युवक काँग्रेसचे ग्रंथालयाचे कवाडे उघडण्याची अंमलबजावणी करण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांना निवेदन।
X
म मराठी न्यूज टीम
प्रतिनिधी/भुषण महाजन
मूर्तिजापुर, दी.१८ ग्रंथालय चे कवाडे उघडण्याची अंमलबजावणी करावी याकरिता तालुका युवक काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. वाचन प्रेरणादिनापासुन सर्व ग्रंथालय सुरू करण्याची मुभा दिली गेली आहे. तरीपण याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या कडक लॉकडाऊन मध्ये ग्रंथालयांनही टाळे लावण्यात आले होते.आता शासनाने सर्व ग्रंथालय सुरू करण्याचे आदेश दिलेले आहे. राज्यातील सर्व ग्रंथालय सुरू व्हावे याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना युवक काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष धनंजय उर्फ विर पाटील काकड यांनी निवेदन दिले होते.
ग्रामीण भागात संस्कृती ची मोठी चळवळ निर्माण व्हावी व वाचनाच्या माध्यमातून बौद्धिक विकास व्हावे याकरिता ग्रंथालय उघडे करून शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी तसेच अनेक ग्रंथालयांना अद्यापही पूर्ण अनुदान मिळालेले नाही. त्यांना संपूर्ण अनुदान सुद्धा देण्यात यावे. अशी मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनंजय काकड यांनी केली आहे.