Home > विदर्भ > मूर्तिजापूर कंझारा टी पॉईंट जवळ ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला घातपात की आत्महत्या ?

मूर्तिजापूर कंझारा टी पॉईंट जवळ ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला घातपात की आत्महत्या ?

मूर्तिजापूर कंझारा टी पॉईंट जवळ ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला घातपात की आत्महत्या ?
X

म मराठी न्यूज टीम

मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन

मूर्तिजापूर कंझारा मार्गावर ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घातपात की आत्महत्या? असाही संशय व्यक्त केला जात आहे शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. तर इसमाचा मृतदेह श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख सामान्य शवगृहात आणण्यात आला आहे.

मूर्तिजापूर जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या कडेला आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान एका 55 वर्षीय व्यक्तीची मृतदेह आढळून आला. सदर इसम हा हेंडज येथील येथील सतनाम सिंग यांच्या धाब्यावर काम करीत असल्याची ओळख पटली असून अशोक मिलके 55 असे मृतक इसमाचे नाव आहे. तो अमरावती जिल्ह्यातील शदातपुर वळगाव जवळ चा रहिवाशी असल्याची माहिती सतनाम सिंग यांनी दिली. 16/11/2020 ला 1500/- रुपये मजुरी घेऊन अमरावती बहिणीला भेटला जातो असे सांगून मृतक अशोक मिलके हा अमरावती गेला होता. परंतु आज सकाळी दहा वाजता कंझरा मार्गावर त्यांची संशयास्पद रूपात लाश आढळून आली. याची माहिती मिळताच मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहचले व वंदे मातरम आपत्कालीन पथकाला प्राचार्यांकडून मृत व्यक्तीला लक्ष्मीबाई देशमुख उप जिल्हा रुग्णालय येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. हा घातपात की आत्महत्या याचा शोध मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन

Updated : 20 Nov 2020 7:19 PM GMT
Next Story
Share it
Top