Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > मौजा म्हसला- नवसारी येथील सदनिका बांधकामाची आ. सौ. सुलभाताई खोडके द्वारे पाहणी

मौजा म्हसला- नवसारी येथील सदनिका बांधकामाची आ. सौ. सुलभाताई खोडके द्वारे पाहणी

मौजा म्हसला- नवसारी येथील सदनिका बांधकामाची आ. सौ. सुलभाताई खोडके द्वारे पाहणी
X

घटक क्रमांक 3 अंतर्गत खाजगी भागीदारी द्वारे परवडणा-या घरांची निर्मीती प्रगतीपथावर

प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थीना लवकरच सदनिकांचे हस्तांतरण

म मराठी न्यूज टीम

प्रतिनिधी/उषा पानसरे

अमरावती २२ ऑक्टोबर : देशातील प्रत्येक कुटूंबाला जलजोडणी, शौचालयाची व्यवस्था, 24 तास वीज व पोहोचरस्ता या सुविधांसह पक्के घर असायला हवे, असे विचारात घेवुन प्रंतप्रधान महोदयांच्या सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या अनुशंगाने केंद्र शासनाने नागरी भागाकरीता प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. सदर योजना देशभरात राबविण्यात येत असून महाराष्ट्रात गृहनिर्माण विभागाअंतर्गत शहर भागाकरीता महानगरपालीका ही प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. सर्वांसाठी घरे ही संकल्पना पुर्ण होणे करीता राज्य शासनाने शहर व वर्षनिहाय लाभार्थी संख्या उदीष्ट स्वरुपात निश्चित करुन दिले आहे. प्रधानमंत्री आवास योजना नुसार घटक क्रमांक : 3 अंतर्गत खाजगी भागीदारी द्वारे परवडणा-या घरांची निर्मीती करणे अंतर्गत 860 घरांच्या बांधकामाला घेवुन मान्यता प्रदान करण्यात आली असुन सद्यस्थितीत अमरावती महानगर पालीका हद्दीतील भुखंडाची निवड प्रक्रीयेनंतर येथील भुखंडावर 497 सदनिकांचे बांधकाम प्रगतीत आहे. गुरुवार दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी सद्यस्थितीत मौजा म्हसला येथील भुखंडावर सुरु असलेल्या फेज -१ व फेज-२ मधील सदनिका बांधकामाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान अमरावती महानगर पालीका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना नुसार स्थानिय परिसरात सुरु असलेल्या बांधकामा मधील सदनिकेची अंदाजीत किंमत रुपये 9.00 ते 11.50 लक्ष पर्यंत अपेक्षीत आहे. त्या प्रमाणे लाभार्थ्यांचा हिस्सा रुपये 6.50 ते 8.50 लक्ष राहील. अशी माहीती संबंधीत विभागाच्या वतीने आमदार महोदयांना सांगण्यात आली. या कामकाजाला घेवुन मागील 3 जुलै 2018 रोजी विकासकाला कार्यारंभाचा आदेश देण्यात आला असुन संबधीत कामाची आगामी 3 जानेवारी 2021 पर्यंत या कालावधीमध्ये विकासकाला पुर्तता करावी लागणार आहे. अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली .दरम्यान म्हसला येथील फेज-१ मधील लाभार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा जसे विद्युत व्यवस्था, टाईल्स , पाणी पुरवठा ,आदी सुविधांची पूर्तता करण्यासह लाभार्थ्यांना सदनिकेची चावी देऊन ताबा देण्यात यावा ,अशा सूचना आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी दिल्या . मौजा म्हसला सर्वे नं 21/फ मधील सदनिकांपैकी 44 लाभार्थी सोबत इसारचिठ्ठी करण्यात आली आहे. लवकरच उर्वरित सदनिकांची सोडत काढून सदनिका हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना आ. सुलभाताई खोडके यांनी केली . या सोबतच मौजा नवसारी येथे सर्वे न. १२९/२ येथील भूखंडावर साकारण्यात येत असलेल्या पीएम आवास योजनेच्या एकूण ८६ सदनिकांचे बांधकामाची सुद्धा आ. सुलभाताई खोडके यांनी पाहणी केली . या दरम्यान नवसारी येथील सदनिकांचे बांधकाम शीघ्रतेने पूर्ण करण्याचे निर्देश आ. सुलभाताई खोडके यांनी दिले . दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी सदर योजनेबाबत शासनाचा ११ कोटींचा हिस्सा यायचा आहे अशी माहिती दिली . यावर आ. सुलभाताई खोडके यांनी म्हाडाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनी द्वारे चर्चा केली असता त्यांनी आठ दिवसात पैसे वितरित करणार असल्याचे सांगितले. शासनाचे अनुदान बांधकामाची व एका सदनिकेचे चटई क्षेत्रफळ, एका सदनिकेची बांधकामाची किंमत आदि बाबी जाणुन घेण्यासह या पाहणी दरम्यान आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी गुणवत्तापुर्ण व दर्जेदार बांधकामासह या सदनिकांच्या कामकाजाची पुर्तता होणेसह सर्वांसाठी घरे ही संकल्पना साकारल्या गेली पाहीजे. त्यांनी संबधित विभागाच्या अधिका-यांना अशा सुचना यावेळी केल्या. भुखंडावर सदनिका बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करतांना आमदार महोदयांनी यावेळी मनपा प्रशासनाच्या अधिका-यांशी संवाद साधण्यासह या कामकाजाला घेवुन सूचना सुध्दा दिल्या . लाभार्थ्यांना सदनिकांचे वितरण करतांना सर्व बाबींची पुर्तता होण्यासह त्यांना कोणतीही असुविधा होणार नाही. याबाबत खबरदारी बाळगण्याच्या सुचना सुध्दा यावेळी आमदार महोदयांनी केल्यात. या प्रसंगी आमदार सौ. सुलभाताई खोडके समवेत मनपा आयुक्त प्रशांत रोडे, शहर अभियंता रवींद्र पवार , प्रधानमंत्री आवास योजना उपअभियंता सुनिल चौधरी, व्हीबीसीएल कंपनीचे मोरेश्वर मुगळीकर, सारंग प्रधान , सहाय्यक अभियंता अजिंक्य घोगरे , कपिल ढाले , नगरसेवक प्रशांत डवरे , प्रशांत महल्ले , यश खोडके, आदि उपस्थित होते.

Updated : 22 Oct 2020 4:28 PM GMT
Next Story
Share it
Top