Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > रात्रीच्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या - आमदार डॉ देवरावजी होळी

रात्रीच्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या - आमदार डॉ देवरावजी होळी

रात्रीच्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या - आमदार डॉ देवरावजी होळी
X

प्रा संतोष सुरपाम जिला प्रतिनिधि

9420190877

गडचिरोली जिल्ह्यात २० नोव्हेंबर च्या रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कापणी केलेले पीक पावसात सापडल्याने तसेच वाहून गेल्याने हात येणारे उरले-सुरले पीकही गेले असून शेतकऱ्यांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे शासनाने पावसात सापडलेल्या व वाहून गेलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे.

यावर्षी शेतकऱ्यांवर होत असून अवकाळी पाऊस महापूर वादळवारा नंबर आलेली रोगराई यामुळे अगोदरच अधिकांश पिके नष्ट झालेली आहेत त्यातच शेतकऱ्याने मोठ्या काळजीने जपून वाचवलेली पिके कालच्या पावसाने उद्ध्वस्त झाले त्यामुळे हाती येणारे पीक सुद्धा नष्ट झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे

Updated : 24 Nov 2020 6:31 PM GMT
Next Story
Share it
Top