राजीव उपसा सिंचन योजना भेंडाळा या सिंचन योजनेचा अहवाल अंतिम टप्यात
X
आकाश झाडे चामोर्शी तालुका प्रतिनिधि 9545023844
गडचिरोली दिनांक 30 ऑक्टोबर
चामोर्शी तालुक्यातील भेंडाला भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या राजीव जल उपसा सिंचन योजनेचा प्रकल्प अहवाल तयार असून राज्य तांत्रिक सल्लागार समिती या तपासणीनंतर राज्य सरकार सदर प्रकल्प कार्यान्वित होण्याच्या अनुषंगाने लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती आमदार डॉ देवराव जी होळी यांनी दिली आहे.
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी याबाबत सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.याबाबत त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री मा. जयंतराव पाटील यांना याबाबत पत्र दिले. त्या पत्राला उत्तर देताना याबाबतचे लेखी उत्तर मंत्री महोदयांनीआमदार महोदयांना पाठविले आहे. त्यानुसार राजीव जल उपसा सिंचन योजनेचे पाणी उचल स्थळ बदलामुळे योजनेचे पंप हाऊस,ऊर्ध्वगामी नलिका व लाभ क्षेत्र इत्यादी मध्ये झालेल्या बदलानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता आवश्यक सर्वेक्षण अन्वेषण पूर्ण करण्यात आले असून अद्यावत माहिती मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना नाशिक यांना सादर करण्यात आली आहे. त्यानुसार संकल्पन व रेखाचित्र प्राप्त झाल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तांत्रिक सल्लागार समिती नाशिक कडून तपासणी करून प्रकल्प सुरू होण्याच्या दृष्टीने पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे