रुग्णसेवा युवा ग्रुपला सेवक सेवाभावी संस्था जळगाव तर्फे 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार'
X
फुलचंद भगत/मंगरुळपीर
रुग्णसेवा युवा ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भ मध्ये रुग्णसेवा सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे, रुग्णसेवा युवा ग्रुपतर्फे नियमितपणे आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, रक्तगट तपासणी शिबीर असे उपक्रम सुरुच असतात, त्यासोबत विद्यार्थी, अपंग, दिव्यांग यांच्या समस्या सुद्धा सोडविण्यासाठी ग्रुप तत्पर असतो. काही महिन्यापूर्वी कडक लॉकडाऊन लागला होता त्याकाळात रुग्णसेवा युवा ग्रुप व संपूर्ण सदस्य मोफत मास्क वितरण, जनजागृती पॉम्पलेट वाटप, 500 कुटूंबाना घरपोच जीवनाआवश्यक साहित्य, रक्तदान शिबीर व ईतर सर्व शक्य ते उपक्रम यशस्वी पार पाडले या सर्व कार्यासाठी अंदाजे जवळपास एक लक्ष रुपये खर्च आला आणि हा सर्व खर्च रुग्णसेवा ग्रुपला सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर मंडळीनी वर्गणी करून गोळा केला, लोकवर्गणी मधून एवढ मोठ कार्य यशस्वी पार पाडणे हे एक अतुलनीय कार्य आहे. हा पुरस्कार वरील सर्व कार्यासाठी रुग्णसेवा ग्रुप अध्यक्ष शिवा सावके यांच्या नावे देण्यात आला परंतु त्यांनी तात्काळ हा पुरस्कार स्वतः न स्वीकारता रुग्णसेवा ग्रुपच्या नावे जाहीर केले, त्यांच्यामते हे सर्व कार्य कोण्या एकट्याचे नसून सर्वांचे आहे मनून हा पुरस्कार सुद्धा संपूर्ण ग्रुपचा आहे, रुग्णसेवा ग्रुपतर्फे सेवक सेवाभावी संस्था जळगाव यांचे आभार मानले.