Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन!

रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन!

रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन!
X

म मराठी न्यूज

रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते...

हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते...

भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे.. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे.. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे..

स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्‍या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे.. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे.

रक्षाबंधनचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. मात्र आज तिची मस्करी करणार्‍या आणि जनावरांप्रमाणे वागणूक देणार्‍या भावांना समजावून सांगण्याची गरज आहे..

Updated : 2 Aug 2020 6:59 PM GMT
Next Story
Share it
Top