Home > महाराष्ट्र राज्य > राँग नंबर ठरताहेत महिला सह तरुणीची डोकेदुखी

राँग नंबर ठरताहेत महिला सह तरुणीची डोकेदुखी

राँग नंबर ठरताहेत महिला सह तरुणीची डोकेदुखी
X

खोडसाळ तरूणांच्या लिलाना लगाम बसेल का? -----------------------------------------------------------

नितीन कांबळे बीड ÷ मोबाईल वर अनोळखी नंबर आला तर तो उचलताना मोठ्या प्रमाणावर दडपण येत असते. एवढेच नव्हे तर महिला व तरूणी तो काॅलच घेत नाहीत. जर घेतलाच तर त्याना अनेक खोडसाळ तरूणांचा सामना करावा लागत असताना दिसुन येत असल्याने राँग नंबर सध्या महिलांसह तरुणीची डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. बदनामी पोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली जात नाही. त्यामुळे अश्या खोडसाळ तरूणांच्या लिंलाना लगाम बसेल का असा प्रश्न महिला व तरूणी मधुन उपस्थित केला जात आहे.

पुर्वी संपर्क साधावा यासाठी पत्र व्यवहारा पलिकडे किंवा तार असायची जमाना बदलत गेला आणि आता गरीब असो कि श्रीमंत सगळ्याच्या हाती स्मार्ट फोन आल्याने भेटी गाठी कमी झाल्या. नोकरदार महिला, महाविद्यालयीन तरूणी , आज सर्रास फोन वापरत आहेत. यांच्याकडे कुटुंबिय, ठराविक नातेवाईक आणि ओळखीचे मित्र, मैत्रिणी याचे नंबर असतात. या वितिरिक्त एखादा अनोळखी काॅल आला तर त्या उचलत नाहीत. पण सारखा सारखा येत असेल तर उचलला जातो. समोरून बोलणारा सभ्य असेल तर तो परत फोन करत नाही. मात्र खोडसाळ तरूण, विकृत प्रवृत्तीचे लोक वारंवार त्या महिला किंवा तरुणीच्या मोबाईल वर फोन करून त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याच्या घटना घडत आहेत. राँग नंबर येत असल्याने कुटुंबात अनेक वेळा कलह होताना दिसत आहेत. तर तरूणी मैत्रिण किंवा नातेवाईक यांच्याकडे तक्रार करतात. पण या डोकेदुखी मुळे मनस्ताप होत असल्याने अनेक वेळा सिम कार्ड बदलणे हाच पर्याय वापरला जातो. पोलिसात तक्रार द्यावी तर बदनामी होण्याची भीती वाटते. अशी परिस्थिती सध्या ग्रामीण भागासह शहरात पहावयास मिळत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात महिलांची व तरुणीची तक्रार किंवा अडचण जाणुन घेण्यासाठी स्वतंत्र महिला अधिकारी, कर्मचारी असायला हवे अशी मागणी रेखा फड यांनी केली आहे.

------------------------------------------------------------

बिनधास्त तक्रार करा पोलीस तुमच्या पाठीशी

-----------------------------------------------------------

अनोळखी नंबर सारखा येऊन तुम्हाला त्रास देत असेल तर मनात कसलीच भिती न ठेवता जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्या तुमचे नाव गोपनीय ठेऊन संबंधिताला समज दिली जाईल यावर त्याने परत खोडसाळ पणा केला.तर योग्य कारवाई केली जाईल त्यामुळे महिला व तरुणींनी बिनधास्त तक्रार करा पोलीस तुमच्या पाठीशी असल्याचे आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांनी सांगितले.

------------------------------------------------------------

Updated : 25 July 2020 11:49 AM GMT
Next Story
Share it
Top