Home > विदर्भ > मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय अल्पसंख्याक बहूल क्षेत्रात आणावे : ऑल इंडिया तंज़ीम ए इंसाफची मागणी

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय अल्पसंख्याक बहूल क्षेत्रात आणावे : ऑल इंडिया तंज़ीम ए इंसाफची मागणी

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय अल्पसंख्याक बहूल क्षेत्रात आणावे : ऑल इंडिया तंज़ीम ए इंसाफची मागणी
X

म-मराठी न्यूज़ नेटवर्क

विशेष प्रतिनिधी/वासीक शेख

यवतमाळ,दि.२ नोवेंबर : केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने अल्पसंख्यांक समाजाच्या आर्थिक,शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहे ह्याचे एक भाग म्हणून राज्य शासनाने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ चे राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा कार्यालय स्थापन करण्यात आलेले आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे मुख्य ठिकाणी यवतमाळ येथे दारव्हा रोडवर हेलिपॅड मैदानाच्या बाजूला या महामंडळाच्या कार्यालय आहे.

महामंडळाचा हे कार्यालय अल्पसंख्याक बहुल क्षेत्राच्या जवळपास पाच ते सात किलोमीटरच्या अंतरावर आहे बहुतांश अल्पसंख्यक समाजाच्या लोकांना या कार्यालयाचा पत्ता सुद्धा माहीत नाही व तसेच हे कार्यालय नियमित उघडल्या जात

नसल्यामुळे अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना या महामंडळ च्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नाही तरी हे कार्यालय यवतमाळ येथील अल्पसंख्याक बहुल क्षेत्र जसे नागपूर रोड, पांढरकवडा रोड किंवा भोसा रोड या क्षेत्रात आणावे अशी विनंती सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी एका निवेदनाच्या माध्यमातून ऑल इंडिया तंज़ीम ए इंसाफचे च्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे मार्फत महामहीम राष्ट्रपती माननीय प्रधानमंत्री, माननीय मुख्यमंत्री व माननीय केंद्रीय मंत्री अल्पसंख्याक कार्य मंत्रालय नवी दिल्ली, माननीय केंद्रीयमंत्री अल्पसंख्यांक विकास विभाग मुंबई यांना केली.यावेळी ऑल इंडिया तंज़ीम ए इंसाफचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाबा शहेज़ाद,ऑल इंडिया तंज़ीम ए इंसाफचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष नवाब खां पठाण, तंज़ीम चे सोहेल खान,मौलाना आजाद विचार मंच चे जिल्हा उपाध्यक्ष शेख यूनुस,मौलाना आजाद विचार मंच चे शहराध्यक्ष शेख जाकीर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) चे विदर्भ अध्यक्ष सुधाकर गायवाण साहेब उपस्थित होते.

Updated : 2 Nov 2020 5:59 PM GMT
Next Story
Share it
Top