Latest News
Home > लेख > बळीराजा,तुझ्या श्रमाचं मोल आम्हाला कधी कळलंच नाही!

बळीराजा,तुझ्या श्रमाचं मोल आम्हाला कधी कळलंच नाही!

बळीराजा,तुझ्या श्रमाचं मोल आम्हाला कधी कळलंच नाही!
Xबळीराजा,तुझ्या श्रमाचं मोल आम्हाला कधी कळलंच नाही!

.......................................................

कवी.श्री तानाजी सखाराम कांबळे.8080532937.

......................................................

बळीराजा,तुझ्या श्रमाचं मोल आम्हाला कधी कळलंच नाही!

पहाटे पहाटे उजाडल्या उजाडल्या गाई गुरांच्या शेना मुतात, राबणारा तुझा तो हात, हूड हूड णाऱ्या थंडीत गाई म्हशीची धार पिळताना,अनेकांच्या घरातील लेकरं बाळ गरम दूध पिताना, तुझा तो श्रम नारा हात आम्हाला कधी कळलंच नाही! मात्र त्याच श्रमणारे हाताला,घाण लागू नये म्हणून शेतकऱ्याच्या पोरा च्या ऐवजी नोकरदारांना दिलेल्या लगीन घरातील लेकीबाळी चे हाताला, गुराढोरांचे,ऐवजी श्रीमंत हौसेखातर बाळगलेल्या घराच्या दारावरती चपट्या नाकाच्या विलायती कुत्र्याची "शी" हौसेने काढायची वेळ कधी आली हे आम्हाला कधी कळलंच नाही!

बळीराजा तुझ्या श्रमाचं मोल आम्हाला कधी कळलंच नाही! अरे ही सारी तुझीच लेकरं,कुणी मोठा साहेब झाला, कोणी वकील झाला कोणी डॉक्टर झाला कोणी शाळामास्तर झाला,

तर,कोण मंत्रालयात मोठा साहेब झाला,मात्र तो भला मोठा शिकलेला साहेब,या व्यवस्थेचा गुलाम कधी झाला ते आम्हाला कळलच नाही! बळीराजा तुझ्या श्रमाचं मोल आम्हाला कधी कळलंच नाही! अरे तुझा राकटलेला चेहरा,मळलेला हात, पहाटेच्या थंडीमध्ये,शेताच्या बांधावर ती, या सरी वरून त्या सरी वरती तुटून गेलेल्या उसाच्या खोडव्याला पाणी पाजताना, दोन सरी उसाच्या पाणी प्यायल्या, खालचे तीन सरी आडव्या राहिल्या, शेतातील उसाच्या सरीचे 9 पाटकी पाणी प्यायले तर, पाजायची पाणी चार उभी-आडवी राहिलीथ, शे-दोनशे उसाच्या सरीचा असा आगळा वेगळा हिशेब जगाच्या बाजाराच्या गणितात कुठेही,असं अचूक उत्तर सांगणार गणित आम्हाला कधी कळलंच नाही!

मात्र सेहवाग,राहुल द्रविड,आणि सचिन तेंडुलकर यांची बॅट,आणि बॉल मोजता मोजता आयुष्य कधी निघून गेले आम्हाला कळलच नाही! बळीराजा तुझ्या श्रमाचं मोल आम्हाला कधी कळलंच नाही! तुझीच लेकरं ती,डाक्टर सारी,पांढऱ्या रंगाच्या कपड्याची सवारी,मात्र प्रचंड प्रमाणात पैसा मिळवण्याचे नादापाई, एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे पेशंटचा खिसा कधी कापू लागली हे आम्हाला कधी कळलंच नाही.

तुझीच लेकरं ती वकील सारी,काळा कोट अन, हातात इंग्रजीचं भलं मोठं पुस्तक लय भारी. सारखाच काळा कोट घालून,घालून त्यांची मन ही काळी किट झालीत हे आम्हाला कधी कळलंच नाही. बळीराजा तुझ्या श्रमाचं मोलआम्हाला कधी कळलंच नाही. पहाटे सकाळी हूड हूडणाऱ्या थंडीत,घरातल्या कोंबड्याने बांग दिली असता,रस्त्याकडेच्या आडवाटेच्या शेतावरती झपाझप, झपाझप ओढी ने चालत जाणारी तुझी ती पावले,आन,शेतामध्ये पडणाऱ्या कवळ्या उन्हाचं कडकडीत उन्हात रूपांतर झाल्यावर ती,घरातून न्याहारीचा डब्बा शेता कडील वाटेला घेऊन येणारी, तुझी ती कारभारीन, शेतावरच्या बांधावर ती उंच असे मोठाले सावली चे झाड बघून,सांजचीच भाकर सकाळी मोठ्या,चवीन दोघांनी मिळून खाऊन पुन्हा शेताच्या कामाला राबणाऱ्या, तुझ्या त्या श्रमाचे मोल आम्हाला कधी कळलंच नाही!

