Home > विदर्भ > राज्य व केन्द्र सरकारच्या भांडणात शेतकरी भरडला : शेतकरी नेते सिकंदर शहा यांचा आरोप...

राज्य व केन्द्र सरकारच्या भांडणात शेतकरी भरडला : शेतकरी नेते सिकंदर शहा यांचा आरोप...

राज्य व केन्द्र सरकारच्या भांडणात शेतकरी भरडला : शेतकरी नेते सिकंदर शहा यांचा आरोप...
X

म मराठी न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी/सैय्यद फैज़ान

यवतमाळ,दि.30 : राज्य तसेच केन्द्र सरकारच्या भांडणात महाराष्ट्रातील शेतकरी भरडला जात आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. भरीव मदत न मिळाल्यास शेतक-यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता असून या आत्महत्यांना राज्य तसेच केन्द्रातील सरकार जबाबदार राहील असा आरोप शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केला आहे. ते यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परीषदेत बोलत होते.

यवतमाळ जिल्हयात जवळपास 80 टक्के शेतकरी अल्पभुधारक आहे. नैसर्गीक संकटामुळे शेतकरी आर्थीक दृष्ट्या संकटात सापडला आहे. या वर्षी परतीच्या पावसामुळे कापसाची वाताहात झाली. सोयाबिन तर पुर्णता नष्ट झाले आहे. हजारो शेतक-यांचा कापूस पावसामुळे काळवंडला असून कोटयवधी रुपयांचे नुकसान झाले. उरलेल्या कापसाच्या बोंडावर आता बोंडअळींचा प्रकोप सुरु झाला आहे. अशा परीस्थितीत समोर येणारे सण तसेच रब्बी हंगाम बघता शेतक-यांचा कापूस खरेदी करणे गरजेचे आहे. सध्या तरी कापूस खरेदी साठी फक्त नोंदणी केली जात आहे. कापसाची खरेदी दिवाळी नंतर सुरु होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेतक-यांना अनेक प्रकारची देणी बाकी असल्यामुळे शेतकरी असलेला थोडाफार कापूस व्यापा-यांना विकत आहे.

व्यापारी सुध्दा त्यांना 3 हजार 800 ते 4 हजार 500 रुपये भाव देत असल्याची माहिती आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतक-यांचा कापूस खरेदी करण्यासाठी तात्काळ सीसीआय ची खरेदी केंन्द्र सुरु करण्याची मागणी सिकंदर शहा यांनी केली. राज्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटीची मदत जाहिर केली आहे. कोरोनामुळे राज्य सरकार आर्थीक संकटात आहे. दुसरीकडे केन्द्र सरकारने राज्याचे 38 हजार कोटी रुपये जीएसटीचे अद्याप दिलेले नाही. त्यामुळे राज्य सरकारजवळ पैसेच नसल्यामुळे शेतक-यांना मदत मिळेल कि नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्य तसेच केन्द्रातील सत्तारुढ सरकारचे आपसात वैर सुरु आहे. यामध्ये शेतकरी भरडला जात आहे. देशभरात मोठया प्रमाणात पाऊस पडल्याने अनेक राज्यात ओला दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे केन्द्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती घोषीत करावी अशी मागणी सिकंदर शहा यांनी केली आहे. विशेष म्हणजे केन्द्र सरकार जाणीवपुर्वक महाराष्ट्रातील शेतक-यांना मदत करीत नसल्याचा आरोप सुध्दा त्यांनी लावला आहे. पत्रकार परीषदेला ह.भ.प. गुलाबराव महाराज, उत्तम गुल्हाणे, दिपक मडसे, विष्णु तडसे, मारोतराव उभारे, अविनाश रोकडे, विठ्ठल टाले उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींना घेराव घालू

अतिवृष्टीमुळे शेतक-यांवर आर्थीक संकट आले आहे. यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकाराला सरकारचे लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील. दिवाळीपुर्वी मदत न दिल्यास लोकप्रतिनिधींना गावात पाय ठेऊ देणार नाही. जागोजागी घेराव घालून लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही.असे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सिकंदर शहा अध्यक्ष शेतकरी वारकरी संघटना यांनी कळविले.

Updated : 30 Oct 2020 11:27 AM GMT
Next Story
Share it
Top