- वणी नार्थ एरीया के कोलार पीपरी खनदान में होराह है भ्रष्टचार
- जिल्हा वार्षिक योजना 2021-22 च्या खर्चास जिल्हा नियोजन समितीची मान्यता
- मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील विचित्र अपघातात एक ठार
- उदयपूरला घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो
- ब्रेकिंग न्यूज-: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा...
- यवतमाळ जिल्ह्यात 245 नवीन रेशन दुकान उघडणार
- गेल्या 24 तासात 23 नवीन कोरोना पॉझिटिव्ह
- नरसी चौक ते बस स्थानक बिलोली रोड परिसरात खाजगी वाहने बेशिस्त लावत असलेल्या वाहनेचा बंदोबस्त करावे : मुस्तफा पटेल कुंचेलीकर
- घुग्घुस येथे भाजपातर्फे कुलजारचे वाटप छोट्या व्यवसायिकांची प्रगती हिच देशाची प्रगती- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
- सिरोंचा वनविभाग जगंलो से सागवान की तस्करी कर रहे तस्करों पर वनविभाग द्वारा कारवाई..

राष्ट्रसंत श्री संत सेना महाराज यांची जीवनगाथा
X
नाभिक समाजासाठी एक ज्वलंत दीप तेवत ठेवणारे एक थोर समाज सुधारक राष्ट्रसंत श्री सेना महाराज यांचे नाव ऐकल्यावर आजही समाजाच्या परिवर्तनासाठी पोटात कालवाकालव होते. उभ आयुष्य नाभिक समाजासाठी अर्पण करून त्यांच्या अभंगवाणीतून समाजात परिवर्तनाची ज्योत निर्माण केली होती.अशा या महापुरुषाच्या जन्म विक्रम सवंत रविवार 1400 या दिवशी अलाहाबाद जवळ जबलपूर जिल्ह्यात विलासपूर कडे एक फाटा जातो. त्या फाट्यावर उमरिया नावाचे एक स्टेशन आहे,तेथून एक गड दिसतो. तो गड म्हणजेच बांधवगड या ठिकाणी झाला .
महाराष्ट्राशी भावनिक संबंध ठेवून परराज्यात जाऊन राहिलेले अनेक कुटुंब होते.श्री संत सेना महाराजांचे वडील त्यापैकी एक होते.बांधवगड एक वैभवशाली नगर होते. राम राजा नावाच्या राजाच्या राज्यात सेना महाराजांचे वडील श्री देवीदास पंत हे दरबारात राजकीय सल्लागार व विज्ञानवादी वैद्य होते तसेच राजांकडे नाभिकाचेही काम करीत असत.
सेना महाराजांची आई प्रेम कुवर बाई सात्विक स्वभावाची गृहिणी होती.वडील देविदास यांच्या नंतर परंपरेनुसार राजाकडील
नाभिकाचे काम सेना महाराजांकडे आले .सेना महाराजांच्या लहानपणापासूनच भक्तिमार्गाकडे ओढा होता.
श्री संत महाराजांचे अमृतवचन ईश्वर अल्ला एक है,
फरक करयो इंसान |
सैना दोनोइ एकहि मजब,
वो रहीम ये राम |
एक धरम, एकही मजब ,
एकही राम रहीम |
सैन भगत सॉची कहूॅ ,
एकहि कृसन करीम |
आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि भक्तिभावाने संतत्व पावलेले संत सेनाजी हे आचार्य रामानंद यांचे प्रमुख शिष्य होते त्याकाळी त्यांच्या हिंदी मातृभाषेतून ते भक्तिरचना सुद्धा करू लागले. कालांतराने त्या काळाच्या संतांची माहिती सेना महाराजांना मिळाली. त्या संतांच्या व पंढरपूरच्या विठ्ठल भेटीसाठी ते आतुर झाले. तीर्थयात्रा करीत करीत ते इकडे आले.
संत निवृत्तीनाथ,संत ज्ञानेश्वर, संत नामदेव व इतर त्यांचे समकालीन संत होते.या महान संतांच्या सान्निध्यात येऊन ते महाराष्ट्राच्या पावन भूमीत रममान झाले .
