Home > विदर्भ > राळेगाव तालुक्यात खोड किडींच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे अतोनात नुकसान

राळेगाव तालुक्यात खोड किडींच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे अतोनात नुकसान

राळेगाव तालुक्यात खोड किडींच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे अतोनात नुकसान
X

(राळेगाव महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्र्यांना नुकसानभरपाई साठी निवेदन)

रितेश भोंगाडे/राळेगांव

राळेगाव तालुक्यासह संपूर्ण विदर्भात खोडकिडीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, कोरोना काळात आधीच संकटाचा सामना करणारा शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. खोडकिडीचा प्रादुर्भाव एवढा भयंकर आह या मुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी या करीता राळेगाव तालुका महाविकास आघाडी तर्फे तहसीलदार राळेगाव यांच्या मार्फत मां. मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

खोड किडी मुळे संपूर्ण सोयाबीनचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

खोडकिडी सह सोयाबीनवर (यलो मोझक) रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा वाढला आहे. या रोगामुळे शेतकऱ्यांचे पीक पिवळे पडत असून पाने गळत आहेत. या वेळी महाविकास आघाडी तर्फे तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे व कृषी अधिकारी यांना खोडकिडी बाधित सोयाबीन चे झाड आणून प्रत्यक्षात दाखविण्यात आले. यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना सल्ला द्यावा महसूल विभाग व कृषी विभागाने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रती हेक्‍टर ८० हजार रुपयाची तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी. अशा आशयाचे निवेदन माननीय मुख्यमंत्री यांना तहसीलदार राळेगाव यांच्यामार्फत देण्यात आले.

यावेळी महाविकास आघाडी तर्फे जानराव गिरी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस, ॲड. फिडेल बायदानी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, विनोद काकडे तालुका प्रमुख शिवसेना, प्रदीप ठूणे शहराध्यक्ष काँग्रेस, प्रकाश खुडसंगे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, राकेश राहूळकर शहर प्रमुख शिवसेना, संदीप पेंदोर उपशहर प्रमुख शिवसेना, युसुफ अली सय्यद,किसनाजी देशमुख, गंगाधरराव घोटेकर, सुनील भामकर, राजूभाऊ पुडके, वसंत पोटफोडे, विठ्ठल चहाणकर, हनुमान पाल, नारायण उंबरकर, पद्माकर डंभारे, बबन खेवले, शांताबाई वादाफळे यासह शेतकरी उपस्थित होते.

Updated : 8 Sep 2020 1:25 PM GMT
Next Story
Share it
Top