Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत भंडारादरा येथे मोफत हरभरा बियाणे वाटप

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत भंडारादरा येथे मोफत हरभरा बियाणे वाटप

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत भंडारादरा येथे मोफत हरभरा बियाणे वाटप
X

म मराठी न्युज टिम

अकोले तालुका प्रतिनिधी विठ्ठल खाडे

अहमदनगर :- अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा मार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत हरभरा ( वाण राजविजय ) बियाचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळेस शेतकऱ्यांनी हरभरा लागवड करून उत्पादन वाढवावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रविन गोसावी यांनी केले.

हरभरा हे महाराष्ट्रातील रबी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त हरभरा पिकाची लागवड करून भरघोस उत्पादन घेण्यासाठी अकोले तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत व गतिमान कडधान्य उत्पादन मोहिमेत तालुक्यात हरभू लागवड करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावर्षी हरभरा लागवड उत्पादन वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू असून भंडारादरा या गावांतील ८० शेतकऱ्यांना हरभरा बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रविन गोसावी , मंडळ कृषी अधिकारी बिबवे साहेब, भंडारादरा गावचे सरपंच पांडुरंग खाडे, कृषी मित्र किसन आंबवने, उपसरपंच गणपत खाडे, कृषी सहायक वायळ साहेब, माजी सरपंच आनंद खाडे तसेच अकोले तालुक्यातील क‌षी विभाची संपुर्ण टिम व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Updated : 3 Nov 2020 7:38 PM GMT
Next Story
Share it
Top