संत सेना महाराजांच्या प्रमुख अभंगांमधील काही ओळी खालील प्रमाणे
आम्ही वारिक वारिक I
करू हजामत बारीक ॥
विवेक दर्पण आयना दाऊl
वैराग्य चिमटा हालऊ ॥
उदक शांती डोई घोळू I
अहंकाराची शेंडी पिळू॥
भावार्थाच्या बगला झाडू|
काम क्रोध नखे काढू ॥
संत सेना महाराजांच्या जीवनावर महापंडित उपाली यांच्या विनय पिटक ग्रंथांचा प्रभाव होता. सेना महाराजांनी हजारो अभंगांची निर्मिती करून सेन पंथ नावाची चळवळ भारतात सुरू केली. पंजाबात असताना त्यांनी अनेक पंजाबी भाषेत दोहे रचले हेच दोहे शीखांचे तिसरे गुरू अर्जुन सिंह यांच्या गुरुग्रंथसाहेब यांच्यात समाविष्ट आहेत
संत सेना महाराजांच्या बाबतीत एक दंतकथा प्रसिद्ध आहे राजांची हजामत करण्यासाठी राजांचा माणूस सेना महाराजांना बोलवण्यासाठी जातो परंतु भगवंताच्या नामस्मरणात दंग असलेल्या सेना महाराजांना ते ऐकू जात नाही उशीर झाल्यामुळे राजा क्रोधित होऊन संत सेना महाराज यांना शिक्षा होईल म्हणून स्वतः भगवंतच धोपटे घेऊन राज्याची हजामत करून जातात अशी ही कथा प्रसिद्ध आहे.
संसारात राहून सुद्धा ईश्वरभक्ती करून परमार्थ साधला जाऊ शकतो हे लोकांना सांगितले. कर्मठ उच्चवर्णीयांनी निर्माण केलेली उच्चनीच ,जातिभेद, ही परंपरा मोडीत काढण्यासाठी उपदेश केला व स्वतःही तसे वागले. संत सेना महाराज संत तर होतेच परंतु ते उत्तम समाज सुधारक होते,त्यांनी तत्कालीन वर्णभेद ,जातिभेदासह,स्पृश्य-अस्पृश्य ,उच्च-नीच ,बालविवाह पशुहत्या ,नरबळी ,सती प्रथा आदी वाईट चालीरीती आणि परंपरा अर्थात कर्मकांड होम हवन ,तीर्थयात्रा, व्रत-वैकल्य, उपवास अशा अनेकानेक कुप्रथेतून मानवी जीवनाला भयमुक्त करून स्वतंत्र जीवन जगण्यासाठी प्रेरणा दिली. संत सेना महाराजांनी अंधश्रद्धेत गुरफटलेल्या समाजाला प्रयत्नवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दिला . संत सेना महाराज हे बहुभाषीक प्रबोधनकार होते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र ,उत्तर प्रदेश ,राजस्थान, पंजाब आदी राज्यांसह भारतात चारही दिशांना त्यांनी सामाजिक समता ,मानवतावादी दृष्टिकोन, तत्कालीन समाज रचनेत शुद्र समजली जाणारी विविध जातीतील जनता व स्त्रियांना शिक्षण आणि न्याय्य हक्क, अंधश्रद्धा , धार्मिक पाखंड व्यसनमुक्ती ,याविषयी जनजागृती केली .सेना महाराजांच्या दृष्टीने मानवतावाद याला खूप महत्त्व आहे .मानव जातीलाच त्यांनी ईश्वराचे रूप म्हटले आहे .अशा या महान राष्ट्रसंतांचा आज महापरिनिर्वाण दिन म्हणजे श्रावण वद्य द्वादशी या दिवशी विक्रम संवत 1490 मध्ये वैकुंठवासी झाले .संत सेना महाराज यांना मानणारा न्हावी समाज आज प्रत्येक राज्यात आहे व प्रत्येक न्हावी समाज बांधव त्यांची जयंती व पुण्यतिथी मोठया उत्साहाने साजरी करत असतो .आज त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चालावे हीच खरी त्यांना आपली प्रार्थना ठरेल.
श्री महेंद्र ओंकार खोंडे (पत्रकार)
त-हाडी ता शिरपुर जि धुळे
धुळे जिल्हा अध्यक्ष
व
महाराष्ट्र राज्य नाभिक सेना
महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख
मो ,न 9923360366
वाँटसप मो ,न 9960651213