मात्र तुझ्या नावाखाली आज-काल,तीच भाकर, चुलीवरची भाकर म्हणून काळी भाकर म्हणून, पांढरी भाकर म्हणून,भाजलेली भाकर म्हणून,शे-दोनशे ला मोठमोठ्या हॉटेलात कधी विकू जाऊ लागली, आम्हाला कधी कळलंच नाही!

बळीराजा तुझ्या श्रमाचं मोल आम्हाला कधी कळलंच नाही!

तूच पिकवतो ना शेतातील सर्व लहान-मोठी पिके कधी पालेभाज्या तर कधी फळझाडे,मात्र तुझ्या शेतातील टोमॅटोच्या पिकाचा दर भाव किती असावा! दोन रुपये किलो? मात्र इंग्रजी दारू पिताना हॉटेलच्या बार मालकाकडून मागून घेतलेल्या,त्या एक किलो टोमॅटो मधील दोन टोमॅटो च्या सलाडच, दारू वजा,नव्वद रुपये बिल कधी घेतलं आम्हाला कळलंच नाही बळीराजा तुझ्या श्रमाचं मोल आम्हाला कधी कळलंच नाही!

सकाळी उजाडले पासून ते सांज चा सूर्य मावळेपर्यंत, दिवसाची रात कधी होते, यापलीकडे जगाची दुनियादारी तुझ्यासाठी नेहमीच बंद असते, व तुझा रात्रीचा मुक्काम, शेताच्या बांधावर ती हाकोटी देण्यासाठी, तू बांधलेल्या माचळी वरती, नेहमीचा ठरलेला असतो..! अशावेळी, दूर लांबच्या शेतावरती असणाऱ्या शेतकऱ्याला,

तु नेहमीची मारणारी तोंडात दोन बोटे घालून शीट्टी,आणि पलीकडून तसाच येणारा उलट आवाज, सांकेतिक भाषेतील जगाच्या बाजारात, एकमेकासोबत जागते राहण्याचा असा संवाद,आम्हाला कधी भेटला, ही नाही आम्हाला कधी कळणार ही नाही! बळीराजा तुझ्या श्रमाचं मोल आम्हाला कधी कळलंच नाही!

उसाच्या सरी ची भांगलण करताना,तुझे ते श्रमणारे नेहमीचे हात,भाकर भाजी कांद्यासोबत रात्रीच्या टायमाला,बाळा पाटलाच्या गुराळ घरावर च्या गुराळ घरातून, खसखशीत रसाने भरलेल्या उसाच्या,गाळ पातून राहिलेल्या काकवीची, हौसेखातर पिण्यासाठी तू तयार केलेली ती गावठी दारू, तुझ्या जीवाला थोडासा विसावा म्हणून पिताना, तू वयाची 95 वि,गाठलीस, मात्र मोठ्या तोऱ्याने सरकारने, सरकारमान्य देशी दारूचे परवाने गी कारखान्यांना देऊन, साखर कारखान्यातून तयार होणारी देशी व विदेशी दारू पिताना, त्यामधील असणाऱ्या ज्यादा ऍसिडच्या अतिवापरामुळे,अनेकांचे मूत्रपिंड कधी रिकामे झाले, लिव्हर पूर्णता खराब झाली,आन मृत्यु दारासमोर कधी येऊन गेला हे कधी आम्हाला कळलेच नाही! बळीराजा तुझ्या श्रमाचं मोल आम्हाला कधी कळलंच नाही!

तू पिकवणारे शेतीसाठी,व त्यामधून घेणाऱ्या नियमित पिकासाठी, सरकार दरबार कडून दिल्या जाणाऱ्या विज व पाण्याच्या कनेक्शन ला,तोडून जाताना अनेकांच्या हाताला लखवा मारत नाही,मात्र पाण्यातून पाण्यासारखा 72 हजार कोटी चा,पाण्या सारखा पैसा मिळवणारे आज,"उप,मुख्य" म्हणून फिरता आहेत.आणि मोठाले शिकून साहेब झालेली त्यांच्या हाताखाली गुलाम म्हणून वागत आहेत सरकारी दरबारची मोहर लावून. तू मात्र अधाशासारखा बघून राहतोस त्या निर्जन ओसाड पडलेल्या,एक टक माळरानकडे, त्या शेतातील पिकासाठी,त्याला पाणी न मिळाल्याने, वाळून गेलेल्या पिकाकडे, वर्षभर वाया गेलेल्या मेहनतीचे श्रमाचे मोल आम्हाला कधी कळलेच नाही! बळीराजा तुझ्या श्रमाचे मोल आम्हाला कधी कळलेच नाही!

आठवड्याच्या बाजाराला जाताना,घरातून बाहेर पडताना, पांढर पणजी अंगावरती सदरा असणारा काळा कोट व डोक्यावरची टोपी घालून,तुटलेल्या आरशाच्या,एका काचेच्या तुकड्याला चिकटवलेल्या भिंतीवरती, दहा वेळा तू तुझा चेहरा पाहून,राजी खुशी बाहेर पडताना, गावा शेजारच्या आठवड्याच्या बाजारासाठी,हातातून दोन रिकाम्या पिशव्या घेऊन जाऊन,पाव पाव किलो च्या विविध माळव्यासह हाटीला तून गरम भजी घराकडे पिशवीतून घेऊन येताना तुझ्यातला हसमुख लाल आम्हाला कधी कळ लाच नाही!

