रस्तयाच्या मधात येणारे विघुत पोल हटविण्यात यावे - व्दारकाप्रसाद दुबे
X
म मराठी न्यूज टीम
मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन दि. 08/11/2020
मुर्तिजापुर शहरामध्ये गेल्या 4 वर्षा पासून मुख्य रस्तयाचे काम सुरु आहे. जास्त रहदारी व मुख्य रस्ता असलेल्या भगतसिंग चौका मध्ये विघुत पोल हटविण्याबाबत व्दारकाप्रसाद दुबे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष मो यांनी उर्जामंत्री, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री यांना निवेदन दिले आहे. मुर्तिजापूर येथील सर्वात जास्त रहदारी असलेला भगतसिंग चौक जो मेनरोड असुन अचलपुर ते यवतमाळ महामार्गावर आहे. म.रा.वि.वि. कंपनी चे हे अतिक्रमण करुन विघुत पोल लावले आहे. मात्र पैसे नगर पालीका भरत आहे. भगतसिंग चौक हा अत्यंत रहदारी असलेला चौक आहे. लाईट चे पोल हे अतिशय चुकीच्या ठिकाणी आहे. ते काढण्यात यावे व रस्त्याच्या कडेला लावावे. रस्त्याच्या मध्ये असलेले पोल मुळे वाहनांच्या अपघाताला कारणीभुत होऊ शकतात. रस्तयाचे चारही कोपऱ्यांवर असलेले चार खांब हटवणे फार गरजेचे आहे. हयामुळे नागरीक फार त्रस्त झाले आहेत. हे पोल काढले असता रस्ता १५ फुट मोठा रुंद होऊ शकतो. हया बाबत विदयुत कंपनी ला वारंवार निवेदन दिले परंतु म.रा.वि.वि. कडुन कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तरी कृपया महावितरण कंपनी चे अतिक्रमण काढुन जनहिताच्या प्रश्नाकरीता सहकार्य करावे. असा निवेदनामध्ये उल्लेश असून त्यांच्या प्रतिलिपी बच्चुभाऊ कडु, पालकमंती, अकोला, गोपीकिशनजी बाजोरीया आमदार, अकोला, हरिषभाऊ पिंपळे, आमदार, मुर्तिजापूर,, जिल्हाधिकारी साहेब, अकोला यांना दिल्या आहेत.