत?

फुकट मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग ही मंडळी करू लागलेले आहेत.आपल्या इस्पितळांमध्ये ॲडमिट असलेल्या पेशंटचा तत्सम कारणाने मृत्यू झाल्यास,त्याचे पूर्ण पैसे काउंटरला भरण्याच्या अगोदर प्रेताची बॉडी देखील,नातेवाईकांच्या ताब्यात न देणारे असल्या हरामखोरी अवलादी,स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिले,

आपले रक्त सांडले त्यांच्या आत्म्यांना वरती स्वर्गात गेल्यावर काय उत्तर देणार आहेत हा एक मोठा प्रश्न आहे.

या लोकांची living of standard family"

हे फक्त आणि फक्त मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाऊनच वाढलेली आहे.सरकारकडून लाटल्या जाणाऱ्या जागा,त्यावर उभारणार वैद्यकीय महाविद्यालय,

विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या नावाखाली घेतले जाणारे करोडो रुपयेच डोनेशन,ते डोनेशन वसूल करण्यासाठी पुन्हा तोच डॉक्टर त्या करोडो रुपयांच्या पाचपटीने वसूल करण्यासाठी उभारणारे हॉस्पिटल,हा सर्व खेळ मानवी जीवनाच्या शोकांतिकेचा पलीकडचा आहे.

चंद सिक्को के लिए,

तुम ना करो काम बुरा!

इथे मात्र या पांढरपेशा अवलादी चंद पैशाला गोळा करण्यासाठी,आपल्या अनेक पिढ्यांचे वारसदार तयार करताना दिसून येत आहेत.ज्या थोर महापुरुष यांनी,या देशातील विविध राज्यांची विकासाची स्वप्ने बघितली होती, ती आज नुसतीच धुळीस मिळाले नाही तर ती लयास देखील गेली आहेत.

एका बाजूला पिण्याच्या पाण्यासाठी धायमोकलून रडणारी आक्रोश करणारी ती जनता,शेती उत्पादित मालाला पुरेसा भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात झाडाला फास लावून घेणारा तो शेतकरी,घरातल्या खुंटीवरती,नोकरी नसले मुळे घेतलेल्या पदवीची पिशवी अडकवुन ठेवणारा तो तरुण सुशिक्षित अभियंता,पदवीधर,त्याच्या शिक्षणा पायी त्याच्या आई बाबा वरती वाढत चाललेला कर्जाचा डोंबाळा,

नोकरी नसले कारणाने त्याचे वाढत चाललेले चाळीशी कडे वय,घरातील दोना-चे चार व चाराचे खाणारे झालेले आठ हात, घराच्या दारासमोर नेहमी फिरणारी,व्याज वसूल करण्याच्या अपेक्षेने पांडबा सावकाराची बुलेट,कर्जाला तारण म्हणून दिलेल्या शेतजमिनीच्या,कर्जाचे वसुली साठी,जाण्या-येण्यात चहा पाण्याचं,जेवणाखाण्याची अगोदरच वसुलीचा खर्च लावून दारात उभा टाकलेला तो बँकेचा शिपाई आणि ते साहेब पाहून,

त्या शेतकऱ्यांच्या अंगाच झुर झुरणारे पाणी,

त्याला शेतातील निष्क्रिय झालेल्या पिकाकडे पाहून एकाद, झाड शोधावं लागतं स्वतःला फास लावून घेण्यासाठी संपवण्यासाठी.

या त्यांच्या वेदना आता मुक्या झालेले आहेत,

त्यांच्या भावनांचा कंठच सुकून गेलेला आहे.

कारण या पांढरपेशा समाजांमध्ये

चंद सिक्कों के लिए ?

बुरा काम करणाऱ्यांची चलती सध्या वाढलेली आहे.

या पांढरपेशा दावणीला,बांधलेल्या जनावरागत

केंद्र व राज्य सरकार यांचे चालवणारे प्रतिनिधी,

मुक्या बैलाचे सोंग घेत आहेत,कारण त्यांना देखील हे पक्के माहीत आहे की,त्यांच्या बापजाद्यांचा देखील या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यात कोणताही हात नव्हता.या चंद सिकोके के लिए काम करणाऱ्या पांढरपेशा,प्रवृत्तीच्या विरोधात दुसर्‍या स्वातंत्र्याची लढाई करण्यासाठी आता प्रत्येकाला सज्ज राहावे लागणार आहे.आणि त्यांनी हे नक्की लक्षात ठेवावं की,

चंद सिक्को के लिये,

तुम ना करो कोई काम बुरा!

हर बुराई का अंजाम होता है सदा बुरा!

अंजाम बुरा,अंजाम बुरा!

जुल्म करने वालों को मिलती है,

सजा मौत यारो!

जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो!


लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे.

मोबाईल नंबर 80 80 53 29 37.

Updated : 13 March 2021 3:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top