मात्र, समोरच्याला चांगली दिसावे याकरता, रुपयाच्या ब्लेड चे पात,नाव्ही कडून वस्तारा तून फिरऊन घेताना,चेहरा फ्रेश च्या नावाखाली चेहरा स्टीम करताना,ब्युटी पार्लर च्या नावावरती ओठावरती भरगच्च लाली लावताना,अनेकांचा महिना

अखेरीस हजारच्या पटीत खिसा कधी रिकामा झाला हे आम्हाला कळलेच नाही! बळीराजा,तुझ्या श्रमाचे मोल आम्हाला कधी कळलेच नाही!

ही सारी तुझीच लेकर आहेत रे, मात्र ती भरकटले आहेत, कारण ती तुझ्या शेताच्या बांधावर ती कधीच जाऊ इच्छितो नाहीत, कारण कदाचित त्यांच्या अंगावरच्या इस्त्रीच्या कपड्याला घाण लागेल, तुझ्या त्या शेताच्या बांधावरच्या मळलेल्या मातीची, ऊस तुटून गेल्यावरती खोडव्या च्या सरी ची भांगलण करताना, बघून आलेला ऊसाचा कोंब मोडू नये यासाठी उसाच्या कोंबा वरचा हळूवार अलगद पाला काढताना, चराचरा कापलेल्या उसाच्या पातीने तुझ्या हातावरच्या अनेक खुणा, त्या उसाची काळजी घेताना दिसून येतात, तुझ्या त्या लेकरा बाळा सारखीच. मात्र आज तुझी अनेक लेकरं ही, सासुरवास भोगणारी, मेहुणी च्या लग्नात व्यस्त असणारी, जावई माझा भला म्हणणाऱ्या सासूला दिवाळीचा फराळ घेऊन जाणारी त्यांची ती झपाझप चालत जाणारी पावले, जेव्हा तुझ्याकडे पाठ फिरवतात, तरीदेखील तू नाराज कधी, होत नाहीस, शेताच्या बांधावरती घरातून येणाऱ्या, भाकर भाजी वरती आण, सणासुदीला बहिणीकडून येणाऱ्या शिदोरी वरती, तू नेहमीच आनंदी राहिलेला आहेस, तुझ्यातील मनाचा एवढा मोठा दिलदारपणा आम्हाला कधी कळलंच नाही!

बळीराजा तुझ्या श्रमाचं मोल आम्हाला कधी कळलंच नाही!

ही सारी तुझीच लेकर आहेत रे, मात्र घेतले त्यांनी जातीपाती मध्ये स्वतःला बंदिस्त करून धर्माची देवळे अन,देवळाच्या धर्माला, अन त्याच्यातील दाढी वाल्यांच्या, बुवाबाजीच्या नमस्कार चमत्कारला, त्यांच्या वाटण्या झाल्या आहेत जातीपातीच्या पुढारपण आन कार्यकर्त्यांच्या, त्यांचं सारं ठरलेला आहे पिढ्यानपिढ्या साठी,एकेक घास वाटून खायच!

मात्र ते खात असलेल्या ताटातील घास हे, तुझ्यात हातानेच श्रमलेल्या, शेतातील पिकांचे कडधान्याचे आहेत,हे आम्हाला कधी कळलेच नाही!

बळीराजा तुझ्या श्रमाचे मोल आम्हाला कधी कळलेच नाही!ऊन वारा पाऊस थंडी, सोसाट्याचे वादळ आन अचानक उद्भवलेला पुराचा पाऊस, याला तू कधी हरला नाहीस,तू मनाने कधी खचला नाहीस, निसर्गाने मांडलेल्या क्रूर चेष्टेचा, तू कधी बळी पडला नाहीस, मात्र आता तुझा चेहरा खूप निस्तेज झालेला दिसून येतोय, तुझा तो काळवंडलेला चेहरा आता पूर्णतः राखट झाला आहे, तुझ्या चेहऱ्यावरती पडलेल्या घट्टपणे सुरकुत्या, तुझ्या त्या वाढत्या वयाची साक्ष देऊन जातात, अन सोबत पुढच्या पिढीसाठी ची उद्भवणारी चिंता व समस्या तुझ्या चेहऱ्यावरती दिसून जाते. अनेक जणांनी त्यांच्या गळ्याला, निराशेपोटी उगाचच लावून घेतलेला दोर, तुला आता पाहावत नाही, अजून किती काळ कर्जाच्या ओझ्याखाली दबून आणि दडपून राहायचं, याची तुला सतावणारी नेहमी चिंता, आम्हाला कधी कळलेच नाही!

..................................................

बळीराजा तुझ्या श्रमाचं मोल आम्हाला कधी कळलेच नाही!

बळीराजा तुझ्या श्रमाचं मोल आम्हाला कधी कळलेच नाही!

..................................................


Updated : 12 March 2021 8:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top