Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > युरिया आहे काय भाऊ "युरिया"! युरिया खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची भटकंती

युरिया आहे काय भाऊ "युरिया"! युरिया खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची भटकंती

युरिया आहे काय भाऊ युरिया!  युरिया खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची भटकंती
X

त-हाडी:- प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यात सर्वत्र पेरण्या आटोपल्या असून कपाशी सह अनेक पिकांच्या वाढीसाठी आणि उपोषणासाठी शेतकरी युरिया खताचा वापर करीत असतात परंतु सध्या स्थितीत बाजारपेठेत युरिया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांवर भटकंतीची वेळ आली असून अनेक कृषी सेवा केंद्रांवर चक्र मारून शेतकरी दुकानदारांना युरिया आहे काय भाऊ युरिया ??? अशी विचारणा करीत आहेत. मागील काही दिवसातच बाजारपेठेतून युरिया अचानक गायब कसा झाला याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असून भविष्यात युरियाचे कृत्रिम टंचाई निर्माण करून काळ्याबाजारात वाढीव दराने युरिया विकण्याचा फंडा तर वापरला जात नाही ना? अशी शंकासुद्धा शेतकऱ्यांच्या मनात घर करत आहे.

शेतीकरिता युरिया ही अत्यावश्यक वस्तू असून यावर सरकारचे आणि कृषी विभागाचे कठोर नियंत्रण असणे आवश्यक आहे परंतु सध्याच्या स्थितीत जवळपास सर्वच दुकानातून युरिया हद्दपार असल्याने शासनाचे याकडे लक्ष नाही काय असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

प्रतिक्रिया:-

कोणत्याही शेतकऱ्याला दुकानदार यूरिया खत देत नसेल किंवा त्यासोबत अनावश्यक वस्तू खरेदी करण्याची सक्ती करत असेल तर तालुका तक्रार निवारण समितीला किंवा आम्हाला माहिती द्यावी. तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.

अनिल निकुंभ, तालुका कृषी अधिकारी, शिरपूर

माझ्या कपाशी पिकाला युरियाची नितांत आवश्यकता असून कोणत्याच कृषी केंद्रावर युरिया मिळाला नाही. शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्यावा.

विशाल कंरके, शेतकरी, त-हाडी

मागणीप्रमाणे वरूनच पुरवठा होत नाही. दहा गाडीची ऑर्डर दिल्यास एक गाडीच युरिया मिळतो.

व्यंकटेश ऍग्रो त-हाडी, कृषी केंद्र चालक त-हाडी.

Updated : 11 July 2020 1:21 PM GMT
Next Story
Share it
Top