Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > रूग्नवाहिकेचे चालक नईम पाशा यांना रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात भावपूर्ण श्रद्धांजली..

रूग्नवाहिकेचे चालक नईम पाशा यांना रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात भावपूर्ण श्रद्धांजली..

रूग्नवाहिकेचे चालक नईम पाशा यांना रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात भावपूर्ण श्रद्धांजली..
X

रूग्नवाहिकेचे चालक नईम पाशा यांना रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात भावपूर्ण श्रद्धांजली..

म मराठी न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी/किनाळा मोरे मनोहर

शंकरनगर ( रामतीर्थ ) तालुका बिलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक वर्षांपासून रूग्नवाहिकेचे चालक म्हणून कार्यरत असलेले नईम पाशा यांचे दि.3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी नांदेड येथे निधन झाले असून त्यांचा 4 नोव्हेंबर रोजी दुपारी नांदेड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला हि बातमी शंकरनगर येथे समजताच येथील रूग्णालयात भावपूर्ण श्रद्धांजली वाहन्यात आली.

रामतीर्थ येथील रूग्णालयात रूग्नवाहिकेचे चालक म्हणून कार्यरत असलेले नईम पाशा हे शंकरनगर परिसरात सुस्वभावी व मनमिळाऊ रूग्नवाहिकेचे चालक म्हणून अनेकांना सुपरिचित होते. त्यांना मागील काही दिवसापूर्वी अर्धांगवायुचा हटॅक आल्याने त्यांना उपच्यारासाठी नांदेड येथे दाखल करण्यात आले होते त्यांचा उपचार सुरू असताना नांदेड येथे निधन झाल्याने त्यांचा नांदेड येथेच शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले हि घटना समजताच शंकरनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.बी. वाडीकर ,वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक बोरसे यांच्या नेतृत्वाखाली शोकसभा घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहन्यात आली यावेळी वैधकीय अधिकारी डाॅ. शंकरराव वाडीकर,डाँ.विवेक बोरसे यासह वैधकीय क्षेत्रात विविध पदावर कार्यरत असलेल्या डाॅ.रघुनाथ क्षेत्रे ,उप्पलवार, गोंविदवार ,के.एस.भुमने ,एम.एस.वाघमारे ,आर.जी.वाघमारे, शेख वाय.बी.,पांचाळ एस.पी.,चौधरी जी.एल.,बि.डी.वाघमारे, शंकर कूडकेकर ,संगिताबाई शंकरपाळे आदिसह प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते या शोकसभेचे प्रस्ताविक एम.एस.वाघमारे यांनी केले.

Updated : 5 Nov 2020 2:43 AM GMT
Next Story
Share it
Top