Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > मूलभूत सुविधा बद्दल होत असलेल्या पक्षपाती धोरण व गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

मूलभूत सुविधा बद्दल होत असलेल्या पक्षपाती धोरण व गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

मूलभूत सुविधा बद्दल होत असलेल्या पक्षपाती धोरण व गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी
X

माजी आरोग्य सभापती निजामुद्दीन ललकार यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

म मराठी न्यूज टीम

प्रतिनिधी /भुषण महाजन

अकोला मुर्तीजापूर :- दि. 23/10/2020.मुर्तीजापुर नगरपरिषद मध्ये मूलभूत सुविधा बद्दल होत असलेल्या पक्षपाती धोरण व व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी न. प. माजी आरोग्य सभापती निजामुद्दीन ललकार यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की अकोला जिल्ह्यातील अंतर्गत येणारे मुर्तीजापुर नगर परिषद कडून नागरिकांचे मूलभूत सुविधा बद्दल पक्षपाती धोरण व गैरव्यवहार होत आहे मुर्तीजापुर शहराची लोकसंख्या 50000 च्या जवळपास असून यापैकी 15 हजार लोकसंख्या अल्पसंख्याd मुस्लिम समाजाची असून बहुसंख्य सदस्य प्रभाग नियमानुसार न प मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व भारिप बहुजन महासंघ या पक्षाचे मुस्लिम नगरसेवक एकूण चार असून प्रत्येक नगरसेवक इतर समाजाचे सुध्दा आहेत. यापैकी मुस्लिम महिला नगरसेविका तीन आहेत म्हणून ह्या नगर सेविकांचा प्रभागांच्या नागरिकांची न पकडून पक्षपाती धोरण व गैरव्यवहार केला जात आहे. नगरपरिषद क्षेत्रातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची सर्व जास्त नागरिक वसाहती प्रभाग क्रमांक दोन तीन व चार मध्ये दारिद्र्य एक हजार घरकुल परिसर व इतर झोपडपट्टी भागात विखरलेली आहेत. याठिकाणी मागील चार वर्षापासून कोणतेही विकास काम झाल्याचे दिसत नाही. कारण नगराध्यक्ष भाजपाचे असल्याने त्यांनी प्रभागाचे मुस्लिम व इतर नगरसेवकांना हाताशी धरून व त्यांना वेगवेगळ्या वैयक्तिक स्वार्थाची तसेच आर्थिक स्वरूपाची आमिषे दाखवून कायमचे गप्प बसविले म्हणून जनसामान्यांच्या प्रश्नावर या नगरसेवकांचे सरासर दुर्लक्ष होत आहे. या प्रभागात नगराध्यक्ष व नगरसेवक भाजपाचे आहे. त्या प्रभागात झपाट्याने विकास कामे होत आहे. मात्र इतर प्रभागात विकास कामे का होत नाही? शहरातील पाणीपुरवठा सुद्धा वेळेवर होत नाही ज्या ठिकाणी घरकुल निर्माण केले त्या ठिकाणी पाण्याची टंकी सुद्धा निर्माण आहे. परंतु याठिकाणी 8 ते 10 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच प्रभाग क्रमांक दोन तीन व चार करिता नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे पण अद्यापही जलवाहिनीला सुरू करण्यात आले नाही. चार वर्षापासून कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही. नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. सांडपाण्याची समस्या साफसफाई सुद्धा 15-15 दिवस होत नाही. नविन सार्वजनिक हॅन्ड पंपाची कोणतीच व्यवस्था केली नसुन मात्र जुन्या हातपंपावर संबंधित नगरसेवकांचे नातेवाईकांनी व समर्थकांनी मोटर पंप द्वारे विद्युत करण करून स्वतःचा कब्जा केल्याने इतर गरीब नागरिकांना पाण्याचा फार त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून मूर्तिजापुर नगरपरिषदेचा चालणारा सर्व कामकाजाची चौकशी करावी अशी मागणी या तक्रारी निजामुद्दीन ललकार यांनी केली आहे याची प्रतीलीपी संबंधित विभागाला व अनेक मंत्री महोदयांना देण्यात आली आहे.

म मराठी न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी/भुषण महाजन

मो. 9850024474 / 9156273113

Updated : 24 Oct 2020 1:15 AM GMT
Next Story
Share it
Top