राळेगांव येथे प्रशासक ग्रामसेवक यांचे मार्गदर्शन व कार्यशाळा
X
राळेगांव तालुका प्रतिनिधी :-- पंचायत समिती राळेगाव कृषी विभागाच्या वतीने कीटकनाशके विषबाधा जनजागृती अभियान अंतर्गत दिं ७ सप्टेंबर २०२० रोज सोमवारला पंचायत समितीच्या सभागृहात प्रशासक व ग्रामसेवक यांचे मार्गदर्शन व कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत तालुक्यातील शेतकऱ्यांना फवारणी करतांना विषबाधा होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी व फवारणी किटचा वापर आदी विषयावर कृषी अधिकारी रोशन गुलाले यांनी मार्गदर्शन केले असून याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे असे सांगितले आहे. तसेच ग्रामपंचायतने ग्रामपंचायत स्तरावर फवारणी किट उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासक व ग्रामसेवक यांना फवारणी सुरक्षा किट वाटप करण्यात आल्या आहे. या मार्गदर्शन शिबिराला पंचायत समितीचे सभापती प्रशांत तायडे , गटविकास अधिकारी रविकांत पवार, विस्तार अधिकारी (कृषि) राहुल वंजारी तथा सर्व विभाग प्रमुख व प्रशासक ग्रामसेवक आदी उपस्थित होते.