Home > विदर्भ > मूर्तिजापूर-वाडा-पिंपळखुटा रस्त्याची दुरावस्था

मूर्तिजापूर-वाडा-पिंपळखुटा रस्त्याची दुरावस्था

मूर्तिजापूर-वाडा-पिंपळखुटा रस्त्याची दुरावस्था
X

फुलचंद भगत/मंगरूळपीर

(दि.19):मंगरुळपीर तालुक्यातील मुर्तिजापुर-वाढा-पिंपळखुटा या पाणंद रस्त्याची अनेक वर्षांपासून पूर्णतः दुरावस्था झाली असून या पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरु करण्यात यावे या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडने दि.19 रोजी मा.तहसीलदारांमार्फत मा.पालकमंत्र्याना दिले आहे.

सदर निवेदनाचा आशय असा की, मुर्तिजापुर-वाडा-पिंपळखुटा या पाणंद रस्त्याची अनेक वर्षापासून दुरावस्था झालेली असून या रस्त्यावर दुचाकी, ट्रक्टर तर सोडाच साधे पायी चालणे कठीण आहे. त्यामुळे आपल्या शेतातील पिक यंत्राच्या साहाय्याने कशे काढायचे व ते बाजारपेठेपर्यंत कशे पोहोचवायचे?असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. काही शेतकऱ्यांचे पिक तर शेतातच पडुन खराब झाले. त्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासनाने वा तेथील लोकप्रतिनीधींनी याची दखल घेतली नाही.

सदर रस्त्याची संभाजी ब्रिगेडने नुकतीच पाहणी केली होती व तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहचवून त्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते.

त्याच अनुषंगाने या पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरु करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्याला देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मा.तहसीलदारामार्फत मा.पालकमंत्री, वाशीम यांना निवेदन देण्यात आले आहे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने या निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनावर संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष गणेश गावंडे, तालुकाध्यक्ष गणेश चिपडे, उपाध्यक्ष अजय गवारगुरु, शहराध्यक्ष सचिन मांढरे, शुभम मनवर, मुकेश म्हातारमारे, लक्ष्मण व्यवहारे, मंगेश खंडारे तसेच जावेद खा वहाब खा, भारत भगत, तोसीफ मनसब खान, रवी मुंढरे, अतुल शिंदे, अनंता नागलकर, मोहम्मद सलीम शेख इमाम, नाझीर खान, भिमराव भगत, सतीश इंगोले, शेरवान कादर खान आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Updated : 19 Nov 2020 6:31 PM GMT
Next Story
Share it
Top