Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > राज्यात ओला दुष्काळ जाहिर करणे शेतकर्याना आर्थिक मदत आणि सरकारी खरेदी सुरू करण्याबाबत.

राज्यात ओला दुष्काळ जाहिर करणे शेतकर्याना आर्थिक मदत आणि सरकारी खरेदी सुरू करण्याबाबत.

राज्यात ओला दुष्काळ जाहिर करणे शेतकर्याना आर्थिक मदत आणि सरकारी खरेदी सुरू करण्याबाबत.
X

आकाश झाडे चामोर्शी तालुका प्रतिनिधि 9545023844

गडचिरोली/चामोर्शी :- राज्यात पावसाची सुरूवात झाल्यानंतर शेतकर्यानी सोयाबीनची पेरणी केली आणि मोठ्या प्रमाणात सोयाबिनची उगवन झाली नाही त्याबाबत राज्यभरात तक्रारी आल्यानंतर बियाणे व त्याच्या कंपन्याची चौकशी करण्यात आली होती आणि बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे उगवन शक्ती कमी होती त्यामुळे शेतकर्याला दुबार पेरणी करावी लागली.

त्या नंतर अनेक भागात दुबार पेरणी झाली सोयाबिन सोबतच मुंग उडिद हे पिके बर्यापैकी आले होते परंतु यावर्षी गेल्या दोन महिन्यात जोरदार वादळी पाऊस होत असल्यामुळे शेतकर्यांच्या हातात आलेली पिके कापणी करण्यापूर्वी खराब झालीत विदर्भात व इतर भागात सोयाबिन वर येलो मोजक नावाची किड आल्यामुळे सोयाबीनला लागलेल्या शेंगा भरल्या नाहीत सोयाबीन कापणी विना नागरनी करावी लागली

गेल्या महिण्यात जास्ती पावसामुळे मराठवाड़ा, विदर्भ,उत्तर महाराष्ट्र इ.भागातील कपाशिचे बोंड पिक सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे

पूर्व विदर्भात आॅगस्ट महिन्याच्या शेवटी पूर आल्यामुळे शेतकर्याचे पिके पाण्याखाली आली होती.तसेच गावातील नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांनाही पुर्ण पणे मदत मिळालेली नाही.जेथे मिळाली ती फारच तुटपुंजी आहे.दुसरीकडे मागील दोन कर्जमाफीमध्ये अनेक शेतकर्यांना मदत मिळणे गरजेचे आहे,

प्रमुख मागण्या-

१)राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा.

२) नुकसान झालेल्या पिकांसाठी प्रति हेक्टर दिल्ली सरकार प्रमाणे ५० हजार रूपये मदत जाहिर करावी

३)कपाशीचे पंचनामे करून अहवाल सादर करावेत

४) सोयाबीन,धान व कपाशी खरेदी हेतू सरकारी यंत्रणा उभी करावी (msp नुसार सरकारी खरेदी चालु करावी)

५)पूर्व विदर्भात मानव निर्मित पुरामुळे झालेली नुकसान भरपाई कोकनात दिलेल्या मदती प्रमाणे देण्यात यावी.

६)राज्यात जेथे फळबागांचे नुकसान झाले आहे तेथे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.

७)ज्या शेतकर्यांना मागच्या दोन कर्जमाफिचा लाभ मिळाला नाही त्यांना कर्ज माफी देण्यात यावी.

ह्या सर्व मागण्याचा पत्र आम आदमी पार्टी चामोर्शी यांच्या वतीने चामोर्शी तहसीलदार यांच्या द्ववारे मा.मुख्यमंत्री साहेब यांना पाठवण्यात आले.युवा सयोजक धनराज कुसराम व आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते सुखदेव बोदलकर,रामदास जुवारे,प्रशांत कुसराम,मनोज तुबंडे,देवेंद्र तुंबडे,वैभव मंगर, ओंकार कोडापे,शुभम कुलसंगे हे उपस्थित होते.

Updated : 19 Oct 2020 2:32 PM GMT
Next Story
Share it
Top