Latest News
Home > लेख > •सोळा वरीस धोक्याच !•

•सोळा वरीस धोक्याच !•

•सोळा वरीस धोक्याच !•
X

•मुली पळून जाण्यात राधानगरी तालुका आघाडीवर!

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका

सरकारी समुपदेशनाच्या प्रतीक्षेत!•
लेखक.✍🏻श्री तानाजी सखाराम कांबळे.

म. मराठी वृत्तसेवा मुंबई.

तरुणपणाच्या


रस्त्यावरचं,

पहिलं ठिकाण नाक्याचं,

सोळावं वरीस धोक्याचग!

सोळावं वरीस धोक्याचं आहे!

अशी म्हण फार पूर्वीपासून रूढ झालेली आहे.वय वाढत जाईल तशी अक्कल वाढत जाते असंही काहीस बोलल जात.

प्रेमाचा कटाक्ष हा प्रत्येकाला सावज म्हणून टिपत असतो.यात गैर असे काही नाही.

कारण शारीरिक आकर्षण असणे मूलतः स्वाभाविक गुणधर्म आहे.

मात्र अशा प्रेमाला वयाची एक मर्यादा असते.

ज्या वयात हसायचं,खेळायचं,बागडायचं, मामाच्या गावी जायचं नदीनाल्यांना वरती आंघोळ करायची,शाळेचे दप्तर खांद्यावरती मारून शाळेत शाळा शिकायला जायचं,

मात्र अशा वयातच,जसा मुंबई येथील नरिमन पॉईंटच्या समुद्र किनारपट्टी वरील चौपाटीवर सायंकाळी सहानंतर प्रेमाचा फड रंगला जातो,अगदी तसाच प्रेमाचा फड

गाव गाड्या वरती देखील रंगू लागला आहे.

प्रेम या शब्दाचा अर्थ पवित्र असा आहे.

मग ते मीरा न श्रीकृष्णा वरती केलेले प्रेम असो, वा उष्टी बोरं हाकणाऱ्या शबरी न श्री रामावती केलेले प्रेम असो,प्रेम या दोन शब्दावर ती,लिहिण्या सारखे खूप काही आहे.

टिपणारे डोळे जेव्हा प्रेम म्हणून टिपत असतात तेव्हा, जोडीदार म्हणून उर्वरित आयुष्याची फिकिर वा तमा अशा डोळ्याने बाळगलेली नसते!

समजून घेतलं तर प्रेम नाही तर कलम 376 आयपीसी धारा! वय जरी लहान असतील पळून जाण्यासाठी तरी केलेले कायदे हे अतिशय कडक आहेत. 363 कलम ते 366 कलमा पर्यंत, अशा भावनेच्या आहारी पळून जाणाऱ्या युवा जोडप्यावर ती,वा अशा प्रेम करणाऱ्या भादरावरती,गुन्हा नोंद होऊ शकतो.

चुकून जर पॉक्सो सारखा कायदा, लागू केला तर,आयुष्यभराचा पश्चाताप व्यक्त करायला देखील वेळ मिळणार नाही.

राधानगरी तालुका हा महाराष्ट्रामध्ये, पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे.104 गावांच्या वाड्या वस्तीवर ती विभागलेला राधानगरी तालुका आहे.

या राधानगरी तालुक्यातील राधानगरी अभयारण्य,कोल्हापूरचे संस्थान अधिष्ठान पती श्रीमंत छत्रपती शाहू जी राजे,याने बांधलेला, राधानगरी येथील लक्ष्मी डॅम अर्थात धरण,

या राधानगरी तालुक्यामध्ये आढळणारे दुर्मिळ वनौषधी,अनेक ठिकाणी असणारे पावसाळी पर्यटनाचे धबधबे,हिरवाईने नटलेला दर्या डोंगर खोऱ्यातील तो मनमोहक परिसर,अनेकांचे लक्ष नक्कीच वेधून घेतो.अशा सुजलाम-सुफलाम दर्या डोंगर खोऱ्यात विभागलेल्या राधानगरी तालुक्यामध्ये,असणाऱ्या राधानगरी पोलिस स्टेशन अंतर्गत मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी गेल्या चार वर्षांमध्ये,

खूप जास्त तिच्या प्रमाणात येऊ लागल्याने पोलिसांची,चांगलीच पंचाईत झाली आहे.

आईवडिलांची पोलीस स्टेशन मध्ये होणारी तक्रारीची धाव,पोलीस ठाण्यातील

ठाणे अंमलदार ला चांगलाच घाम फुटत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खरी

गंमत तर पुढे आहे,की पोलिसांना राधानगरी तालुक्यातील अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये समुपदेशन करण्याची पाळी आलेली आहे.

पळून जाऊ नका यासाठी.खरं तर पोलिसांना 24 तासाची ड्युटी आहे.शाळा मास्तरांना दिला जाणारा पगार एवढा जास्तीचा पगार देखील पोलिसांना दिला जात नाही,तरीदेखील वर्दी ही सुरक्षतेकामी,अति महत्त्वाची असल्याने, वर्दी दाराला अनेक न्यायिक मागण्या, ऐकून घ्याव्या लागतात समजून घ्यावे लागतात व योग्य वेळी कायद्याचा दंडुका, हातात देखील घ्यावा लागतो नाविलाजास्तव.पोलीस ठाण्यातील डायरी अंमलदार ला दाखल गुन्ह्यांची नोंद व त्याचा तपास करण्यासाठी,खूप ताणतणावातून जावे लागते.त्यातच अल्पवयीन मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याने,दर्या डोंगर खोऱ्यातील वाड्या वस्ती वरती, तपास करायला जावे लागत असल्यामुळे, पोलिसांची महत्त्वाची जबाबदारीची जोखमीची कामे ही प्रलंबित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चोरी दरोडे खुनासारख्या गंभीर घटनांचा तपास करणे कामी,वेळ देणे खूप गरजेचे असते. त्यातच अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने, स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना देखील,याचा ताण पडतो. राधानगरी पोलीस स्टेशन अंतर्गत अल्पवयीन मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले याची दखल खुद्द जिल्हा पोलीस प्रमुख श्री बलकवडे यांना घ्यावी लागली होती. यासाठी त्यांनी खास महिला पोलीस अधिकारी यांची ड्युटी राधानगरी पोलीस स्टेशनला लावलेली आहे.राधानगरी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक यांच्या सह,तब्बल 35 पोलिसांचा ताफा दिवस-रात्र मेहनत घेतानाच आढळून येतो.

स्वयंसेवी संस्थांना आवाहन!

अल्प वयामध्ये पळून जाण्याचे प्रकार वाढल्याने, सामाजिक स्तरावर ती काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था व त्यांचे कार्यकर्ते यांनी, अशा गंभीर घटनांची नोंद घेऊन प्रबोधन करणे हे खूप काळाची गरज आहे. यासाठी गावातल्या ग्रामपंचायतीचा स्तरावरून, शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन, खोट्या प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्या लहान च्या वयाला समजून सांगणे,ही गरज आहे.

शासनस्तरावरून,अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी, लोकप्रतिनिधी व प्रशासन स्तरावरून सुधारित कमिटी करून, यासंदर्भात तातडीची पावले उचलणे गरजेचे आहे.

अन्यथा सोळावं वरीस धोक्याचं,हे गाणं म्हण यावाचून पर्याय राहणार नाही.

Updated : 5 Feb 2021 8:05 AM GMT
Next Story
Share it
Top