येरमणार ग्रामपंचायत मध्ये आमचा गाव आमचा विकास उपक्रम.
X
"येरमणार ग्रामपंचायत मध्ये आमचा गाव आमचा विकास उपक्रम."
आनंद दुर्गे
तालुका प्रतिनिधी /भामरागड
मो.9420510561
अहेरी/येरमणार :- ग्रामपंचायतलय येरमनार येथे सरपंच श्री बालाजी गावडे यांचा अध्यक्षतेखाली 15 वित्त आयोगाचा "आमचा गाव, आमचा विकास,,आराखडा सन 2021-22 ते 2024- 25 पंचवार्षिक नियोजन आराखडा संदर्भत कार्यशाळा आयोजन करण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम संत गाडगेबाबा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोला माला अर्पण करून कार्यशाळेला सुरुवात करण्यात आला.त्यानंतर गावामध्ये शिवार फेरी कडून, येरमनार ग्रा.पं.अंतर्गत येणारे मौजा - येरमनार, येरमनार टोला, गुर्जा खुर्द,मिचगुंडा, कोरेपल्ली, कवठाराम इयादी गावातील समस्यांवर चर्चा करून, पुढील पाच वर्षाचा विकास आराखडा तयार करण्यातआले यामध्ये गावनिहाय पिण्याचे पाणी, गाव स्वच्छता, शिक्षण, अंगणवाडी यांना प्रथम प्राधान्य देऊन, गावातील इतर ही कामांचा विकास आराखडा तयार करण्यात आला.
यावेळी पंचवार्षिक आराखडा तयार करतांना येरमनार ग्रा.पं.चे उपसरपंच श्री पोच्या तलांडी, श्री विजय आत्राम सदस्य, गाव पाटील श्री डोलू मडावी, येरमनार चे ग्रामसेवक श्री एन.झेड.नरोटे, श्री आर.एम.पाटण सर ( मुख्याध्यापक येरमनार), श्री डी.टी. कुमरे सर (प्रा.शिक्षक), मांडरा ग्रा.पं.ग्रामसेवक श्री एच.डी.पुराम,सौ मीना कोंडागुर्ले ( अंगणवाडी सेविका), सौ अर्चना आत्राम ( अंगणवाडी सेविका ), सौ रेश्मा कोंडगुर्ले ( अंगणवाडी सेविका ), सौ प्रियंका आत्राम ( आशा वर्कस ), सौ गौरी गोवर्धन ( आशा वर्कस) आणि येरमनार ग्रा.पं.मधील सर्व कर्मचारी व गावकरी सहकार्य केले.