राष्ट्रीय महामार्ग क्र 7 पाटनबोरी ते वडकी रस्त्यावरील खड्डे केव्हा बुजनार ? ग्राहक प्रहार संघटनेचा संतप्त सवाल !
X
नितीन गडकरी केंद्रीय मंत्री,जिल्हाधिकारी ह्यांचे कडे तक्रार दाखल !
राष्ट्रीय महामार्ग क्र 7 पाटनबोरी ते वडकी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा ठेका रु2कोटी ला देण्यात आला हे काम पूर्ण व्हायचे आत अंदाजे रु22 कोटी चा ठेका रस्त्याचे संपूर्ण थर (कोटींग)चा देण्यात आला .खड्डे तसेच व रस्त्याचे कोटींग चे काम अर्धवट असतांना बिल काढण्यात आले ह्या बाबत ग्राहक प्रहार संघटनेने जिल्हाधिकारी यवतमाळ ह्यांचे कडे तक्रार केली येन पावसात हे खड्डे व रस्त्याचे कोटीग चे काम करण्यात आले !
जिल्हाधिकारी साहेबांनी घेतलेल्या दखल बाबत आभार व्यक्त करण्यासाठी यवतमाळला जाऊ करीता सर्व सदस्यांची जुळवाजुळव करे पर्यंत पुन्हा रस्त्यावर 247लहान अंदाजे एक फुटाचे 120 दोन फुटाचे 4 खड्डे चार फुटाचे वर असल्याचे ग्राहक प्रहार संघटनेचे प्रसाद नावलेकर व भैय्यासाहेब ठमके ह्यानी ह्या खड्ड्याचे मोजमाप करून अहवाल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम ह्यांचे कडे सादर केला !
संघटनेच्या ह्या हालचाली पाहून एकेका खड्डयात एक एक ट्रॅक्टर मुरुम मिश्रित माती टाकण्यात आली असून पावसामुळे ती सुद्धा वाहत ह्यात जे अपघात होत आहे ह्याला जवाबदार कोण ?
ह्या बाबत केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी ह्यांना प्रत्यक्ष भेटून संपूर्ण नागपूर ते पाटनबोरी ह्या रस्त्याची पाहणी करून तुम्हीच फोजदारी दाखल करा अशी विनंती संघटना करणार आहे .
पाटनबोरी नंतर आंध्र हद्दीत हा रोड खूपच छान आहे !तिकडे जर रोडचे पैसे खात नाही तर इकडे इतके कशे खाऊ शकतात ह्यावर काही प्रतिबंध नाही का ?
तत्पूर्वी ह्यावर देखरेख करणाऱ्या अभियंता व ठेकेदार ह्यांच्यावर कारवाई करून तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवावे तो पर्यंत प्रत्यक 10किलोमीटर वर रुग्णवाहिका ठेवाव्यात व अपघात ग्रस्तांना तातडीने मदत मिळावी व नुकसानभरपाई शासनाने द्यावी करीता जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन पाठविण्यात आले असून निवेदनावर ग्राहक प्रहार संघटना जिल्हा यवतमाळ चे अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम,जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर, सहसचिव भैय्यासाहेब ठमके,उपाध्यक्ष यशवंत काळे,जिल्हा संघटक बंडूभाऊ लवटे, दामोधर बाजोरीया,मारेगाव चे सचिन मेश्राम, वणीचे विनोद कुचेरीया ,झरीचे मनोहर गेडाम ,पाटनबोरी चे जयंत बावणे,अजय दुंमनवार, पांढरकवडा चे अभय निकोडे ,पुसद चे विवेकअण्णा मन्नरवार आदींच्या सह्या आहेत अशी माहीती तालुका प्रचार प्रसार प्रमुख प्रदीप भानारकर ह्यानी दिली.
प्रदीप भानारकर