राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुर्तिजापूर शहर चे शहर अध्यक्ष च्या शुभम मोहोड यांची शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 60,000/ - रुपयाची मदत जाहीर करण्याची मागणी
X
म मराठी न्यूज टीम
मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन
संपुर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी , महाचक्रीवादळामुळे आणि अवेळी पडलेल्या पावसामुळे तसेच शेतकऱ्यांच्या सर्व पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानापोटी सन 2019-2020 प्रमाणे भारत सरकार व महाराष्ट्र सरकार मिळुन सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 60,000/- रुपयाची मदत जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुर्तिजापूर शहरचे शुभम मोहोड शहर अध्यक्ष यांनी निवेदनाव्दारे मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे. महाराष्ट्रामध्ये सन 2019-2020 मध्ये 'क्यार' व 'महा' चक्रिवादळ निर्माण झाल्यामुळे तसेच अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना सर्व पिकाची सरसकट मदत महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन असतांना राज्यपाल महोदयांनी जाहीर केली होती. परंतु जाहीर केलेली मदत अपुरी असल्यामुळे शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. तसेच यावर्षी सुद्धा अतिवृष्टी व अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असुन त्या शेतकऱ्याने आत्महत्येसारख्या मार्गाचा अवलंब स्विकारावा नाही. म्हणुन भारत सरकारने / महाराष्ट्र सरकारने मिळुन महाराष्ट्रातील तसेच मुर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणुन हेक्टरी 60,000/- रुपयाची मदत जाहीर करावी. याचे कारण असे की, सुरुवातीला पाऊस सुरू झाला असता खरीप हंगामातील मुग, उदिड पिकावर व्हायरसचे आक्रमण झाले होते. तसेच परतीच्या पावसाने सर्व सोयाबीन मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सप्टेंबर - ऑक्टोंबर 2020 मध्ये उर्वरित उरलेल्या पिकांपैकी कपाशी या पिकावर बोंडअळीने आक्रमण केले असुन तुर व इतर पिकावर नैसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे 100% नुकसान झाले असल्यामुळे महाराष्ट्रातील तसेच मुर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना भारत सरकार / महाराष्ट्र सरकारने मिळुन प्रति हेक्टरी 60,000/- रुपयाची मदत जाहीर करावी. सर्व सामान्य शेतकरी, कसा बळकट होईल. या दृष्टीने प्रतयेक पिकांच्या शेवटपर्यंत उत्पादन खर्च किती येतो. यासाठी तज्ञ मंडळींची प्रत्येक तालुका स्तरावर निर्मिती करावी. जेणे करून हमी भाव ठरविता येतील. समितीमध्ये शासकिय आणि अशासकीय सदस्य असावेत. समिती मुद्दा क्र. 1 मुद्दा क्र. 2 सिंचन/ओलीत व कोरडवाहू शेती असे तीन भाग करुन उत्पादन खर्चाचा व पिकांचे उत्पन्न ठरविणे. या करिता अभ्यासगट तयार करणे. शासनाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत 100% टकके पोहचण्यासाठी प्रत्येक, गावात मोक्याच्या ठिकाणी ग्रा.पं. ने मोठे जाहीर फलक लावावे. तसे न केल्यास तलाठी, ग्रामसेवक, कृषी कर्मचारी यांचेवर दंडनिय कार्यवाही (शिस्त व अपील) करावी. प्रत्येक योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या असाव्यात व इच्छा असल्यास त्यापैकी त्या शेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे निवड करावी . जेणेकरुन कोणीही जाणून बुजून वंचीत राहणार नाही. यासाठी शेतकऱ्यांचे मंडळ मेळावे घ्यावे. आजरोजी अशी स्थिती आहे की, ज्याचा लग्गा असेल किंवा संबंध असलेल्या लोकांना त्यांच्या मर्जीतील / मर्जीप्रमाणे लाभ भेटतात. हया प्रकारास सक्तपणे आळा बसेल याची जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांचे मार्फत नियमित तपासणी करुन घ्यावी. शेतकऱ्यांवर कोणत्याही वसुली साठी सक्तीचे बंधने लादू नयेत. शक्य असल्यास मिळणाऱ्या लाभातून काही प्रमाणात टप्या टप्याने तडजोड करुन वसुली करावी. धोरण हेच की, आत्महत्येस व तशा प्रवृत्तीस आळा बसेल. पिक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेचे उंबरठे शिजवावे लागतात. बँक अधिकारी शेतकऱ्यांना त्रास देवुन सळो की, पळो करुन सोडतात . याबाबत वृत्तपत्रात तक्रारी प्रसिद्ध होतात. यामध्ये सोपी पद्धत ठरवावी. बँक अधिकारी व तहसिल / महसुल प्रशासन यांची शासकिय कागदपत्रांसाठी सांगड घालावी. यासाठी संगणकीय प्रणाली सुरु करावी. महाराष्ट्रासह अकोला जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कपाशी पिकावर बोंडअळी आल्यामुळे 100% कपाशीचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील कपाशीचे (पराटी) पीक काढुन फेकले आहे. त्याची छायांकीत प्रत सोबत जोडली आहे. असा उल्लेख नमुद निवेदनामध्ये असून त्यांच्या प्रतिलिपी मा. नरेंद्रसिंग तोमर साहेब, कृषि एवं किसान कल्याण मंत्री, भारत सरकार, मा.अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. दादाजी भुसे साहेब, कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. बच्चुभाऊ कडु साहेब, पालकमंत्री, अकोला जिल्हा, मा. विभागीय आयुक्त साहेब, अमरावती विभाग, अमरावती, मा. जिल्हाधिकारी साहेब, अकोला, मा. उपविभागीय अधिकारी साहेब, मुर्तिजापूर, मा. तालुका कृषी अधिकारी साहेब, मुर्तिजापूर यांना दिल्या आहेत. यावेळी प्रतिक नागरीकर, प्रसिध्दी प्रमुख रा.यु.काँ.मुर्तिजापुर, अतुल गावंडे रा.वि.कॉ. मुर्तिजापुर, भुषण वरोकार, सचिन गावंडे, शिवराज कदम, तुषार दाभाडे, कस्तुभ सुरोशे व आदि कार्यकर्त उपस्थित होते.
मुर्तिजापुर प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन 9850024474