Home > विदर्भ > राळेगाव येथे कापसाची कवडी मोल भावात खरेदी...

राळेगाव येथे कापसाची कवडी मोल भावात खरेदी...

राळेगाव येथे कापसाची कवडी मोल भावात खरेदी...
X

म-मराठी न्यूज़ नेटवर्क

प्रतिनिधी/ संजय कारवटकर

राळेगाव,दि.30 : राळेगाव तालुक्यातील कापसाची मागणी विदेशात सुध्दा आहे मात्र यावषी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यामुळे या गोष्टींचा फायदा व्यापारी घेतानी दिसत आहे राळेगाव येथे दररोज दोन हजार क्विंटल कापसाची आवक आहे राळेगाव व वाढोणा बाजार येथे दोन व्यापाऱ्यांनी चार हजार किंवा चार हजार पाचशे रूपयानी खरेदी लावली आहे शेतकरी आथिर्क अडचणीत पण या शेतकऱ्याचे कुणालाही देणे घेणे नाही सिसीयाची कापूस खरेदी 17, नोव्हेंबर पासून चालू होणार आहे परंतु शेतकऱ्याणा दैनंदिन व्यवहारासाठी पैसा लागतो त्यासाठी त्यांना कापूस विकल्या सिवाय ईलाज नाही आणि त्याच गोष्टीचा फायदा खाजगी व्यापारी घेतानी दिसत आहे यामध्ये बिचारा शेतकरी मरतो आहे व राजकीय लोक आपल्या घरी आरामात झोपेत आहे.

Updated : 30 Oct 2020 12:32 PM GMT
Next Story
Share it
Top