Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > राखी भावनाताईंची : प्रेम, जिव्हाळा विश्वासाची !! 

राखी भावनाताईंची : प्रेम, जिव्हाळा विश्वासाची !! 

राखी भावनाताईंची : प्रेम, जिव्हाळा विश्वासाची !! 
X

आज घरी एक पाकिट धडकले .पाकिटावर पाहिल्यावरच लक्षात आलं.आपल्या मतदारसंघाची लाडकी बहीण खा .भावनाताई गवळी यांनी भावाला पाठविलेली राखी .दरवर्षी मोठ्या अभिमानाने आणि स्नेहाने ही राखी मी हाताला बांधत असतो .

आज या राखीकडे पाहताना सहज मागे मागे भूतकाळाची पाने चाळत गेलों.

सन्माननीय भावनाताई वयाच्या तेवीस चौविसाव्या वर्षी म्हणजे १९९९ मध्ये खासदार झाल्या. सर्वांनी जीवतोडून कार्य केल. दिग्गजांचा पराभव करून आपल्या भावनाताई १०ऑक्टोबर१९९९ ला तेराव्या लोकसभेत दाखल झाल्या.

१९९९ साली रक्षाबंधनाच्या निमित्ताने ताईंनी अख्ख्या मतदारसंघातील भावांना राखी पाठविली आणि सर्व भावांनी विश्वासाची ओवाळणी म्हणुन ताईंना मतदारसंघ बहाल केला.

बहिणभावाच्या परस्पर प्रेमाची राखी आणि ओवाळणी किती असावी ? एकदा नाही , दोनदा नाही, तीनदा नाही सतत पाचवेळा म्हणजे तेरावी , चौदावी ,पंधरावी, सोळावी आणि सतरावी सुद्धा लोकसभा ओवाळणीत ताईंना दिली .

लोकसभेत रेकॉर्डच बनले आणि तेही बहीणभावाच्या नात्याने .

मतदारसंघ साधारणतः सहा विधानसभा ,बारा ते सतरा लाख मतदारबंधूभगिनी ,किलोमीटरनी सुद्धा प्रचंड विस्तारित .

अशा महाकाय मतदारसंघाची जबाबदारी ऐन तारुण्यात भावनाताईंकडे आली आणि ताईंनी ती जबाबदारी लीलया पेलली. त्यात खरी शक्ती म्हणजे रक्षाबंधनातून निर्माण झालेलं सुरक्षाबंधन .

१९९९ ला सुरु झालेले हे भावबंधन ताईंनी आजतागायत अव्याहतपणे , अखंडपणे आणि हृद्यपणे राबविले .

असं एकही वर्ष नसेल ज्या वर्षी ताईची राखी आली नाही. रेशमाचा हा अनमोल धागा जीवीचा जिव्हाळा निर्माण करतो .बहिणीने भावाला पाठविलेल्या या राखीमुळे ,ताई प्रत्येक घराच्या लेकबाळच झाल्या.तशी प्रचितीही वारंवार येते. मतदारसंघातील प्रत्येकजण त्यांच्यावर बहिणीसारख प्रेम , जिव्हाळा आणि आपुलकी ,सोबतच त्यांना बहिणीचा अधिकारही प्रदान करतो आणि बहिणीचा अधिकार दाखवतोही.

विदर्भकन्या भावनाताई तशा आक्रमक ,अभ्यासू आणि रोखठोक .विकासकामे कशी करून घ्यायची हे ताईंकडून शिकावे .चांगल्या अधिकाऱ्यांना संरक्षण आणि कामचुकार अधिकाऱ्यांना घामच फुटावा अशी आक्रमकता . कार्यकर्त्यांप्रती आपुलकी आणि जिव्हाळा .गरजवन्तान्प्रति सान्द्रकरुण भाव.महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याची धडपड ,तरुणांच्या हाताला काम देण्याची तळमळ ,शासनाच्या योजना गरजूपर्यंत पौहचविण्याची आर्तता. हे सारं मी जवळून पाहील आहे. प्रचंड मोठी आरोग्य शिबिरे , रोजगार मेळावे ईत्यादीदेखील मला जवळून पाहता आली .

त्यांच्यातला निडरपणा आणि ठामपणा इतर कोणत्याही नेत्यामध्ये असेल असं मला वाटत नाही .

एखादी गोष्ट ठरवली तर प्राण गेला तरी बेहत्तर पण त्या मागे हटत नाहीत .वाघीणच ! भल्याभल्याना गारद करण्याच सामर्थ्य .हे सर्व जन्मजात आणि निसर्गदत्त आहे. असो!

पण रक्षाबंधन प्रसंगी पाठविलेली राखी मात्र राजकारणापलीकडलि आहे. सतत एकविस वर्ष नित्यनेमाने 'रक्षेमा चलमाचल ' म्हणत, ही राखी मतदारसंघातील आपल्या हजारो भावांपर्यंत हार्दिक भावाने त्या न चुकता पाठवत आहेत.

