राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शेतकऱ्यांचा चांदुर बाजार तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
X
".राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शेतकऱ्यांचा चांदुर बाजार तहसील कार्यालयावर धडक मोर्चा.."
प्रतिनिधी/ रत्नदीप तंतरपाळे
अमरावती/ चांदूर बाजार(कृष्णापुर) यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीनचे पीक पूर्णत: निस्थानाबुत झाले. कपाशीवरील बोंड आळी मुळे कपाशीचे ही अतोनात नुकसान झाले. संत्रा पिकाला भाव नाही. अशी विदारक परिस्थिती असताना तालुक्याची आणेवारी सरासरी 52% टक्के अशी? त्यामुळे चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी शासकीय योजनेपासून वंचित राहिला. त्याकरिता तालुक्यातील आणेवारी कमी करण्यात यावी.
बोंड आळी मुळे कपाशीची नुकसान भरपाई मिळावी. 18 मे रोजी झालेल्या प्रचंड गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची संत्रा उत्पादकांना शासन मदत मिळावी. तसेच सोयाबीन उत्पादकांना झालेल्या नुकसानीची शासन मदत मिळावी. याकरिता तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व शेतकरी यांनी तहसील कार्यालय चांदूरबाजार येथे धडक मोर्चा दिला. मोर्चा करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब खटके विधानसभा अध्यक्ष चंदू भाऊ बंड शहराध्यक्ष ओ.बी.सी. गजानन तट्टे शहर कार्याध्यक्ष दिलीप पोहोकार शेतकरी सचिन भाऊ गांजरे संजय धोटे सलीम खान भूषण झोड विवेक मोहोड दिनेश मोहोड उमेश झोड केशवराव राऊत अरुण पोहोकार गजू वैद्य सलीम खान अजय देशमुख इरफान राव गंगाधर तंतरपाळे इत्यादी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते...