Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > मुस्लिम आरक्षणाची प्रथम मागणी सहा.पो. निरीक्षक स्व.महेबुब पाशा शेख यांची होती

मुस्लिम आरक्षणाची प्रथम मागणी सहा.पो. निरीक्षक स्व.महेबुब पाशा शेख यांची होती

मुस्लिम आरक्षणाची प्रथम मागणी सहा.पो. निरीक्षक स्व.महेबुब पाशा शेख यांची होती
X

"५ %आरक्षण अध्यादेश काढा"

म-मराठी न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी मो. 9421302699

जाकीर हुसैन (मुंबई): महाराष्ट्र राज्यातील मागील २० वर्षी पासून मुस्लिम विकास परिषदेचे कार्य व युवा मुस्लिम विकास परिषदेचे धेर्यीने मुस्लिम आरक्षण चळवळने जनजागृती केली तसे आज महाराष्ट्र भर निवेदन व आंदोलने होत आहेत झाले हि पाहिजे समाजहित जोपासणारे व आंदोलन क्रांतिकारक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे पण युवा तरुण यांच्या माहिती साठी मुस्लिम विकास परिषद संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन झाली त्यात ज्यांनी आपल्या जिवाची परवा न करता योगदान दिले पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हि सहकार्य केले तो काळ आजही आठवतो मुस्लिम समाजात आरक्षणची प्रथम मागणी करण्यात ज्यांची मुख्य भुमिका होती ती सहाय्यक पोलीस निरक्षक स्व.महेबुब पाशा शेख यांची होती हा इतिहास आहे ते कोन होते त्यांच्या बाबतीत छोटासा जाणुन घेण्याचा प्रयत्न करूया तो असा की लातुर च्या एका छोट्या कुटुंबात जन्म झाला होता वडील पान विक्रेता( तांबोळी ) तर आई गृहणी शिक्षणाची आवड पण मार्गदर्शन नाहीं तरी हि धाडसी विचार प्रेरणादायी जे ठरवले ते करणारच हट्टी गंजगोलाई येथे छोटासा पानाचा व्यापार करत घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती त्यातून शिक्षणपुर्ण केले महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात तुन बीकॉम पदवी पुर्ण केली महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या परिक्षेतुन थेट पोलीस दलात नौकरीस लागले नौकरीहुन जेव्हा प्रथम लातुरात प्रथम आले तेव्हा त्यांचा राजीव गांधी चौक येथे मित्र परिवार यांच्या कडुन त्यांचा सन्मान केला याच प्रेरणादायी विचाराने त्यांच्या मनात विचार रूजला की आपणही समाजासाठी काहि तरी करू शकतो याचे समाधान झाले पण जो संघर्ष केला तो असा की शिष्यवृती नाही आरक्षण नाही तरीही मी करू शकलो शिक्षीत होवु शकतो तर माझ्या समाजाला का जागरूक करु नये हा विचार त्यांना सतत मनविचलीत करत असे त्यांची पहली नियुक्ति उस्मानाबाद जिल्यातील अंबी या गावी झाली तेव्हाच त्यांचे सांगली जिल्यातील इस्लामपुर येथील प्रा.वहिदाभाभी यांच्याशी विवाह झाला त्या हि उच्च शिक्षीत एम काँम पुढे GDC& A व Bped .पदवी घेतली दोघेही सुशिक्षित होते स्व : महेबुब पाशा शेख यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुर येथे नौकरीत काहि अनुभव यायला सुरवात झाली तेव्हा लगबग सन १९९३ साली बाबरी - मज्जिद चे प्रकरण संवेदनशील वातावरण व काही कारणास्तव निलंबित झाले निलंबित काळात अखबार ए अजीम चे संपादक अजीम शेख जनशासन /रूह ए हिंद चे एन. ए .इनामदार संपादक , हिंदनामा चे संपादक हाजी़ फसीयोद्दीन सिद्दीकी ,लावालावी / मानवलोक चे प्रा. एम .बी.पठाण यांच्या सह इतर नामवंत व मान्यवर यांची लातुरातील मक्का मज्जिद जवळ मित्र परिवार सह बैठक होवून यांना सोबत घेवुन युवा जागृती स्पर्धा मार्गदर्शिका अभीयान सुरू केले गरीब होतकरू यांना महाराष्ट्र आयोग ची तयारी व मार्गदर्शन सा.युवा जागृती स्पर्धा मार्गदर्शन वृतपत्र काढले त्यातून हि पहिला अंकाचे प्रकाशन आईच्या हस्ते केलं पुढे सामाजिक उपकृम हाती घेतले ज्यात सामुहिक विवाह सोहळे ,समाजजागृती , जसे गोदावरी विद्यालय लातुर येथे तर प्रा.वहिदाभाभी यांनी हि निलंबित काळात डाँ. जाकिर हुसेन गौसपुरा या शाळेत नौकरी केली पुढे श्री .काळे भारत सुर्यवंशी सर मुन्ना मणीयार यांना सोबत घेऊन लातुर नगर परिषद निवडणूक लढवली निवडणूकीत प्रा.वहिदाभाभी यांना दोन प्रभागात उभे केले तो म्हणजे झिंगणअप्पा गल्ली व तेली गल्ली येथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला राजकीय लेबल नाही अपक्ष आणी दोन्ही प्रभातुन भव्य मतांनी विजयी झाल्या ज्यात मा.डॉ. खय्युम खान ,मा. कलीम कुरैशी यांचा सिहांचा वाटा होता पुन्हा त्यांनी समाजसेवीका खा.शबाना आझमी यांच्या हस्ते बँकेची स्थापणा केली व मुस्लिम समाजातील गरजुंना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सहकार्य केले त्यामुळे राजकीय क्षेत्रामुळे त्यांना मुबंई येथे जाणे येणे सुरु झाले व मंत्रालयात सर्व निर्णय होतात यासाठी समाजजागृती करून दबाव गट निर्मीण व्हावा असा विचार मनात नेहमी ठेवत असे त्या काळी भाजपा - शिवसेना यांची सत्ता व स्व : गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते त्यांनी निलंबित स्व : महेबुब पाशा शेख यांना पुन्हा पोलीस दलातील सेवेत घेतले बीड येथे बशीरगंज येथे रुजू झाले तेथे हि दैनिक जंग चे संपादक खालेदजी पेंटर यांच्या सोबत बँकेच्या संदर्भात मार्गदर्शन घेतले तेथेही धाडसी स्वभाव असल्याने तेथेही सामाजिक समाज जागरूकता हि सतत त्यांना सतावत होती तेथून हि राजकीय नेत्यांना वढणीवर आणण्याचा भर तेथून हि बदली पुन्हा केज मतदार संघात तेथे हि स्व : माजी मंत्री विमलताई मुंदडा या मंत्रीमंडळात उच्च शिक्षीत महिला तेथेही हि त्यांचे पति नंदु मुंदडा यांच्यात वाद झाला तेथून हि पुन्हा बदली औरंगाबाद येथे तेथील नामांतर लढ्याला इतिहास पाहिला व तेथुनच मुस्लिम आरक्षण चे विचार व चळवळ ख-या अर्थाने सुरवात झाली ते विचार स्व: महेबुब पाशा शेख यांच्या मनात सतावत होते म्हणून डाँ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संघर्ष लढा व लोकशाही ची लढाई न्याय देवु शकते व संघटक संघटना यामुळे माझ्या समाजास मी काहि देवु शकतो हा विश्वास,ध्येय, स्वप्न, विचाराने मुस्लिम विकास परिषद या संघटनेचे सुरवात ०९ आँगस्ट २००० साली औरंगाबाद येथे पहिली बैंठक त्यात हाजी़

रऊफभाई , मा, लतीफ पटेल ,मा,फेरोजखा़न,मा,निसारभाई बाटलीवाला (अहमदनगर ) मा.हाजी़ एम.डी.शेख दैनिक बंधुप्रेम संपादक (सोलापूर ) प्रा.जावेदजी पाशा (नागपूर ) मा.सत्तार इनामदार (परभणी ) सह मा.हारूण मलीक आसीफ खान (बिड ) मौलाना इस्माईल कास्मी माजी न्यायधिश स्व: आर.जी.पटेल, हाजी़ समद काझी़ मा.करीमखाँ पठाण ,हाजी़ उस्मानसर , मोहसीन खान ,सह लातुर येथील सर्व मान्यवर व पदाधिकारी यांच्या विचाराने शाखा स्थापन व मेळाव्यातुन मुस्लिम समाजास शिष्यवृती व आरक्षण मिळावे या मागण्यासाठी आंदोलन उभे केले ते स्व: ताह शासकीय सेवेत असल्याने विश्वास कोनावर ठेवावा हा प्रश्न त्यांच्या समोर होता म्हणुन पत्नी प्रा.वहिदाभाभी यांना अध्यक्ष केले ज्या काळात मुस्लिम महिलेला बंधने असतांना देखीलसमाजजागृती साठी कोणताही विचार न करता आंदोलन उभे केले तो काळ म्हणजे आज अंदाज लावु शकतोत की लढा हा सोपा नव्हता चळवळ लोकशाही चा मार्ग दाखवला शासनाला सळो की पळो करून सोडले पोलीस उच्च अधीकारी सतत विचारायचे प्रा.वहिदाभाभी या तुमच्या पत्नी आहेत तेव्हा स्व:महेबुब पाशा शेख उत्तर द्यायचे तीला तीचे स्वांतत्र्य व अधीकार आहेत जे भारतीय घटनेचे शिल्पकार तथा परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहेत सतत पोलीस प्रशासन राजकारण असा प्रवास होता पाहता पाहता संघटनेचे जाळे मराठवाड़ा भर पसरले गाव तेथे शाखा स्थापन झाल्या गावो गावी शाखा मेळावे , समाजजागृती झाली पुन्हा बदली झाली नांदेड़ येथे तेथे हि मुस्लिम विकास परिषदेचा प्रा.वहिदाभाभी यांच्यावर शासकीय नजर असायची पण संघर्षतुन संघर्षीकडे औरंगाबाद, जालना, परभणी, बीड,नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, लातुर, आन्ध्र, कर्नाटक येथे हि संघटना कार्य करू लागली जिकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्व: महेबुब पाशा तिकडे मुस्लिम विकास परिषद नांदेड हुन पुन्हा बदली देगलूर येथें पण तेथेही तेच आंदोलन मुस्लिम शिष्यवृती आरक्षण हाच मुद्दा उभा केला पुन्हा नांदेड़ महानगर पालिका निवडणूका लागल्या त्यात मुस्लिम अपक्ष नगरसेवकांचा प्रचार मुस्लिम विकास परिषदेच्या प्रा.वहिदाभाभी यांनी केला व पुन्हा शेवटच्या टप्यात सर्व मुस्लिम नगरसेवक निवडुण द्या आवाहन केले मुस्लिम नगरसेवक जास्त प्रमाणात निवडणूकीत निवडुन आले मुस्लिम महिला महापौर झाली हा इतिहास आहे भारतात नांदेड़ लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि प्रा.वहिदाभाभी यांनी निवडणूकीत लढवावी अशी मागणी समोर येवू लागली मग बसपा कडुन देशातील पहली सभा नांदेड येथे बसपा च्या अध्यक्षा माजी मुख्यमंत्री मायावती यांची उपस्थित व नांदेड बसपा कडुन उमेदवारी घोषीत प्रा.वहिदाभाभी सह मराठवाड्यातुन औरंगाबाद ,परभणी, बीड,लातुर, येथे हि उमेदवार दिले व नादेंड लोकसभा लढवली ३७८००/- च्या जवळ पास मते घेतली व माजी खा.भास्कर पाटिल यांचा पराभव केला तेव्हा भाजप चे मा.खा.डी .बी.पाटिल निवडणूकीत निवडुण आले तेव्हा प्रा.वहिदाभाभी यांचा पराभव झाला पुन्हा बदली हिंगोली येथे पुन्हा विधानसभा निवडणूकीत प्रा.वहिदाभाभी मैदानात लातुर - स्व : विलासराव देशमुख यांच्या विरुद्ध तसेच भोकर - माजी मुख्यमंत्री आशोक चव्हाण , यांच्या व औरंगाबाद - माजीमंत्री राजेंद्र Darda यांच्या विरुद्ध फक्त एकच मागणी मुस्लिम समाजास शिष्यवृती आरक्षण द्या या मागणीसाठी मराठवाड्यातुन १७ ठिकाणी उमेदवार मुस्लिम विकास परिषद संघटनेने उभे केले दबाव गट स्थापन केला अखेर माजी केद्रीय मंत्री स्व : विलासराव देशमुख यांनी सच्चर समीति अहवाल व महाराष्ट्र राज्यात अमंलबजावणी करेल या अटी वर पत्रकार परिषद घेवुन माघार घेतली तेव्हां काँग्रेस पक्षाचे आघाडीचे शासन आले आणी अल्पसंख्याक समाजास शिष्यवृती लागु झाली हा इतिहास आहे आरक्षण हि शासनाने लागु केले तेहि सत्तेवरुन जाता जाता ..पण टिकले नाही या मागे अहोरात्र दिवस शासकीय पोलीस दलातील नौकरी व समाजागृतीचे ध्येय स्व: महेबुब पाशा शेख यांचा लढा आहे आणी यातुन मुस्लिम समाजला सामाजिक, आथिर्क, राजकीय ,शैक्षणिक,लढा दिला स्वताची काळजी घेतली नाहीं समाज मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला हा इतिहास आहे २४ जानेवारी २००५ साली अल्पकालावधीत दु:खद निधन झाले कमी कालावधी कार्य जास्त झाले आज त्यांच्या पाठीमागे आई,तीनभाऊ,बहिणी,पत्नी, एक मुलगी ,असा परिवार आहे पण आईने मुलगा,तर बहिणींना भाऊ ,भावांनी भाऊ , पत्नी ने पती मुलीने वडील हे समाजासाठी लढले म्हटले तर चुकीचे ठरणार नाहीं कारण हे बलीदान आहे आणी त्या नंतर न्या.राजेंद्र सच्चर समीतीचे आंदोलन माजी आ.पाशा पटेल यांनी चालवले त्यानंतर एम आय एम ने महाराष्ट्र राज्यात प्रवेश केला तो हि नांदेड़ येथुन औरंगाबाद येथे मुस्लिम विकास परिषदेने पायाभरणी केलेली आहे व एम आय एम मुख्यालयात प्रा.वहिदाभाभी व स्व : महेबुब पाशा शेख यांनी शेवटच्या क्षणी माजी खा.सुलतान सलावोद्दीन ओवैसी यांची भेट घेतली होती असो यामागे उद्देश्य एकच की नागपुर येथे अधिवेशनात मुस्लिम आरक्षण मोर्चा,व धरणे आंदोलन केले त्या मागे स्व महेबुब पाशा शेख यांचे बलीदान व त्याग आहे त्या निम्मीताने नवयुवक नवतरूण यांना मुस्लिम विकास परिषद ची समाज जागृती आठवण म्हणुन ..

महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समुदायातील शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमधील मागासलेपण दूर करण्यासाठी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे,राज्य सरकार ने लवकरात लवकर मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे

लोकशाहीमध्ये,सहभागात्मक कारभार असण्यासाठी,शासकीय नोकरीमध्ये सर्व सामाजिक जातीधर्माचे योग्य प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे हे राज्याचे कर्तव्य आहे.देशात व राज्यात मुस्लिम समाजाच्या असणाऱ्या परिस्थितीने अनेक आयोग नेमण्यात आली.प्रत्येक आयोगाने ने वेळोवेळी मुस्लीम समाजातील आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक,

मागासलेपण शासनाच्या निदर्शनास आणून देणारे अहवाल सादर केले.सदर अहवालामध्ये मुस्लिम समाजाची स्थितीचे सादरीकरण केले वेळोवेळी निष्पन्न झालेली आहे.परंतु सदर अहवाल हे केवळ कागदोपत्री राहिला असून शासन दरबारी मात्र आरक्षणाच्या दृष्टीने नकारात्मकता दिसून येत आहे.

महाविकास आघाडी सरकारने देखील आपल्या संयुक्त जाहीरनाम्यामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर केलेले आहे महाराष्ट्रात काँग्रेसच्या आघाडी सरकारने मुस्लिमांना ५% आरक्षण दिले होते तो अध्यादेश काढा मुस्लिमसमाजाचं शैक्षणिक आरक्षण चालू ठेवण्यास न्यायालयाने सांगितलं. आहे पण ते मागील भाजप सरकारने मुस्लीम आरक्षणाचं नोटिफिकेशन संपल्यानंतर नवं नोटिफिकेशन काढलं नाही तसंच याबाबत विधेयकही आणलं नाही,त्यामुळे अजून मुस्लिमांना आरक्षण मिळू शकलेलं नाही.म्हणजे मुस्लिमांना आरक्षण मिळण्यासाठी तत्कालीन सरकारनं काही पावलं उचलली नाहीत.

जसे रंगनाथ मिश्रा कमिशन, न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर समिती सहित मेहमदूर रेहमान समितीच्या अहवालातून मुस्लिम समाजाची शैक्षणिक,आर्थिक, सामाजिक व शासकीय नोकरीत मुस्लिम समाजाची परिस्तिथी समोर आलेली आहे.मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची शिफारस सर्व समितींनी केली होती.

महमूद रहमान कमिटी काय म्हणते-एमआरसीच्या अहवालात असे म्हटले आहे की,मुस्लिमांना केवळ भौगोलिक जवळ असलेल्या सुविधांच्या जागेवरच अडचण येत नाही,तर या सुविधांमध्ये प्रवेश करण्याच्या बाबतीत त्यांचा सामाजिक बहिष्कार देखील आहे.शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा मुस्लिम परिसरांपासून दूर आहेत आणि भेदभावमुळे आर्थिक अस्थिरतेमुळे प्रेरणा मिळत नाही इ.मुस्लिम या सुविधांचा प्रभावीपणे उपयोग करण्यास असमर्थ आहेत.शहरी भागात सुमारे ६० % मुस्लिम झोपडपट्टीत राहतात. अनेक सुविधांचा प्रश्न आहे.पाणीपुरवठा आणि वीज या संदर्भात मुस्लिम कुटुंबांची परिस्थिती चिंताजनक आहे कारण समितीने सुगमता निर्माण करण्याच्या दृष्टीने त्वरित होकारार्थी कृती करण्याची शिफारस केली आहे.

मुस्लिमांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती - मुस्लिमांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती करण्यासाठी तसेच मुस्लिमांना अनुक्रमे आरक्षण द्यावे हि मागणी केली आहे.त्यानंतर मुस्लिम समाजास २५ जून २०१४ मध्ये शिक्षण तसेच रोजगारामध्ये ५% टक्के आरक्षण देण्यात आले परंतु आणि त्यात धर्मावर आधारित हे आरक्षण नसून मागासलेपण असल्याने देण्यात येत आहे असे नमूद केले.कोर्टाने ५% टक्के आरक्षण केवळ शिक्षणात देऊन मुस्लिम समाजावर अन्याय केला.

ज्यावेळी सदर आरक्षणास कोर्टात चॅलेंज करण्यात आले त्यावेळी सरकारकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यानंतर भाजप सरकारने सर्वच मुस्लिम आरक्षण मोडीत काढले.

तुम्ही सुचविलेले सदर ५ %टक्के शिक्षण आणि रोजगारामध्ये

मुस्लिमांची सामाजिक,आर्थिक आणि राजकीय स्थिती दैननीय असली तरी आरक्षण मिळण्यात कोणतीच घटनात्मक किंवा कायदेशीर अडचण नाही तरीही आरक्षण नाकारले जाते.कायदेशीर बाजू त्यांना पूरक आहे,ही त्यांची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे.

आमच्या मागण्या -

मुस्लिम समाजाला शैक्षणिक आणि रोजगारमध्ये लोकसंख्या च्या नुसार आरक्षण द्यावे

राज्यातील मुस्लिम समुदायातील शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमधील मागासलेपण दूर करण्यासाठी प्रशिक्षण व संशोधन बार्टी आणि सारथी च्या धर्तीवर सुरु करण्यात यावेत.

अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र मुस्लिमांना शैक्षणिक,नोकरी आणि गृहनिर्माण-शासकीय तसेच खासगी क्षेत्रात लोकसंख्येचा प्रमाणात कायमस्वरूपी आरक्षण मिळावे व हे मुस्लिमांचा घटनात्मक व मूलभूत अधिकार आहे राज्य सरकारने लवकरात लवकर मुस्लिम समाजाला आरक्षण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५% दिलेल्या आरक्षाचा आदेश काढावा व मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने २० वर्षी पासून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे अशी मागणी राज्यभरात होत आहे स्व: महेबुब पाशा शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक व प्रा.वहिदाभाभी यांचे विचार होय (फोटो संग्रहित) या लिखाणाचा उद्देश मुस्लिम आरक्षण समाजजागृती होय जो राजकीय पक्ष संघटना समीत्या धर्मादायसंस्था नोंदणी Trast मागणी करत आहेत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा हा विचार होय....

Updated : 25 Oct 2020 2:24 PM GMT
Next Story
Share it
Top