रक्षाबंधन जवळ आले की मतदारसंघातील सर्व भाऊ आतुरतेने राखीची वाट पाहतात .गिनिजबुक आणि लिम्काबूक मध्ये नोंद व्हावा असा हा उपक्रम.

ताईंचा हा रक्षाबंधन उपक्रम अनेक महिला खासदारांनी अभ्यासला आणि उपयोजन करण्याचा प्रयत्नही केला. पण त्या यशस्वी झाल्या नाहीत.कारण ही राखी म्हणजे केवळ धागा नसून त्या धाग्यासौबत जो ओलावा ,प्रेम आणि आपुलकी असते ,ती पाठविणे इतर कोणालाही जमले नाही.

खा.भावनाताई या बंद लीफाफ्यात राखीसोबत बहिणीची माया ,लेकीचा स्नेह , आत्याचा जिव्हाळा ,नणंदबाईचा ओलावा उस्फुर्तपणे पाठवितात. पाकिट उघडताच राखी नंतर बाहेर येते आधी स्नेह पाझरतौ.

राखीच्या रूपाने भावनाताई घराघरात आणि मनामनात पोचतात .घरातली माणसं ही मोठ्या अभिमानाने , प्रेम ,उत्साह आणि आनंदाने सांगतात 'ही पहा आमच्या भावनाताईची राखी आली '.त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि अभिमान टिपण्यासारखा असतो .

खरंच सांगतो ताई ! इतरप्रसंगी रक्षाबंधनाची राखी म्हणजे भावाने बहिणीचे रक्षण कराव या पारंपारिक हेतूने असते पण आपण जी राखी पाठविता ती केवळ राखी नसून बहिणीने भावांना दिलेली ताकद आहे , सुरक्षाबंधन आहे. एक मोठी शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे नव्हे भावनाताई माझ्या पाठीशी ठाम उभ्या आहेत, ही भावना आमच्या मनात स्थापित होते. आपल्या राखीमुळे प्रचंड ऊर्जा आणि अतुल्य बळ मिळते .राखीची ही ताकद सर्व कार्यकर्त्याना पूर्णशक्ती प्रदान करते .

ताई ! आपण पाठविलेल्या राखिने अदम्य आत्मविश्वास, अविचल चालण्याची हिंमत , पहाडालाही टक्कर देण्याची क्षमता निर्माण होते.

ताई ! जगात कुठेही नसेल असं ''रक्षन्तिस्म परस्परम् ' 'असं हे रक्षाबंधन .

रक्षा बंधनाच्या निमित्ताने पाठविलेल्या या राखीने नातं घट्ट होतेच पण

' 'बाप रखुमादेवी वरू जीवीचा जिव्हाळा ।

ताई !आपण पाठविलेल्या रक्षाबंधन राखी मुळे काहीही झालं तरी नात्यात जराही दुरावा निर्माण होत नाही. मनगटावर बांधल्या जाणाऱ्या राखीने मन आणि मनगटाला शक्ती प्राप्त होते. ते मन आणि मनगट आपल्या ताईच्या इष्टमनोकामना सिद्धीसाठी कामी आणता आल्या तर हीच खरी ओवाळणी ठरेल .

काहि केलिया वेगळा नव्हे गे माये ! असं हृदयाचे अतूट नातं निर्माण होते.

ताई ! या एकविस वर्षात आपण यशाची अनेक शिखरे गाठली ,अनेक पद आणि प्रतिष्ठेचे प्रसंग अनुभवले आणि उपभोगलेही तर कधी जीवनात चढउतारांनाही सामोरे जावं लागलं ,मानापमान , सुखाच्या आणि संकटाच्या अनेक छटाही चितारल्या गेल्या , कधी कधी तर चक्रव्युहातील अभिमन्यू प्रमाणे एक विरुद्ध सारे असेही प्रसंग आपल्या अभीमुख आले. पण तरीही आपण खंबीरपणे पुढे जात राहिल्या .न डगमगता .नैराश्य ,उन्माद यांना स्पर्शही न करता. मनात कितीही सुखदुःखाच्या संवेदना असल्या तरीही चेहऱ्यावर सतत आनंद ठेवण सोप नसते. हे सामर्थ्य आपणास मिळाले ते ज्येष्ठांचे आशीर्वाद, आणि मतदारसंघातील बहीणभावांचा अपार स्नेह आणि प्रेम सदैव आपल्या सोबत आहे म्हणुन.

राखीपौर्णिमेच्या निमित्ताने मतदारसंघातील आम्ही सर्वच भाऊ आपल्या पाठीशी खंबीर उभे आहोत.

आपल्या कडून अशीच आणि याहून विशेष विधायक कार्ये होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो

पिंटु बांगर

शहर प्रमुख, शिवसेना, यवतमाळ

Updated : 2 Aug 2020 8:04 PM GMT
Next Story
Share it
Top