मुर्तीजापुर शहरातील कोवीड सेंटर कडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष
X
कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी राजेंद्र मोहोड यांनी केली आहे.
मुर्तिजापूर तालुका प्रतिनिधी (भुषण महाजन) :- मुर्तिजापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन हेडज येथील कोविड सेंटर वर सुरू असलेल्या गैरप्रकार समोर आलेला आहे. कोवाड सेंटरमध्ये भरती असलेल्या कोरोना संक्रमीत रुग्णाने रुग्णाने याबाबत खुलासा केलेला आहे. त्यांनी पाठविलेल्या छायाचित्रण व छायाचित्रांवरून तेथे सुरू असलेल्या गंभीर प्रकाराबाबत प्रशासन किती काळजीपूर्वक काम करत आहे. हे समोर आले आहे. तेथे आढळून आलेल्या दारूच्या बाटल्या तसेच इतर व्यवस्थेबाबत सेंटरची जबाबदारी म्हणून अधिकारी तहसीलदार साहेब यांची आहे परंतु तहसीलदार साहेब हे सेंटर वर जाऊन फक्त पाच मिनिट भेटतात आणि त्यावेळेचे फोटो घेऊन वरिष्ठांना पाठवितात. याचा अर्थ अधिकारी आपली जबाबदारी कोणत्या प्रकारे पार पाडत आहे. हे समोर आले आहे. सेंटरला भेट देवून ते अमरावती येथे निघून जातात. सेंटरमध्ये कुणालाही प्रवेश नसताना हे सामान आले कुठून ? असा प्रश्न निर्माण होतो. मुर्तिजापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांवर व त्यापासून होणारे संक्रमणावर नियंत्रण ठेवण्याची उपविभागीय अधिकारी यांची सुद्धा जबाबदारी आहे. परंतु या समोर आलेल्या प्रकारामुळे त्यांचे सुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील कार्यालयातील 50 टक्के पेक्षा जास्त कर्मचारी बाहेर गावावरुन येणे-जाणे करतात या कारणामुळे उपविभागीय अधिकारी यांचा वाहन चालक व नगर परिषदेतील कर्मचारी सुध्दा कोरोना संक्रमित झाल्याचे समोर आले होते. याबाबत सुध्दा गंभीर पावले उचलली गेली नाहीत.त्यातच शासनाकडून प्लास्टिक बंदी असताना सुद्धा जेवणाकरिता प्लास्टिकच्या पत्रवळया, द्रोण, ग्लास यांचा सर्रास वापर सुरू आहे. हे साहित्य वापरण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाने कशी दिली ? या सर्व गैरप्रकाराबाबत मुर्तिजापुर शहरातील राजेंद्र दामोदर मोहोड सामाजिक कार्यकर्ते यांनी दिनांक १६/७/ २०२० रोजी जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, संबंधित अधिकारी तथा मंत्र्यांना या समस्येबाबत कळविले होते. परंतु याकडे काहीही लक्ष देण्यात आले नाही. सद्यस्थितीला या प्रकारामुळे राज्य प्रशासन, जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन कोवीड सेंटर, रुग्ण तसेच कोरोना न वाढण्याकरिता शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना व सुविधांकडे हेतुपुरस्पर पणे दुर्लक्ष करत आहेत. या सर्व प्रकाराबाबत दि. 28.08.2020 रोजी कोविंड सेंटर कडे दुर्लक्ष करणाऱ्या व रुग्णाच्या व्यवस्थेवर दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी राजेंद्र मोहोड सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.
भुषण महाजन मो.नं. – 9850024474 / 9156273113