Home > विदर्भ > यवतमाळ जिल्ह्यात 121 जण नव्याने पॉझेटिव्ह: दोघांचा मृत्यु ; 37 जण बरे...

यवतमाळ जिल्ह्यात 121 जण नव्याने पॉझेटिव्ह: दोघांचा मृत्यु ; 37 जण बरे...

यवतमाळ जिल्ह्यात 121 जण नव्याने पॉझेटिव्ह: दोघांचा मृत्यु ; 37 जण बरे...
X

म-मराठी न्यूज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी/ वासीक शेख

यवतमाळ, दि. 21 : जिल्ह्यात गत 24 तासात 121 जण नव्याने पॉझेटिव्ह आले दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 37 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 63 आणि 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात एकूण 653 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 121 नव्याने पॉझेटिव्ह तर 532 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 496 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9692 झाली आहे. बुधवारी 37 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8636 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 309 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 86619 नमुने पाठविले असून यापैकी 86074 प्राप्त तर 545 अप्राप्त आहेत. तसेच 76382 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

Updated : 21 Oct 2020 12:14 PM GMT
Next Story
Share it
Top